Wednesday, 29 June 2022

Police bharati

 राज्यात ७२३१ पदांसाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया


पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार

गृहविभागाची अधिसूचना जारी.

            मुंबई दि. 28 :- शासनाने राज्यात सन २०२० ची पोलीस शिपाई संवर्गातील ७२३१ रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

            पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी १६०० मीटर धावणे (२० गुण), १०० मीटर धावणे (१५ गुण), गोळाफेक (१५ गुण) असे एकूण ५० गुण तर महिला उमेदवार ८०० मीटर धावणे (२० गुण). १०० मीटर धावणे (१५ गुण), गोळाफेक (१५ गुण) असे एकूण ५० गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठी शारीरिक चाचणी एकूण १०० गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी ५ कि.मी. धावणे (५० गुण), १०० मीटर धावणे (२५ गुण), गोळाफेक (२५ गुण) असे एकूण १०० गुण असणार आहेत.

            शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परीक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पद्धतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.

            पोलीस महासंचालक यांनी प्रत्येक पोलीस घटकासाठी गठीत केलेले निवड मंडळ शारीरिक व लेखी परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणांचे एकत्रिकरण करून अंतिम गुणवत्ता यादी तयार करेल.

            या नव्या दुरुस्तीचा लाभ पोलिस दलास होणार असून, त्यांना ताकदवान मनुष्यबळ उपलब्ध होईल. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या बदलाचा मोठा फायदा होईल, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

०००


 



Tuesday, 28 June 2022

 नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून कुर्ला इमारत दुर्घटनास्थळाची पाहणी.

            मुंबई, दि. 28 : कुर्ला परिसरातील नाईकनगर सोसायटीच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीची नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच जखमींची विचारपूस केली.

            नाईकनगर सोसायटीची चार मजली इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे नगरविकास मंत्री श्री. देसाई यांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. घटनास्थळाची पाहणी करत असताना दोघा जखमींना ढिगाऱ्याखालून सुखरूप वाचविण्यात आले. त्यांना तत्काळ नजिकच्या राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले. यानंतर श्री. देसाई यांनी राजावाडी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून जखमींना सर्वोतोपरी सहकार्य करण्याबाबत सूचना केल्या. अपघातातील सर्व जखमींचा खर्च राज्य शासन तसेच महापालिकेच्यावतीने करण्यात येईल, असे श्री. देसाई यांनी सांगितले.


----

 कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना

मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांची मदत

मृतांबाबत मुख्यमंत्र्यांची सहवेदना, जखमींच्या उपचारांबाबतही दिले निर्देश.

            मुंबई, दि. 28 : - मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांबाबत आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दुर्घटनेतील मृताच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


            मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकांचे काम आणि अनुषंगिक सुविधांबाबतही यंत्रणांना सूचना केल्या आहेत. विशेषतः जखमींना तातडीचे उपचार मिळावेत, जखमी तसेच मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक अशा सुविधा तातडीने मिळाव्यात असे निर्देशही दिले आहेत.


00000



माउली

 रखुमाई ने केलेली कविता


दोन वर्षांनंतर पुन्हा, आनंदात दिसतीए स्वारी

ज्ञानोबा तुकोबा घोषाने, सुरू झालीये वारी


दोन वर्ष सुने होते, पंढरपूरचे अंगण

यावर्षी सुरू झाले, हरिपाठ नी रिंगण


खर सांगू?

खर सांगू दोन वर्ष, हे मंदिरात नव्हते

तुमच्यासोबत ते सुद्धा, एक लढाई लढत होते


मी म्हटलं ना मग करा चमत्कार,

सोडा ना हात कटावरचे

अहो तुम्ही देव आहात,

फिरवा ना फासे पटावरचे


देवच तो..

म्हणाला हीच तर वेळ आहे, खरा देव ओळखण्याची

माणसाने माणसाला माणूस म्हणून जपण्याची


सरले संकट तेंव्हा कुठे, हे पंढरीत परत आले..

म्हणाले जगाचे संकट, संयमाने सरत आले..


पुन्हा वाजला मृदुंग, झंकारली एकतारी

रखुमाई अग पाहतेस का सुरू झाली वारी


वारकऱ्यांच्या प्रेमासाठी देव पुन्हा विटेवर उभा राहिला..

माणसातील देव पाहतोच, मी देवातील माणूस पाहिला..


चेहऱ्यावर टिळा, हातात टाळ, बेचैनी सरली सारी

ज्ञानोबा तुकोबा नामाच्या घोषात, सुरू झालीये वारी

नखरा पावसाचा

 

पावसाचा नखरा एकीला मनसोक्त, तर दुसरीला सुकत करतोय 

माउली


 *अशी अविश्वसनीय रांगोळी तुम्ही अजिबात miss करू नका....*

एका बाजूने पाहिले तर माऊली दिसतील आणि दुसऱ्या बाजूने पाहिले तर तुकोबाराय दिसतील

अप्रतिम अशी 2 in 1 (Lenticular) रांगोळी श्रीरंग कलादर्पण च्या Level 3 च्या विद्यार्थ्यांनी प्रा. अक्षय शहापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेखाटली आहे.

 पंढरीच्या वारीचे अवचित्य साधून विठुरायाच्या भक्तिमय वातावरणात ही रांगोळी रेखाटली आहे...


*तुम्हाला आवडल्यास नक्की share करा.*


*।। राम कृष्ण हरी ।।*

🌹🌹🌹🌹🌹🌹🚩

Buavtal

 भवताल कट्टा ४७


विषय -

हो, दरडींपासून बचाव शक्य आहे!

(गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे महाराष्ट्रात मोठी प्राणहानी झाली. 

या आपत्तीबाबत योग्य माहिती असेल तर त्यातून बचाव करून घेणे शक्य आहे. त्याबाबत जागरूक करणारा कट्टा...)


वक्ते -

डॉ. सतीश ठिगळे

(ज्येष्ठ भूवैज्ञानिक; दरडींचे अभ्यासक)


शुक्रवार, १ जुलै २०२२; सायं. ७ ते ८.३०


सहभागी होण्यासाठी लिंक-

https://bit.ly/3QSLXuX

किंवा

सोबतचा QR code स्कॅन करा.

किंवा

भवताल फेसबुक पेजवर लाईव्ह

पेजची लिंक- https://facebook.com/bhavatal/


--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

95



45350862 / bhavatal@gmail.com


Featured post

Lakshvedhi