Monday, 27 February 2023

कला का री


 

मायटेक्स" एक्स्पोला लाखांवर नागरिकांची भेट, कोट्यावधी रुपयांची ऊलाढाल

 मायटेक्स" एक्स्पोला लाखांवर नागरिकांची भेट, कोट्यावधी रुपयांची ऊलाढाल




महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि राज्य सरकारतर्फे भव्य एक्स्पो संपन्न


मुंबई : राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रीकल्चर, महाराष्ट्र सरकारचा उद्योग विभाग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा तर्फे ब्रांदा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई येथे झालेल्या "महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो ला एक लाखांहून अधिक नागरिकांनी भेट दिली. या एक्स्पोमध्ये कोट्यावधी रुपयांची ऊलाढाल झाली. महाराष्ट्र चेंबरने आयोजित केलेल्या एक्स्पोचे कौतुक नागरिकांनी केले.


                मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मायटेक्स एक्स्पोचा भव्य शानदार सोहळा संपन्न झाला होता. देशात गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’ झाले आहे. राज्य सरकार उद्योग वाढीसाठी योग्य आणि सकारात्मक निर्णय घेत आहे. दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत १ लाख ३७ हजार कोटींची गुंतवणूक झाली. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले उदघाटन प्रसंगी केले होते.


                एक्स्पोच्या समारोपाप्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबरतर्फे राज्यातील व्यापार आणि उद्योगाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. देशभरातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांना व्यापारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी मायटेक्स एक्स्पो ही एक पर्वणीच ठरली आहे. महाराष्ट्र चेंबरतर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध उद्योगांतील सहभागींना एकाच छताखाली आणून ग्राहकोपयोगी वस्तूंपासून ते यंत्रसामग्रीपर्यंतचे प्रदर्शन पाहण्यास मिळाले. प्रेक्षकांशी संवाद साधणे आणि विक्री करणे हे व्यापार प्रदर्शनाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी आणि रिटेल क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठच लाभले. 


                मायटेक्समुळे महाराष्ट्रातील उद्योग, व्यापाराचा प्रचार, प्रचार होऊन पोषण वातावरण निर्माण होऊन देशात एक नंबरचे राज्य बनविण्यात महत्वपूर्ण ठरेल. राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी आणि रिटेल क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठच मिळाले, अशा प्रतिक्रिया प्रदर्शनाला भेट दिलेल्या नागरिकांनी दिल्या. या एक्स्पोमध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, जम्मू काश्मीर, राजस्थान आणि राज्य, देश आणि परदेशातील व्यापारी उद्योजक सहभागी झाले.


                महाराष्ट्र चेंबरचे चीफ पेट्रन कांतीलाल चोपडा, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापकीय संचालक प्रवीण राघवेंद्र, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, महाराष्ट्र चेंबरच्या विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, करुणाकर शेट्टी, शुभांगी तिरोडकर, सुधाकर देशमुख, रवींद्र माणगावे, चंद्रशेखर पुनाळेकर, तनसुख झांबड, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे आदींनी संयोजन केले.

हरवली हरवली पाखरे


मराठी माणसाला काय येते

 👤 मराठी माणसाला काय येते?


👤 मराठी माणसाला भारतीय राज्यघटना लिहिता येते.

🚂 मराठी माणसाने हिन्दुस्थानात पहिली रेल्वे सुरू केली ते नाना शंकरशेट 

👤 मराठी माणसाला पहिला Indian Idol बनता येते.


👤 मराठी माणसाला पहिला करोडपती बनता येते.


👤 मराठी माणसाला पहिली नच बलिये विनर बनता येते.


👤 मराठी माणसाला 🏤स्वराज्य उभं करता येते.


👤 मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते.


👤 मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं.


👤 मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो.


👤 मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी बनता येतं.


👤 मराठी माणसाला संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा काढता येते.


👤 मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं.


👤 मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं.


👤 मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं.


 लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी. 

अभिमान बाळगा 'मराठी' असल्याचा.

🚩 🚩 🚩

😎 😎 😎


का 'मी मराठी' ?

- मी 'मराठी' आहे कारण...

- घरी येताना पिझ्झा खाल्ला तरी,

वरण-भात, साजूक तुपाशिवाय माझं पोट भरत नाही.


- मी 'मराठी' आहे कारण...

- ख्रिसमस, NEW YEARच्या जरी पार्ट्या मित्रांसोबत केल्या तरी,

घरात 'पाडवा'साजरा करतोच.


- *मी 'मराठी' आहे कारण...*

- जाम, सॉस कितीही आवडत असले तरी,

चटणी-लोणच्याचे ५-७ प्रकार तरी घरात सापडतील.


- मी 'मराठी' आहे कारण...

- रागाच्या भरात/चेष्टेत मित्रांना कितीही इंग्लिशमध्ये शिव्या दिल्या तरी,

*ठेच लागल्यावर 'आई गं' हेच शब्द तोंडात येतात*.


- मी 'मराठी' आहे कारण...

- हॉटेलमध्ये पैसे द्यायला जरी मागे रहात असलो तरी,

मित्रास त्रास देणा-याच्या ४-५ थोबाडात लावण्यास कमी पडणार नाही.


- मी 'मराठी' आहे कारण...

- 'छत्रपती शिवाजी महाराज की'

हे ऐकल्यानंतर माझ्या तोंडून आपसूक 'जय' आल्याशिवाय राहत नाही.


- मी 'मराठी' आहे कारण...

- कितीही 'HIGH LIVING' असलो तरी,

हात जोडून 'नमस्कार' बोलल्याशिवाय माझी 'ओळख' होत नाही.


- मी 'मराठी' आहे कारण...

- कितीही 'BRANDED PERFUMES' वापरले तरी,

'उटण्या'शिवाय माझी 'दिवाळी' साजरी होत नाही.


- मी 'मराठी' आहे कारण...

- गाडीतून जाताना 'मंदिर' दिसलं

कि,

आपोआप 'हात' जोडल्याशिवाय मी राहत नाही.


माझ्यातले 'मराठी'पण जोपासण्याची मला गरज नाही.

ते *माझ्या 'रक्तात' भिनलंय*.


आणि...


या 'मराठी'पणाचा मला खूप खूप 'गर्वच'' आहे.

🚩जय हिंद ! जय महाराष्ट्र !!!🚩

मराठी एक गंमत जंमत

 *━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━*

         *꧁ मराठी एक गंमत ꧂*

          *❀ शब्द एक, अर्थ अनेक ❀*

*━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━*


*_संकलन : मिलिंद पंडित, कल्याण_*


मध्यंतरी माझ्याकडे एक तामिळ मुलगी मराठी शिकायला येत असे. असेल आठवी नववीत. पण चेन्नईहून थेट पुण्याला. मग मराठीचा गंध कसा असणार? थोडं शिकवल्यावर मी तिला काही छोटी पुस्तकं वाचायला दिली होती. एकदा तिने काही अडलेले शब्द लिहून आणले. तीन चार शब्दांचे अर्थ सगितले. शेवटचा शब्द होता, लाव/लावणे.


मी तिला म्हटलं, "अगं, वाक्य लिहून आणायचंस, नुसता अर्थ कसा सांगू? एका शब्दाचा अर्थ काहीही असू शकेल?"


तिला कळेना !


"ओके, टेल मी ऑल द मीनिंग्ज" ती म्हणाली.


तिला वाटलं, असतील दोन तीन अर्थ. पण मराठीचा इंगा तिला अजून कळायचा होता. मी मनात म्हटलं, चला, आजचा वेळ या *लावालावी* तच घालवू.


"हे बघ, तू मराठीचा क्लास *लावला* आहेस !"


"ओह्, आय हॅव जॉइंण्ड द क्लास" लगेच वहीत क्लास *लावणे* = जॉइंन असं लिहिलं.


"क्लासला येताना तू आरशा समोर काय तयारी केलीस? पावडर *लावलीस*?"


"ओ येस !"


"आपण पार्टीला, फंक्शनला जाताना लिपस्टिक, कुंकू, टिकली *लावतो* ?"


"येस, आय अंडरस्टँड, टु अप्लाय." तिनं लिहिलं. "पण आपण केसांना पिन्स, हेअरबॅंड ही *लावतो* तिथे तो अर्थ होत नाही".


"ओके, वी पुट ऑन दॅट !"


"आता बघ. मी चहाचा कप तोंडाला *लावला* आणि बेल वाजली. कालच्या तुझ्या पुस्तकात गाईने चाऱ्याला तोंड *लावलं* !"


"आपण बाळाच्या गालाला हात *लावतो*, इथे काय? प्रत्यक्ष स्पर्श करतो. टच् !"


चौथा अर्थ लिहिता लिहिता तिची ट्यूब पेटली. म्हणाली, "हां, तुम्ही पार्क मधला बोर्ड वाचून दाखवला ना त्यादिवशी, फुलांना हात *लावू* नये. आणि त्या छोट्याला त्याची आई म्हणाली ना, पुस्तकाला पाय *लावू* नको. सो टु टच्"


"मॅम, मी आले तेव्हा यू टोल्ड मी दार *लाव*. मीन्स शट् द डोअर"


"हो! दार *लाव* किंवा दार बंद कर म्हणजे तेच".


"मीन्स लाव, बंद कर सेम. पण मग तुम्ही दिवा *लावते* म्हणता, देअर इट इज ऑपोझिट ऑफ दिवा बंद कर."


"बरोबरच आहे. कारण दाराच्या बाबतीत *लाव* = शट् = बंद कर. पण दिवा *लाव* = स्विच ऑन.


म्हणूनच तुला म्हटलं, "वाक्य लिहून आण बाई. संदर्भ नि रेफरन्स शिवाय नुसता *लाव* कसा समजणार?"


"आणखी खूप ठिकाणी *लावणे* हे व्हर्ब आपण वापरतो, पण तुला आत्ताच एवढ्या गोंधळात नाही टाकत."


"नो, नो. प्लीज टेल मी मोअर". म्हणत ती उत्साहानं सरसावून बसली.


"बरं! आता अपण इलेक्ट्रिकचा दिवा, टीव्ही, रेडिओ इ. *लावतो* तेव्हा 'स्विच ऑन' करतो. पण देवा समोर नीरांजन, उदबत्ती, समई लावतो तेव्हा काय करतो? 'लाइट ऑन' पेटवतो, फटाके *लावतो*, आग *लावतो*, गॅस *लावतो* = पेटवतो" ती भराभरा लिहून घेत होती.


तेवढ्यात आतून कुकरची शिट्टी आली. "बघ, मी कुकर *लावलाय*" दोघी हसलो. "आधीचा कुठला अर्थ आहे का यात?"


"खरं तर यात अनेक क्रिया आहेत. सगळ्याला मिळून एक सुटसुटीत शब्द *लावलाय*. आंघोळीचं पाणी *लावलंय* मधे असंच."


"मी रोज सकाळी अलार्म *लावते*" ती अचानक म्हणाली आणि हसत सुटली. "ओह्! एव्हरीथिंग इज सो डिफरंट."


"सो कनक्लूजन? एव्हरी *लाव* इज डिफरंट."


जिगसॉ पझल घेऊन बसलेल्या नातवाला मी हाक मारली. तर तो म्हणाला, "थांब गं आजी ! मी हे *लावतोय* ना!"


"हे, लुक. तो *लावतोय* = ही इज अरेंजिंग द पीसेस, टु अरेंज".


"तो शहाणा आहे. वह्या नि पुस्तकं कपाटात नीट *लावून* ठेवतो. कपाट छान *लावलेलं* असतं त्याचं".


वहीत लिहून घेऊन ती उठली, 'गुड बॉय' असं त्याचं कौतुक करून ती घरी गेली. पण माझं विचारचक्र चालूच राहिलं. आता मनाच्या अदृश्य स्क्रीनवर *लाव, लावते, लावले* हे सगळं बोल्ड मधे यायला लागलं. 


रोजच कोणालातरी आपण फोन *लावतो*.


बडबड, कटकट करणाऱ्यांना आपण म्हणतो, "ए, काय *लावलंय* मगा पासून?"


आजीने कवळी *लावली* = फिक्स केली आणि आजी कवळी *लावते* म्हणजे रोज वापरते. (यूज)

पट्टा *लाव* = बांध. बकल, बटन *लाव* = अडकव.


बिया *लावणे*, झाडे *लावणे* = पेरणे, उगवणे.


इतके इतके मजूर कामाला लावले (एम्प्लॉइड).

वजन ढकलणारा, ओढणारा नेट/जोर *लावतो* (अप्लाइज स्ट्रेंग्थ). आपण वडिलांचं, नवऱ्याचं नाव *लावतो* म्हणजे काय करतो?


सुंदर गोष्ट मनाला वेड *लावते* या शब्दांच्या खेळानंही मला वेड *लावलं*.


इतक्यात आमची बाई आली. आल्या आल्याच म्हणाली, "विचारलं काहो सायबांना?' (मुलाच्या नोकरी बद्दल).


"विचारलं की, पाठव म्हणाले उद्या !"


"हा, मंग देते त्याला *लावून* उद्या" (ओहो! लावून देते = पाठवतो)


आणि *लावालावी* मधे तर कोण, कुठे काय *लावेल* !


अशी आपली ही मायमराठी ! शिकणाऱ्याला अवघड, पण आपल्याला सुंदर !


"आता, हे आर्टिकल ग्लोबल मराठीवर *लाव*" घरच्यांनी सल्ला दिला.


"आणि नाही *लावलं* तर मनाला *लावून* घेऊ नको" अशी चेष्टाही केली.

मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐

मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा 💐

 💐 सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा 💐


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी

एवढ्या जगात माय मानतो मराठी


आमुच्या मनामनात दंगते मराठी

आमुच्या रगारगात रंगते मराठी

आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी

आमुच्या नसानसात नाचते मराठी


आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी

आमुच्या लहानग्यात रांगते मराठी

आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी

आमुच्या घराघरात वाढते मराठी


आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी

येथल्या दिशादिशात दाटते मराठी

येथल्या नगानगात गर्जते मराठी


येथल्या दरीदरीत हिंडते मराठी

येथल्या वनावनात गुंजते मराठी

येथल्या तरुलतात साजते मराठी

येथल्या कळीकळीत लाजते मराठी


येथल्या नभामधून वर्षते मराठी

येथल्या पिकांमधून डोलते मराठी

येथल्या नद्यांमधून वाहते मराठी

येथल्या चराचरात राहते मराठी


पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी

आपुल्या घरात हाल सोसते मराठी

हे असे कितीक खेळ पाहते मराठी

शेवटी मदांध तख्त फोडते मराठी


कवी - सुरेश भट

पद

 


Featured post

Lakshvedhi