Wednesday, 1 March 2023

काहीही झाल तरी मम्मी इज मम्मीच


 

कुष्ठरोग निर्मूलन व पुनर्वसन संदर्भात धोरण ठरविणार

 कुष्ठरोग निर्मूलन व पुनर्वसन संदर्भात धोरण ठरविणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 28 : राज्यातील कुष्ठरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. कुष्ठ रुग्णांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती, त्यांचे पुनर्वसन यासंदर्भात समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीच्या अहवालानुसार सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.


            कुष्ठरोगी यांचे पुनर्वसन याबाबत सदस्य सर्वश्री जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, योगेश सागर, राजेश टोपे, प्रणिती शिंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, कुष्ठरोगाचे लवकर निदान व्हावे, तसेच त्यांना योग्य उपचार उपलब्ध व्हावेत, रुग्णांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल. तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रलंबित अनुदान तातडीने देण्यात येईल.


            सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत म्हणाले, सन 2019-20 मध्ये 16 हजार 531 नवीन कुष्ठ रुग्णांचे निदान होऊन त्यांना उपचाराखाली आणण्यात आले. सन 2020-21 व सन 2021-22 मध्ये कोरोनाच्या महामारीमुळे प्राथमिक अवस्थेतील ज्या कुष्ठ रुग्णांचे निदान होवू शकले नाही, असे 17 हजार 14 कुष्ठरुग्ण सन 2022-23 मध्ये विविध उपक्रम प्रभावीपणे राबविल्यामुळे जानेवारी 2023 अखेर शोधण्यात आले. 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत आठ कोटी 66 लाख 25 हजार 231 लोकसंख्येची आशा व पुरूष स्वयंसेवकांमार्फत तपासणी करण्यात आली. या कालावधीत 6 हजार 731 कुष्ठ रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात आले. यामुळे ज्या व्यक्तीला कुष्ठरोग आहे,परंतु त्याची त्यांना जाणीव नव्हती, अशा व्यक्तींचे निदान करण्यात यश आले आहे. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्यात कुष्ठरोग निर्मूलनाची मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी सभागृहात दिली.

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना31 मार्चपूर्वी नुकसान भरपाई देणार

 विधानसभा इतर कामकाज :

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना31 मार्चपूर्वी नुकसान भरपाई देणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. 28 : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी 755 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, त्या शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वी अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.


            याबाबत सदस्य प्रकाश सोळंके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी 3 हजार 300 कोटींची अतिरिक्त मागणी आहे. यामध्ये तांत्रिक समितीद्वारे वैधता तपासण्यात येईल. शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी दिल्या जाणाऱ्या 6 हजार 800 कोटींपैकी 6 हजार कोटींचे वाटप झाले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत अनुदानापोटी 4 हजार 700 कोटी वितरित करण्यात आले असून जवळपास 12 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मल्टी मीडिया ॲण्ड साऊंड शो' च्या माध्यमातूननव्या पिढीला होईल इतिहासाची माहिती

 मल्टी मीडिया ॲण्ड साऊंड शो' च्या माध्यमातूननव्या पिढीला होईल इतिहासाची माहिती


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. २८ : 'मल्टी मीडिया अॅण्ड साऊंड शो' च्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या इतिहासाची माहिती मिळेल. २८ फेब्रुवारी १९४८ रोजी ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी भारत सोडून गेली. गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे, यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.


            गेट वे ऑफ इंडिया येथे राज्य शासनाचा पर्यटन विभाग, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'मल्टी मीडिया अॅण्ड साऊंड शो' चे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.


            यावेळी केंद्रीय मंत्री (पेट्रोलियम व नैसर्गिक वायू) हरदीपसिंह पुरी यांनी लाइट ॲड साउंड शो शुभारंभ प्रसंगी व्हीडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.


            पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, इंडियन ऑईलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य, निदेशक (विपणन) इंडियन ऑइल व्ही. सतीश कुमार, पर्यटन संचालनालयाचे संचालक, डॉ. बी. एन. पाटील यावेळी उपस्थित होते. भारतीय नौदलाच्या वाद्यवृंदाने राष्ट्रगीत, राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.        


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी भारत सोडून गेली. गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीकोनातून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशभरात विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेट वे ऑफ इंडिया येथे 'मल्टी मीडिया अॅण्ड साऊंड शो' सुरु करण्यात येत आहे. ब्रिटीश सैन्याच्या भारतातून शेवटच्या प्रस्थानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आजपासून हा शो' आयोजित केला आहे. याचा मुंबईतील नागरिक लाभ घेतील.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गेट वे ऑफ इंडिया मुंबईतील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. इंडियन ऑईल कंपनीने हा शो आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतिहासाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचेल. मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला हा लेझर शो उत्कंठावर्धक वाटण्यासाठी पर्यटन विभागाने अधिक प्रयत्न करावेत.




मल्टी मीडिया अॅण्ड साऊंड शो' अभिमानाची गो
ष्ट


- केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी


            केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी म्हणाले की, दि. २८ फेब्रुवारी, १९४८ रोजी ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी (The Somerset Light Infantry) भारत भूमी सोडून गेली. या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मुंबई शहराची जगात एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळख आहे. संपूर्ण जगभरातील पर्यटक या शहराला वर्षभर भेटी देत असतात. गेट वे ऑफ इंडियाच्या वैभवात भर टाकण्यासाठी पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, केंद्र सरकार यांच्या समवेत झालेल्या सामंजस्य करारानुसार 'मल्टी मीडिया अॅण्ड साऊंड शो' इंडियन ऑईलमार्फत पुढील पाच वर्षे सुरू राहणार आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.


            पर्यटन मंत्री श्री. लोढा म्हणाले की, आजच्या मल्टीमीडिया अॅण्ड साऊंड शो कार्यक्रमामुळे भारतातून शेवटचे इंग्रज बटालियन परत गेले हे सर्व भारतीयांना कळेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही मूळ संकल्पना आहे. आज हा कार्यक्रम सुरू करताना खूप आनंद होत आहे. दर शनिवारी आणि रविवारी हा शो सुरु राहणार असल्याचेही पर्यटन मंत्री श्री. लोढा म्हणाले. इंडियन ऑईलचे अध्यक्ष श्री.वैद्य म्हणाले की, इंडियन ऑइल देशातील प्रत्येक माणसाशी जोडली गेलेली आहे. व्यापाराच्या पुढे जाऊन पर्यावरण संवर्धनासाठी इंडियन ऑइल काम करित आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात इंडियन ऑइल मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे मल्टीमीडिया अॅण्ड साऊंड शो च्या माध्यमातून जोडली गेली, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.येथे आयोजित केलेले शो ‘प्रगतीशील भारत’ या संकल्पनेवर आधारित आहेत. स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे महत्त्व यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हा शो मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेत असून हेडसेट घातल्यानंतर जपानी, जर्मन, फ्रेंच, रशियन या भाषेतून देखील ऐकता येणार आहे.


00000





प त नी, हास्य कविता


 

Tuesday, 28 February 2023

डायलिसिस सेंटर

 


आभाळ माया

 एकदा प्रविण दवणेंनी शांताबाई शेळके यांना विचारले की तुम्ही तुमच्या एका कवितेत आकाश आणि आभाळ असे दोन शब्द वापरलेयत... दोन्हींचाही अर्थ पहायला गेला तर एकच आहे... मग असे दोन वेगळे शब्द का ..?

     

शांताबाईंनी किती सुंदर उत्तर दिले पहा..

त्या म्हणाल्या...चुकतोयस तू प्रविण...


 जे निरभ्र असते ते आकाश..आणि.. ..जे भरून येते ते आभाळ..!!

   

आणि म्हणूनच त्या निसर्गाच्या... त्या भगवंताच्या असीम कृपेला, त्याच्या मायेला आकाशमाया नाही तर आभाऴमाया म्हणतात ..!!

#मराठी_भाषा_दिन

Featured post

Lakshvedhi