Friday, 12 August 2022

झेंडा उंचा रहे हमरा

 विनम्र अपील 🙏🏻

देश विरोधी लोग 15 नहीं 16 अगस्त का बेसब्री से इंतजार कर रहे हैं, ताकि तिरंगे की ऐसी तस्वीरें खींच सकें और वीडीओ बना सकें जिनसे यह साबित किया जा सके कि  तिरंगे का अपमान किया है।  ये लोग ऐसी परिस्थितियां पैदा करने की कोशिशें भी कर सकते हैं कि देखिए तिरंगा कूड़े में फैंका हुआ है, कीचड़ में सना हुआ है आदि आदि।  

*इस पोस्ट के माध्यम से मैं Group के अपने सभी सदस्यों से अनुरोध करूंगा कि 13,14 और 15 की तीन तारीखों को झंडा अपने घर की छत पर फहराने के बाद 16 अगस्त को सम्मान सहित उतार कर अच्छे ढंग से लपेट कर  अपनी आलमारी/अटैची/संदूक में रखें ताकि यही ध्वज दूसरे मौकों पर भी काम आ सके।*   

किसी देश विरोधी तत्व और पाकिस्तान परस्त कौ उंगली उठाने का मौका नहीं देना है।

मेरा एक सुझाव और भी है कि इस पोस्ट को    देश भक्त पूरे देश को जागृत करने की क्षमता रखते हैं।  जिस किसी भाई बहिन को नेट वर्किंग की अच्छी जानकारी है वह इस पोस्ट को अपने ढंग से एडिट करके 15 तारीख से पहले पहले वायरल भी कर सकता है। नही तो अपने मोबाईल पे dp मे तिरंगा लहराए.

कृपा करे

16 AUGUST  को 

आपको  आपके इलाका मे जाके सभी को तिरंगा सही सलामत नीचे उतारना जरुर बोलना है

 क्योंकि कहीं भी तिरंगा का अपमान ना हो |कृपया शेअर करे

अधिवेशन

 विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्ट पासून.

            मुंबई, दि. 11 : सन 2022 चे पावसाळी अधिवेशन बुधवार दिनांक 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत विधानभवन, मुंबई येथे होणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.


            मुंबईत विधानभवन येथे विधान सभा आणि विधान परिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.

            दिनांक 17 ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत अधिवेशन होणार असून, यामध्ये शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दहीहंडीची सुट्टी आणि दिनांक २० आणि 21 ऑगस्ट या सार्वजनिक सुट्ट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. तसेच, दिनांक 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

            बैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद व विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.  


000



 


 

मा तुझे सलाम


 

समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम

 स्वराज्य सप्ताह अंतर्गत 17 ऑगस्ट रोजी समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम.

            मुंबई, दि. 11: भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने देशभरात आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. राज्यात 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला असून राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राज्यभर समूह राष्ट्रगीत गायन होणार आहे.

            राज्यातील खाजगी, शासकीय आणि इतर सर्व प्रकारच्या शाळा/महाविद्यालये/शैक्षणिक संस्था/विद्यापीठे यामधील विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सहभाग असेल. सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात होईल आणि सकाळी 11 ते 11.01 मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करणे अनिवार्य असेल. समूह राष्ट्रगीताच्या वेळी राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक असून याबाबत नागरिकांमध्ये सर्व स्तरावर जाणीव जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.

            खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था,शासकीय व निम शासकीय कार्यालये, केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रीय सहभागी होणे आवश्यक राहील. शाळा/महाविद्यालये/शैक्षणिक संस्था/विद्यापीठे यामधील विद्यार्थ्यांना अगोदरच माहिती देणे आवश्यक आहे. सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था/शासकीय आणि निम शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सदर उपक्रमात सहभागी होणे अनिवार्य असल्याचे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

घरोघरी तिरंगा

 जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्हा प्रशासनाने साकारलेल्या चित्रफितीद्वारे "घरोघरी तिरंगा" अभिया


नाची जनजागृती...

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण.

 नागरी संरक्षण दल व ‘एमआयडीसी’च्यावतीने

कामगारांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण.

       मुंबई, दि. 11 : औद्योगिक क्षेत्रात घडणाऱ्या छोट्या - मोठ्या अपघातांना प्रतिबंध बसावा, यासाठी नागरी संरक्षण दल व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या संयुक्त विद्यमानाने औद्योगिक कामगारांसाठी तीन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण घेण्यात आले. ठाणे व बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील उद्योग क्षेत्रातील कामगार तसेच कर्मचारी या प्रशिक्षणात सहभागी झाले होते.

          'राज्य मिशन २०२२ -२०२३' अंतर्गत संचालक, नागरी संरक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी संरक्षण दलाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण रबाळे अग्निशमन केंद्र येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ येथे ३ ते ५ ऑगस्ट २०२२ दरम्यान प्रशिक्षण पार पडले.

            देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्षात औद्योगिक जडणघडणीमध्ये व प्रतिबंधक उपाययोजनाद्वारे प्रशिक्षीत कामगार वर्ग तयार करण्याकरिता नागरी संरक्षण दलाच्या वतीने हे प्रशिक्षण घेण्यात आले. सामान्य नागरिकांबरोबरच, सर्व उद्योगधंदे व कारखान्यामधील कामगार कर्मचारी यांना आपत्ती व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण घेता यावे व सर्व कर्मचारी प्रशिक्षीत व्हावेत, याकरीता नागरी संरक्षण दल प्रयत्नशील आहे. या प्रशिक्षणात प्रामुख्याने आग प्रतिबंध व सुरक्षा उपाययोजना, प्रथमोपचार व सीपीआर, विमोचन या विषयावर व्याख्याने व प्रात्यक्षिके पार पडली.

       "राज्य मिशन २०२२-२०२३ अंतर्गत नागरी संरक्षण विभागातर्फे सुरक्षा उपाययोजनांकरिता जास्तीत जास्त औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी वर्गाला प्रशिक्षण देण्याचा मानस आहे. यावेळी नागरी संरक्षण संचालनालय तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिवन गाणे गात


 राज्यभरातील कारागृहांत उमटले “जीवनगाणे गातचं जावे”चे सूर...

एकाच दिवशी एकाच वेळी 36 कारागृहात विशेष कार्यक्रमांचे आयोजन.

राज्याच्या गृह विभागाच्या सहकार्यातून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा अनोखा विक्रम.

            मुंबई, दि. 11 : छोट्या मोठ्या चुकांमुळे कैदी बनून आयुष्य जगणाऱ्या बनलेल्या अनेकांसाठी आजचा दिवस विशेष ठरला.. निमित्त होते, “जीवन गाणे गातचं गावे”... या अनोख्या कार्यक्रमाचे... स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत, राज्यातील 36 प्रमुख कारागृहांत सांस्कृतिक, प्रबोधनात्मक व समुपदेशनात्मक कार्यक्रमाचे आज आयोजन करून, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने एक विक्रम केला.

            "जीवन गाणे गातच जावे..." या विशेष कार्यक्रमाचे एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात कारागृहात आयोजन होण्याची ही घटना, देशाच्या व राज्याच्या इतिहासात प्रथमच घडली. व्यावसायिक कलाकारांसोबतच, कारागृहातील कैद्यांनीही या कार्यक्रमात सादरीकरण केले हे या कार्यक्रमांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य!

            राज्यात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. या महोत्सवात अनेक अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक म्हणजे राज्यातील प्रमुख कारागृहात सांस्कृतिक, समुपदेशनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणे. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली बिभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत या कार्यक्रमासाठी एकूण 36 कला समूह निवडण्यात आले होते. एक महिन्यापासून या कार्यक्रमाचे नियोजन सुरू होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गृह विभागाच्या मदतीने सूक्ष्म नियोजन केले होते. या कार्यक्रमांत 1000 हून अधिक कलाकार सहभागी झाले होते. बहुतांश कार्यक्रमासाठी संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, न्यायाधीश उपस्थित होते. कारागृहातील कैद्यांसाठी झालेल्या कार्यक्रमात, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला, प्रबोधन, समुपदेशन, योग क्रिया याबरोबरच इतर कार्यक्रम ही आयोजित केले होते.

कारागृहातील कैद्यांचे उत्कृष्ट सादरीकरण

            "जीवन गाणे गातच जावे..." या कार्यक्रमात कारागृहातील अनेक कैद्यानी सादरीकरणात सहभाग घेतला. काही कैद्यांनी अप्रतिम वादन, गायन, काव्यवाचन आणि नृत्य करून त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव दिला. कैद्यांमधील कलाकार पाहण्याची दुर्मिळ संधी यावेळेस सर्वांना मिळाली. अशा कार्यक्रमांचे आयोजन वारंवार करावे, अशी अपेक्षाही अनेकांनी केली. जाणते आजाणतेपणाने झालेल्या चुकांमुळे, शिक्षा भोगावी लागत असल्याचे काही कैद्यांनी स्पष्ट केले. मात्र आजच्या कार्यक्रमामुळे नवी दिशा मिळाली असून, भावी आयुष्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल, अशी आशाही अनेकानी व्यक्त केली. कार्यक्रमाचे शीर्षक "जीवन गाणे गातच जावे..", यामुळे ही एक नवी ऊर्जा मिळाली असून, जीवनात नवा अध्याय सुरू करणार असल्याची भावनाही काही कैद्यांनी बोलून दाखवली.

राज्याच्या गृहविभागाचे सहकार्य.

            राज्याच्या गृह विभागाने या उपक्रमासाठी सर्व सहकार्य केले. तुरुंग प्रशासन आणि गृह विभाग यांनी केलेल्या सहकार्यामुळे हे कार्यक्रम होऊ शकले. राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत तुरुंग प्रशासनाला आदेश देऊन सहकार्य करण्याबाबत कळविले होते. अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा पुणे, सुनील रामानंद यांनी वैयक्तिक लक्ष घालून याबाबत संबंधितांना योग्य ते निर्देश दिले. हेमंत पवार संशोधन अधिकारी, कारागृह व सुधार सेवा यांनी याबाबत योग्य तो समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

कलाकारांच्या प्रतिक्रिया

             कारागृहातील कैद्यांसाठी कार्यक्रम करणे हे कलाकारांसाठी आव्हान होते व हा एक वेगळा अनुभव होता असे अनेक कलाकारांनी नमूद केले. या कार्यक्रमांमधून मनोरंजन व प्रबोधन करण्याची संधी मिळाल्याबद्दल अनेक कलाकारांनी शासनाचे आभार मानले.

            कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांनी, असे कार्यक्रम कारागृहात प्रथमच होत असल्याबद्दल शासनाचे अभिनंदन करून आभार मानले. तसेच असे कार्यक्रम वारंवार आयोजित करावेत जेणेकरून कैद्यांचे प्रबोधन आणि समुपदेशन होऊ शकेल आणि त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वादी घेता येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

            या कार्यक्रमाच्या धर्तीवरच पुढील महिन्यात राज्यातील 36 जिल्ह्यातील वृद्धाश्रमांतही अशाच प्रकारचे कार्यक्रम होणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक यांनी स्पष्ट केले आहे.

            भायखाळा जिल्हा करागृह येथे महिला बंद्यांकरिता आयोजित करण्यात आलेल्या याकार्यक्रमाच्या वेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक श्री. संदीप शेंडे व 

Featured post

Lakshvedhi