Wednesday, 11 January 2023

गुरे - ढोरे रस्त्यावर ने - आण करण्यासंदर्भातआता कैदेऐवजी दंडाची तरतूद.

 गुरे - ढोरे रस्त्यावर ने - आण करण्यासंदर्भातआता कैदेऐवजी दंडाची तरतूद.

            गुरे - ढोरे रस्त्यावर ने - आण करण्यासंदर्भात आता कैदेऐवजी दंडाची तरतूद करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 


            राज्यातील कायदे व नियम इत्यादींमध्ये असलेल्या शिक्षेच्या तरतुदींमध्ये निर्दोषीकरण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1959 मधील कलम 163 (1) यातील गुरे - ढोरे रस्त्यावर नेणे-आणणे शिक्षेच्या तरतुदी कमीत कमी करण्यासंदर्भात दुरुस्ती करण्यात येईल.

राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेचा बक्षी समितीचा अहवाल स्वीकारला.

 राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या

वेतन सुधारणेचा बक्षी समितीचा अहवाल स्वीकारला.

            राज्य वेतन सुधारणा समिती (बक्षी समिती) चा अहवाल खंड-2 स्वीकारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे अनेक संवर्गाच्या वेतन त्रुटी दूर होऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल. यामुळे 240 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडेल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 


            केंद्रीय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार राज्य शासकीय व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत सुधारणा करण्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मागणी होत होती. त्यानुसार 17 जानेवारी 2017 रोजी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा कमिटी नेमण्यात आली. या समितीने अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून आलेल्या 3739 मागण्यांवर विचार केला. तसेच जानेवारी, फेब्रुवारी 2019 रोजी विविध विभागांशी सविस्तर चर्चा केली. या समितीने 5 डिसेंबर 2018 रोजी आपल्या अहवालाचा खंड 1 शासनास सादर केला व त्याची अंमलबजावणी झाली. बक्षी समितीच्या मूळ अहवालाचा खंड दुसरा 8 फेब्रुवारी 2021 रोजी सादर करण्यात आला, तो आज राज्य शासनाने स्वीकारला. सहाव्या वेतन आयोगातील त्रुटींबाबत तसेच सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतन संरचनेतील वेतनवाढीच्या मागण्या या समितीने एकत्रितरित्या विचारात घेतल्या आहेत. सुधारित वेतनस्तर हा 1 जानेवारी 2016 पासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात येईल. तसेच प्रत्यक्ष आर्थिक लाभ हा शासन आदेश ज्या महिन्यात निघेल त्या महिन्याच्या 1 तारखेपासून देण्यात येईल.


-----०-----

मच्छिमारांसाठी राज्यस्तरीय नुकसान भरपाई धोरण लवकरच

 मच्छिमारांसाठी राज्यस्तरीय नुकसान भरपाई धोरण लवकरच.

- मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार.

            मुंबई, दि. १० : राज्यातील विविध बांधकाम प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या मच्छिमारांसाठी राज्यस्तरीय नुकसान भरपाई धोरण लवकरच आणण्यात येणार असल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


            मत्स्यव्यवसाय विभागामार्फत तयार करण्यात येणाऱ्या धोरणासंदर्भातील बैठक आज विधान भवन येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव तथा आयुक्त अतुल पाटणे यांच्यासह विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.


            श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मत्स्यव्यवसाय हा रोजगार देणारा व्यवसाय असल्याने राज्य शासन या व्यावसायिकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी पाठिशी असून यासाठीच हे धोरण ठरविण्यात येत आहे. राज्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने तसेच विविध निमशासकीय विभागांमार्फत बांधकाम विषयक विकास प्रकल्प राबविण्यात येतात, अशा प्रकल्पामुळे मच्छिमार बाधित होत असतात. याशिवाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या टीसीबी-3 प्रकल्पामुळे सुद्धा काही मच्छिमार बांधव बाधित होणार आहेत. त्यानुषंगाने सर्वकष राज्यस्तरीय नुकसान भरपाई धोरणाचा व्यापक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रकल्पबाधित मच्छिमारांना नुकसान भरपाई देताना आदर्श मार्गदर्शक प्रणाली वापरण्यात यावी. तसेच व्यावसायिक आणि पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांना यामध्ये नुकसान झाल्यास भरपाई देण्यात येणार आहे. प्रकल्प बांधकामामुळे मच्छिमारांच्या होणाऱ्या नुकसानीसाठी सहा श्रेणी निश्चित करण्यात याव्यात.


            मत्स्य व्यवसाय सचिव श्री. पाटणे यांनी राज्यस्तरीय नुकसान भरपाई धोरणासंदर्भातील सादरीकरण केले. लवकरच हे धोरण मंत्रीमंडळ बैठकीत मांडण्यात येणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.


0000


वर्षा आंधळे/विसंअ/

पालघर जिल्ह्यात 10 लाख वृक्ष लागवडीकरिता रोहयो आणि टाटा मोटर्स यांच्यात सामंजस्य करार.

 पालघर जिल्ह्यात 10 लाख वृक्ष लागवडीकरिता

रोहयो आणि टाटा मोटर्स यांच्यात सामंजस्य करार.

            मुंबई, दि. 10 : राज्याचा रोजगार हमी योजना विभाग आणि टाटा मोटर्स यांच्यामध्ये पालघर जिल्ह्यात 10 लाख वृक्ष लागवडीकरिता रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.


            मंत्री श्री. भुमरे यांच्या रत्नसिंधू या शासकीय निवासस्थानी हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी रोहयोचे अपर मुख्य सचिन नंदकुमार, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, उपसचिव संजना खोपडे, सहायक संचालक विजयकुमार कलवले, पालघर जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी समीर वाठारकर, टाटा मोटर्सचे प्रमुख विनोद कुलकर्णी प्रकल्प अधिकारी श्रीमती सोनपाल, बायफ प्रकल्पाचे सुधीर वागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


            रोहयो मंत्री श्री. भुमरे म्हणाले, विविध कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीचा वापर शासनाच्या योजना सोबत अभिसरण करण्याबाबत शासनाने वेळोवेळी सूचित केले आहे. टाटा मोटर्सच्या सीएसआर निधी मधून संपूर्ण पालघर जिल्ह्यातील 5 हजार आदिवासी लाभार्थींना प्रत्येकी 200 याप्रमाणे 10 लाख वृक्ष लागवडीचे रोहियोसोबत अभिसरण करण्याकरिता सामंजस्य करार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.


            टाटा मोटर्स ही कंपनी आपल्या सीएसआर मधून समाज उपयोगी कामे करीत असते. अशा समाज उपयोगी कामांपैकी पर्यावरण हा देखील एक घटक आहे. ही बाब लक्षात घेता कंपनी काजू, चिकू, सीताफळ, कढीपत्ता, बांबू यासारख्या फळझाडांची, पिकांची कलमे, रोपे तसेच खते उपलब्ध करून देते. मागील दोन वर्षात कंपनीने पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, वाडा, मोखाडा या ठिकाणी सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीच्या माध्यमातून अशी रोपे दिलेली आहेत.


            प्रामुख्याने अनुसूचित जमाती मधील लाभधारकांना याप्रमाणे कलमे उपलब्ध करून यावर्षी देखील जवळपास दहा लाख कलमांचा पुरवठा टाटा मोटर्स करणार आहे. साधारणत: प्रति झाड 40 रुपये किंमत लक्षात घेतल्यास ही रक्कम जवळपास चार कोटी रुपये इतकी होती त्याचप्रमाणे खतांची देखील उपलब्धता करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


            अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी सांगितले की, वृक्ष लागवड ही प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर, बांधावर तसेच शेतकऱ्याच्या पडीक जमिनीवर होणार आहे. प्रती शेतकऱ्यांना साधारणत: 200 झाडे उपलब्ध करून देणार असून यामध्ये आंबा, काजू, सीताफळ, चिकू अशी मिश्र झाडे लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


            अकुशल कामासोबतच मजुरांना रोजगार मिळणे, त्याचप्रमाणे कुशल कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यासाठी देखील याचा उपयोग होईल. कंपनी याप्रमाणे रोप तसेच खते उपलब्ध करून देण्यासोबतच मृत झाडे पुन्हा उपलब्ध करून देणार आहे. कंपनीच्या या धोरणामुळे पर्यावरण संरक्षणासोबतच लाभधारकांना याचा फायदा होणार आहे. उच्च प्रतीची कलमे शेतकऱ्यांना सहज मिळणार आहेत. आवश्यक ती खते देखील उपलब्ध होणार आहेत. त्यासोबतच शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यामुळे या प्रकल्पामुळे पर्यावरण संरक्षणासोबत मनरेगा कामांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होईल. याप्रमाणे निर्माण झालेले फळ - पिके यासाठी कंपनी बाजारपेठ व पुढील कामासाठी देखील कार्य करणार असल्याचे मंत्री श्री. भुमरे यांनी यावेळी सांगितले.


०००००

Tuesday, 10 January 2023

नाशिक मुलींसाठी सैनिक स्कूल

 




जय कुणबी

 जय कुणबी, आभार! आभार!! आभार!!!

न भूतो न भविष्यते असे कुणबी जोडो अभियान महाड व पोलादपूर तालुका कुणबी बांधवांनी दि.08/01/2023 रोजी प्रत्यक्षात घडवून आणले, म्हणून समस्त कुणबी बांधवांचे अभिनंदन आणि जाहीर आभार 🙏🙏 ,


👉 सदर अभियान कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, यांच्या संकल्पनेतून घडून आले.

ते प्रत्येक्षात साकार, शाखा महाड पोलादपूर आणि कुणबी समजोन्नती मंडळ यांचा सहकार्याने झाले.


👉या अभियानामुळे सक्रिय कुणबी कार्यकर्ते, महिला, पूरुष व युवा यांच्या मनात समाजपरिवर्तनाची नवीन चेतना निर्माण झाली आहे आणि नव्याने समाज उद्धार आणि जागृत करण्याचे बळ उत्पन्न झाले आहे.


🎯कुणबी समाजोन्नती संघ मुंबई

संघ अध्यक्ष-मा.भूषण बरे , 

उपाध्यक्ष -बबन उंडरे, सदानंद काष्टे, 

सहसचिव -गणेश मौले,अशोक करंजे, भास्कर चव्हाण, हरिश्चन्द्र पाटील,

संघ -प्रतिनिधी-जगन्नाथ कांदळेकर, सत्यवान यादव, सौं.मृणाल मंगेश हुमणे 


🎯कुणबी राजकीय संघटन समिती,

अध्यक्ष-अशोकजी वलम, कार्याध्यक्ष -कृष्णा कोबनाक, सचिव -नंदकुमार मोहिते,


🎯महाड पोलादपूर शाखा -

अध्यक्ष-नंत गवळकर, उपाध्यक्ष -विलास शिंदे,

सचिव - दीपक महाडिक, सहसचिव -एड. मंगेश हुमणे, शेखर कांदळेकर, राजेंद्र दवंडे, खाजिनदार -विजय गोडांबे , हिशोब तपसनीस -नितीन पाष्टे,

महिला मंडळ अध्यक्षा - जोती महाडिक, उपाध्यक्ष -दीपिका मौले, सचिव -विनया गोडांबे, श्रुती निंबारे,भारती पिचूर्ले, 

शंकूतला आरव, 

🎯कुणबी युवा -माधवजी कंबळे, सचिव -संतोष कांबळे , खजिनदार -विजय भोसतेकर, सचिन रामाने, 


🎯कुणबी समोजान्नती मंडळ

अध्यक्ष -प्रदीप लोखंडे, उपाध्यक्ष -किरीट पेंढारी, सहदेव धाडवे,

सचिव -विलास राक्षे, सहाचिव -शरद गोठलं, खजिनदार -दीपक गजमल,

🎯गट अध्यक्ष

दिलीप गोठलं -कारंजाडी, पांडुरंग भेकरे -दादली , संतोष घुलगुले -रवठळ, राजेंद्र भुवड -वोवले, सुनील भानत -विन्हेरे, सुदेश बाईत -महाड, धोंडीराम वाडकर - पोलादपूर, सुरेश शिगवण -नाते, अशोक आंबेकर -दसगाव

उपस्थित मान्यवर - नथुराम धामणे, सदानंद मांडवकर,गजानन काप, रमेश खिडबीडे , नामदेव लाल, सुभाष लाले, मृणालिनी फिलसे, जतीन गोरे, अनंत शिंदे, विक्रम मालप, रमेश नवले, संदेश गोठलं, आत्माराम दवंडे संजय रेशीम, गणेश खांबे, प्रफुल धोंडेगे, गणपत मालप, अश्विनी घरटकर, विजय पवार ,रामदास कदम, सूर्यकांत शिगवण, परशुराम गोठलं, बबन मोरे, काशीराम भुवड, उमेश उसगावकर, शांताराम पेंढारी, बाळा चांदी वडे, अशोक खांबे, गजानन वाडकर, प्रकाश देवळे, नथुराम पवार, गणपत पापले, अमृत मांडवकर, बाळाराम चव्हाण, वर्षा कालप, रेश्मा बैकर, मंगेश कालप,नामदेव घाणेकर, बबन जाबाडे, अरविंद घरटकर, एस. मोरे, मंगेश वनगुले, 


महाड पोलादपूर युवा-

अध्यक्ष -समीर रेवाले, सचिव -प्रदीप घाणेकर, संतोष जउल, खजिनदार - मितेश नवले, adv विशाल गोलंबडे, योगेश मालप, adv राजेश देवाले, मिलिंद चिबडे, सचिन देवळे, नैनेश बैकर, गजानन कदम, संदीप माने, इतेश खोपटकर, रवी कोबणाक, परेश बटावले, बबन सकपाळ, सचिन धाडवे, संतोष धारसे, गणेश खामकर, विजय भडवळकर, मदन आरव, 

 फोटोग्राफर -यतीन लाले

पत्रकार -नितेश लोखंडे


पुनच्छ सगळ्यांचे आभार!


चुकून कुणाचे नाव लिहायचे राहिले असेल तर त्याचें पण आभार.

धन्यवाद!


कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा महाड पोलदपूर 

कुणबी समाजोन्नती मंडळ, महाड पोलदपूर


टिप : काही सूचना असतील तर 7738442242, या नंबर वर कळवावे

*🌹कडी*🌹

 ♦️ *विचारपुष्प*♦️


          *🌹कडी*🌹


घराची ही साधी कडी. पण काम चोख. आतला सुरक्षित आणि बाहेर गेलेल्याला घर सुरक्षित आहे याची खात्री देणारी ही कडी खरं तर घराची देखणी नथच मानावी. ज्या घराला कडीकोंड्याच नाही ते घर सुरक्षित नाही. कडीशिवाय घर पुरं नाही. आजवर कडीकुलपांनीच स्थावर मालमत्ता सुरक्षित ठेवली. भित्र्या माणसांना कडी सुरक्षितता पोहोचवते. विशेषतः एकटी स्त्री घरात एकटी असेल तर ही कडीच तिला..... मै हूँ ना! असं बेलाशक सांगते. कडी नुसती कडी नसते तर आधारासाठी कायम खडी असते. आपली ती सुरक्षिततेची कवच कुंडल असते. अगदी रात्र घरात एकटे असू... आणि दार नुसतंच लोटलेलं असेल तर झोप लागता लागणार नाही. कडी तिचं काम फारच इमाने इतबारे करते. 

मनाच्याही दरवाज्यालाही अशा कड्या असाव्यात. वेळोवेळी त्या लावता याव्यात. सताड उघड्या घरात कोण कसं शिरेल आणि विध्वंस करुन जाईल याची नुसती कल्पना करा. आपण अस्वस्थ होतो. 


मन जर कायम असं सताड उघडं असेल तर.... कोणीही आपल्याला गृहीत धरून कसेही आपल्याशी व्यवहार करु लागतील. त्यांना जर थोपवायचे असेल तर... मनाची कडी मजबूत असावी. कोणालाही कसेही आपल्या मनात.... जीवनात डोकावता येणार नाही. बऱ्याचदा आपण मनाची कडी लावायला विसरतो आणि मग..... अनेक घोळ होतात. कडी ही आपल्या अस्तित्वासाठी आवश्यकच आहे. म्हणजे मग आपण फार कमी वेळा दुःखी होऊ. म्हणजे इतरही ठराविक अंतराने आणि अदबीने आपल्याशी वागतील.


बोलता बोलता कधी कधी आपण बेताल होतो. वाहवत जातो. पश्चात्ताप होतो. तोंडाला जरा कडी लावायला होती हे सहज विसरुन जातो. 


नेमकं आणि योग्य वेळी निर्णायक बोलणारी जी माणसं असतात त्यांच्या शब्दाला सभेत... घरात... समाजात भारी किंमत असते. कोणत्या विषयाला कोठे कडी घालायची हे त्यांना पक्के ठाऊक असते. 


कधी कधी नको तिथे मनाला कडी घालणारी माणसं... दुसऱ्याला कायम ताटकळत उभे ठेवतात. आपल्यासाठी जीवतोड करणाऱ्यांच्या बाबतीत ही कडी फार क्लेश देणारी ठरते. आयुष्यभर मग नाव घ्यायचं नाही असं मन ठरवून टाकतं. हे कितपत योग्य आहे. 

आगरकर आणि टिळक यांनी  एकमेकांसाठी आयुष्याच्या उत्तरार्धात अशाच कड्या घातल्या. एकत्र शाळा चालवणारे.. शाळा शेणाने सारवणारे हे मित्र खूप दुरावले. शेवटच्या क्षणी मात्र न राहून टिळक आगरकरांना भेटायला गेले. डोळे भरुन एकमेकांना पाहिले. पण बोलले नाहीत. टिळक घराबाहेर पडले आणि आत आगरकरांनी जीव सोडला. टिळकांना अतिव दुःख झाले. पण.... काय उपयोग. मित्र कायमचा गेला. 


*आपणही जरुर कड्या लावा. पण योग्य तिथेच. नको त्या ठिकाणी लावून बसाल तर फार फार काही गमावून बसाल. योग्य ठिकाणी लावाल तर जीवन हलके कराल*. 


*फक्त ती लावायची कुठे आणि कधी यावर जरुर विचार करा. ही विनंती  आहे*


*वाचण्यात आलेला सुंदर लेख*

    ❤❤❤❤❤

●┈┉❀꧁꧂❀┉┈●

Featured post

Lakshvedhi