Monday, 6 March 2023

रंग होळीचा uttarakhand

 



जिल्‍हा परिषद व मराठी मेडीयम मधील शिक्षक व विदयार्थ्याना नियमीत इंग्रजी बोलण्याचा सराव कोर्स

 जिल्‍हा परिषद व मराठी मेडीयम मधील शिक्षक व विदयार्थ्याना नियमीत इंग्रजी बोलण्याचा सराव व्‍हावा व इंग्रजी बोलता यावे यासाठी मोफत इंग्रजी सभाषण व इंग्‍लीश स्‍पिकिंग कोर्स शिकवण्यात येणार आहे. जिल्‍हयात काही शिक्षकांची मुले स्‍काॅलरशीपमध्ये येतात तर काहींची येत नाहीत यासाठी मोफत सर्वच मुलांना अशा पध्दतीने सर्व विषयांचे मोफत शिक्षण उपलब्‍ध करून देण्यात येणार आहे. कोकणातील मुलांना व जगभर अशा पध्दतीने शिक्षण देण्यासाठी चांगल्‍या शिक्षकांनी कॉम्‍प्‍युटर, बुध्दिमत्‍ता, स्‍पर्धा परिक्षा, गणित या विषयावर आपले अनुभव देण्यासाठी पुढे आल्‍यास कोकणात खरी शिक्षण क्राती होणार आहे. शाळा, कॉलेज, यांना पालक प्रशिक्षण, गोल सेटिग, मुलांना करीयर गायडन्‍स हा एकाचवेळी 10000 मुलांना प्रत्‍यक्ष देण्यासाठी मोफत सोय उपलब्‍ध करून देण्यात आलेली आहे.

     प्रत्‍यक्ष अनेक लोकांशी बोलता यावे यासाठी टृान्‍स एज्‍युकेशन अर्थात परीवर्तनशिल शिक्षण या संकल्‍पनेवर आधारीत ॲपव्‍दारे ऑनलाईन क्‍लासमध्ये मोबाईलव्‍दारा इंग्रजी व इतरही विषय थेट शिकता येणार आहे.इंग्रजी शिकताना बोलणे ही एक मोठी अडचण असते व कोणाशी बोलावे हा सुध्दा प्रश्न असतो. या ॲपच्‍या माध्यमातून 10000 मुलांना एकाचवेळी शिक्षण घेता येणे शक्‍य आहे. 

        प्रविण किणे यांच्‍या मुलांच्‍या आयुष्यात घोकंपट्टी शिवाय आमुलाग्र बदल घडवणारे शिक्षण देण्यासाठी पूर्वा प्रविण किणे यांनी या ॲपची निर्मिती केली आहे.इंग्रजीमुळे चांगल्‍या नोकऱ्या मिळत नाहीत हे वास्‍तव मुंबईमध्ये शिक्षण घेताना पूर्वाने पाहिले. 5 वी नापास भैया व गुजराती केवळ इंग्रजी वातावरणामुळे इंग्रजी शिकतात तर आपल्‍या मातृभूमीतील शिक्षणात 1 ली पासुन इंग्रजी असुन इंग्रजीमध्ये मुलांना का बोलता येत नाही याचा अभ्यास करून मुलांच्‍या कानावर इंग्रजी पडणे व चांगल्‍या दर्जाचे शिक्षण मोफत मुलांना उपलब्‍ध करून देणे या उदैशाने पूर्ण वर्षभर शिक्षक, विदयार्थी, गृहीणी अशा सर्वाना मोफत इंग्रजी प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासाठी केवळ 

https://zezul.courses.store/321314?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp ट्रान्‍स हे प्‍ले स्‍टोअर वरील ॲप इन्‍स्‍टॉल करून त्‍यामध्ये केवळ लॉगीन केल्‍यानंतर आपल्‍याला हवी ती बॅच आपण सिलेक्‍ट करुन केवळ 5 रुपयांत हँडलींग फी भरून नोंदणी फी भरून   

इग्रजी वर्षभर मोफत शिकावयाचे आहे. ज्‍यांना व्‍हॉलेंटियर म्‍हणून काम करावयाचे आहे असे लोक सुध्दा या उपक्रमात आपल्‍या ज्ञानाचा फायदा करून देवू शकतात. अधिक माहिती साठी 83292 64505 या क्रमांकावर 

व्‍हॉटस्‌अप केल्‍यावर आपणास या मोफत कोर्सची लिंक दिली जाणार आहे. पूर्वा सांगते की आजोबा स्‍वातंत्र्य सैनिक, बाबा शिक्षक, आई उदयोजिका या सर्वात मुंबईत रूपारेल कॉलेजमध्ये शिकताना व बॉलीवुड चित्रपटाचे व्‍हिएफएक्‍स चे काम मी करीत असुन आपल्‍या 

भागातील मुले पर्सनॅलीटी डेव्‍हलपमेंट व इंग्रजी स्‍पिकिंग मध्ये कमी पडतात असा अनुभव आल्‍याने अशा ॲपची निर्मिती करण्याची प्रेरणा मिळाली व या प्‍लॅटफॉर्म व्‍दारे ऑनलाईन पण प्रत्‍यक्ष कमी इंटरनेटचा वापर करून लेखकांना विदयार्थ्यांची भेट घालून देण्याचे कार्य मला करावययाचे आहे अशी भावना पूर्वा ने व्‍यक्‍त केली. पूर्वा किणे 

ही जीजीपीएस ची विदयार्थीनी असुन सध्या ती हिंदी चित्रपटांचे व्‍हिएफएक्‍स चे काम मुंबईत करीत असून आपल्‍या जन्‍मभूमीचे आपण देणे लागतो या भावनेने तीने हा प्रोजेक्‍ट हाती घेतला आहे. अभ्यासकांनी यामध्ये अजुन काही सुचना असल्‍यास त्‍या 89990 88923 या क्रमांकावर कळवाव्‍यात अशी विनंती पूर्वा ने केली आहे. यापूर्वी लॉकडॉवून मध्ये 3000 पेक्षा अधिक महिलांना कॉम्‍प्‍युटरचे शिक्षण पूर्वाने ऑनलाईन दिले होते. तिने मराठी चित्रपटात अभिनय व दिग्‍दर्शन सुघ्दा केला आहे.



विनंती- सदर वृत्‍त प्रसिध्द केल्‍यानंतर कृपया इ लिंक आम्‍हाला दिल्‍यास मला खूप आनंद होईल.

जागतिक महिला दिनानिमित्त मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

 जागतिक महिला दिनानिमित्त मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

महिला सक्षमीकरणास प्राधान्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. ५: राज्य शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवित असून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. हे सर्वसामान्यांचे सरकार असून महिला सक्षमीकरणास सर्वोच्च प्राधान्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

            जागतिक महिला दिनानिमित्त अंधेरी येथील मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, अभिनेत्री अरुणा इराणी, डॉ.भारत बालवल्ली, वीर सेनानी फाऊंडेशनचे कर्नल पत्की यांचा सत्कार करण्यात आला. मुक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा स्मिता ठाकरे यांचेसह मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

            देशासाठी अनेक कर्तृत्ववान महिलांनी आपले मौलिक योगदान आहे. राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी तसेच महिला भगिनींना ताकद देण्यासाठी मी भावासारखा पाठीशी उभा राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली. आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने अनेक जण कार्यरत असतात. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे कार्य 'मुक्ती फाऊंडेशन' सारख्या संस्था करीत आहे़, असे सांगून महिला सबलीकरणासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा सन्मान मुक्ती फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या संस्थेचे कौतुक केले.

            महिला भगिनींनी ठरवलं तर अशक्य काम शक्य करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. माता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ही आपल्यासाठी आदर्श उदाहरणे आहेत. देशाच्या प्रमुखपदी दोन महिला राष्ट्रपती म्हणून आजवर विराजमान झाल्या आहेत, ही आपल्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे, असे असे सांगून मुक्ती फाउंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षास व आज सन्मानित झालेल्या महिलांचे अभिनंदन करुन मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

महिला सबलीकरणासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्या कार्याचा तसेच देशसेवेत आपले प्राण अर्पण करणाऱ्या शहीद वीरांच्या वीरपत्नी व वीरमातांचा तसेच सुरक्षा दलातील कर्तृत्ववान महिलांचा यावेळी मुक्ती फाउंडेशनच्यावतीने सन्मान करण्यात आला.


 

Sunday, 5 March 2023

इरई नदी स्वच्छतेसाठी त्वरित पावले उचलणार

 इरई नदी स्वच्छतेसाठी त्वरित पावले उचलणा


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई दि. 3 : चंद्रपूर शहरातून वाहणाऱ्या इरई नदीच्या स्वच्छतेसाठी नदीतील गाळ व झुडपे पावसाळ्यापूर्वी काढण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितले.


            चंद्रपूर जिल्ह्यातील इरई नदीचे पुनरूज्जीवन आणि खोलीकरणाबाबत सदस्य अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.


            उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यापूर्वी २०१६ ते २०१८ मध्ये शहरास समांतर वाहणाऱ्या इरई नदीतील 7 किमी अंतरामध्ये ६०० स.घ.मी. गाळ व झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली आहे. अधिकचा गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी गतीने करण्यात येईल. तसेच, यापूर्वी झालेल्या कामांमध्ये अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड च्या माध्यमातून निधी वापरण्यात येईल. कामाचा दर्जा व गुणवत्ता तपासणी केल्यानंतरच देयके अदा करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुधाकर आडबाले, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केले.



अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय

 अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय


- महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा.

            मुंबई, दि. 3 : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्के तर मदतनीस यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले.


            राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री कुणाल पाटील, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, अतुल भातखळकर, आदिती तटकरे यांनी उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, अंगणवाड्यांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच नवीन मोबाईल खरेदीही करण्यात येत आहे. या मोबाईल ॲप मध्ये 'ट्रॅक ॲप' आहे त्यामध्ये माहिती अद्ययावत करत असताना नाव इंग्रजीत भरले असले, तरीही उर्वरित सर्व माहिती मराठीमध्ये भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.


००००

दोन वर्षांत राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणार

 दोन वर्षांत राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणार


महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करतानाच सामान्य माणसाच्या हिताच्या निर्णयांना प्राधान्य


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही


            मुंबई, दि. 3 : “महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांत महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे राज्याचे वेगळे चित्र देशापुढे उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या सर्व दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार असल्याची” ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.


            राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री अतुल भातखळकर, संजय कुटे, श्रीमती यामीनी जाधव, सुरेश वरपुडकर, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, अबु आझमी आदी सदस्यांनी चर्चेत भाग घेतला होता.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्य सरकारने सुरू केलेली कामे प्रगतीपथावर आहेत. गेल्या सात महिन्यात राज्य शासनाने घेतलेले निर्णय सामान्य माणसाच्या हिताचे आहेत. समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो, एमटीएचएल, कोस्टल रोड, आपला दवाखाना यासारख्या लोकोपयोगी प्रकल्पांच्या माध्यमातून विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे. सिंचनाच्या एकूण २३ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यामुळे ५.२१ लाख हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.


            विविध नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांना सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. राज्यातील ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना महामंडळातर्फे विनामूल्य बस प्रवास योजना सुरू केली. आतापर्यंत ५ कोटी ६५ लाख ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे. मोफत उपचारासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला असून मुंबईमध्ये १६० ठिकाणी आपला दवाखाना सुरू झाले असून त्याचा सात लाख नागरिकांनी उपचार घेतले आहेत. येत्या ३१ मार्च पर्यंत अजून २०० दवाखाने सुरू करण्यात येणार असून पुढील आर्थिक वर्षांत राज्यात ५०० आपला दवाखाना सुरू होतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            माता सुरक्षित घर सुरक्षित योजनेतंर्गत माताभगिनींच्या आरोग्याची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली. त्याद्वारे सुमारे ४.५० कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ‘जागृक पालक सुदृढ बालक’ अभियान सुरू केले आहे. त्यामध्ये ० ते १८ वयोगटातील सुमारे २ कोटी मुला-मुलींची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये मेट्रो दोन लाईन चा शुभारंभ केला. जनतेला सुखकर प्रवासासाठी प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत ६० लाख प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला आहे.मुंबईमध्ये ३३७ कि.मी. मेट्रोचे जाळे पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परिक्षेसाठी सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला आहे. सर्व सदस्यपदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. मुलाखतीच्या दिवशीच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. लोकसेवा आयोगाच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


            समृद्धी महामार्ग हा केवळ काही शहरांना जोडणारा महामार्ग नाही. या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्याही आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे. स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. समृद्धी महामार्ग शिर्डीपर्यत सुरू झाला आहे. १० लाख प्रवासी वाहनांनी त्याचा लाभ घेतला आहे. समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू करीत आहोत. एमटीएचएल प्रकल्प, कोस्टल रोड, मुंबई पुणे मिसिंग लिंक यासारख्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे राज्याचा नावलौकिक होणार आहे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, राज्यातील युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाच्या नियंत्रणाखालील आस्थापनांवरील ७५ हजार रिक्त पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला आहे. त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महारोजगार मेळाव्याला खाजगी उद्योजकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्याद्वारे हजारो बेरोजगारांना रोजगार मिळत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.


            मुंबईत ४५० कि.मी. च्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. येत्या दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रेल्वे, रस्ते, शहर विकासाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


०००००



शाळांमधून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करावी

 शाळांमधून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करावी.

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे.

            मुंबई, दि. 3 : शाळांमधील स्वच्छतागृहांमध्ये वाढ करण्याबरोबरच शाळांमधून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करावी. त्यासाठी एक प्रमाणित संचालन प्रक्रिया (standard operating procedure- SOP) तयार करावी, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.


            अनुदानित शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा आणि विवक्षित शाळांशी संबधित काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी विधान भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.


            या बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, उपसचिव समीर सावंत उपस्थित होते.


            शालेय शिक्षण विभागाशी संबधित अनेक मुद्दे विधान परिषदेत उपस्थित होत असतात, असे सांगून डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, अनुदानित शाळांमधून विद्यार्थी संख्येनुसार स्वच्छतागृहे, मुलींसाठी स्वच्छता गृहात सॅनिटरी पॅड टाकण्यासाठी कचरा पेटीची व्यवस्था यासारख्या प्राथमिक बाबींची काळजी घेतली जावी. त्याच बरोबर विद्यार्थी मनावर संस्कार करणारे शारीरिक शिक्षण, गीताई, कथामाला, श्लोकपठनासारखे पूर्वी राबविले जात असलेले इतर संस्कारक्षम उपक्रम राबविण्यास सुरुवात करावी.


            शिक्षणाची गुणवत्ता राखली जावी यासाठी कार्यरत असलेल्या 'गुणवत्ता शिक्षण समिती'च्या सूचनांचा नियमितपणे अहवाल मागवून त्यावर अंमलबजावणी व्हावी. संवेदनशील किशोरवयीन मनावर होणारे परिणाम लक्षात घेता प्रशिक्षित समुपदेशक नेमणे आवश्यक आहे.


             क्रीडा प्रशिक्षक, संगीत शिक्षक या शाळांमध्ये असले पाहिजेत. काही उपक्रम ऑनलाईन घेता येतील. निधीची अडचण दूर करण्यासाठी उद्योगमंत्री यांच्या समन्वयाने उद्योग क्षेत्राला आवाहन करुन त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.


            स्वयंअर्थसहाय्यित शाळा कायदा लागू होण्यापूर्वी सुरु असलेल्या 107 शाळांपैकी आता 24 विवक्षित शाळा सुरु आहेत. या शाळांच्या बाबतीतील अहवाल शिक्षण आयुक्तांकडून मागवून घेऊन तपासून बघावा. या शाळांना अनुदान देण्याबाबत सकारात्मक विचार करण्याच्या सूचनाही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.


00000



Featured post

Lakshvedhi