Wednesday, 8 June 2022

भारतीय नरकाची गोष्ट

 एकदा एक व्यक्ति मेल्यानंतर नरकात पोहोचला.


त्याने पाहिले की प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही देशाच्या नरकात जाण्याची मुभा आहे.


त्याने विचार केला ....


चला अमेरिकन लोकांच्या नरकात जावून पाहू,


जेव्हा तो तिथे पोहचला तेव्हा त्याने दरवाज्यावरील पहारेकऱ्याला विचारले:


काय भाऊ ,अमेरिकन नरकात काय काय चालतं ?


पहारेकारी म्हणाला : काही ख़ास नाही,


सर्वात आधी आपल्याला एका विद्युत् खुर्चीवर एक तास बसवून शॉक दिला जाईल,


मग आपल्याला एका खिळयांच्या खाटेवर एक तास झोपवले जाईल, त्यानंतर एक राक्षस येऊन आपल्या जख्मी पाठीवर पन्नास फटके मारेल ..... !


हे ऐकून तो व्यक्ति खुप घाबरला आणि रशियन नरकाकडे गेला, आणि तेथील पहारेकऱ्याला तेच विचारले .


राशियन नरकाच्या पहारेकऱ्याने सुद्धा तीच वाक्ये ऐकवीली जी अमेरिकन नरकाच्या पहारेकऱ्या कडून ऐकून आला होता.


मग तो व्यक्ति एक एक करत सर्व देशांच्या नरकाच्या दरवाज्यावर जावून आला,सर्व ठिकाणी त्याला भयानक किस्से ऐकायला मिळाले.


शेवटी जेव्हा तो एका ठिकाणी पोहचला,


तेथे पहातो तर दरवाज्यावर लिहिले होते "भारतीय नरक"


आणि त्या दरवाज्या बाहेर


त्या नरकात जाण्यासाठी मोठी रांग लागली होती,लोक भारतीय नरकात जाण्यासाठी उतावीळ होत होते,


त्याने विचार केला की येथे नक्की कमी शिक्षा मिळत असावी ...... ताबडतोब त्याने पहारेकऱ्याला विचारले की शिक्षा काय आहे ?


पहारेकारी म्हणाला : काही विशेष नाही


सर्वात आधी आपल्याला विद्युत् खुर्चीवर एक तास बसवले जाईल व इलेक्ट्रिक शॉक दिला जाईल.


मग एका खिळयांच्या खाटेवर एक तास झोपवले जाईल,


त्यानंतर एक राक्षस येऊन आपल्या जख्मी पाठीवर पन्नास फटके घालेल ...!


चक्रावून त्या व्यक्तिने त्याला विचारले :


हे तर बाकीच्या देशांच्या नरकात पण होत आहे.मग इथेच गर्दी का??


पहारेकरी म्हणाला; विद्युत खुर्ची तिच आहे पण भारनियमन आहे विज नाही.


खिळ्यांच्या खाटेवरील खिळे कुणीतरी काढून नेले आहेत.


आणि फटके मारणारा राक्षस ??


तो जि.प.चा कर्मचारी आहे.


येतो सहि करतो चहा नाश्त्याला निघुन जातो.


आणि चुकून आलाचं तर एक दोन फटके मारतो.


अनं पंन्नास लीहीतो.


*चलं.....ये लवकर आतं..*


 

त्याची तीची कविता

 *मंगेश पाडगांवकर*


मी कुठे म्हणालो *"परी"* मिळावी.

एवढंच की जरा *"बरी"* मिळावी.


प्रयत्न मनापासून आहेत मग...

किमान एक *"तरी"* मिळावी...!


स्वप्नात तशा खूप भेटतात...

कधीतरी *"खरी"* मिळावी.


हवीहवीशी एक जखम...

एकदा तरी *"उरी"* मिळावी...!


गालावर खळी नको तिच्या...

फक्त जरा *"हसरी"* मिळावी...!


चंद्राइतकी सुंदर नकोच...

फक्त जरा *"लाजरी"* मिळावी..!!


मी कुठे म्हणालो *"परी"* मिळावी..

एवढच की जरा *"बरी"* मिळावी..!!

( - *मंगेश पाडगावकर*)

-------------------------'----

👌👌👌👍👍👍

*तिची कविता:-*


मी कुठे म्हणतेय *"देखणा"* मिळावा...

एवढंच की जरा *"शहाणा"* असावा.


प्रयत्न शंभर आणे आहेतच,

मग किमान एक *"आणा"* मिळावा..!


सिनेमात तसे खूप भेटतात ,

कधी तरी *"अंगणात"* भेटावा.


हवाहवासा असा छोटासा,

एक तरी *"नजराणा"* मिळावा 


नुसती छप्पन इंचाची छाती नको,

मनाचा *"सच्चा बाणा"* असावा


सूर्याइतका तेजस्वी नको,

पण प्रेमात कधी *"उणा"* नसावा


मी कुठे म्हणतेय *"देखणा"* मिळावा

एवढंच की जरा *"शहाणा"* असावा

*----------------*

अष्टांग हृदयम!!

 आपल्या भारतात ३००० वर्षांपूर्वी एक फार मोठी ऋषी होऊन गेले.

त्यांचं नाव होतं महाऋषि वागभट!!

त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं.

त्या पुस्तकाचं नाव होतं, अष्टांग हृदयम!!

(Ashtang   hrudayam)

आणि याच पुस्तकात त्यांनी

आजारपण दूर करण्यासाठी ७००० सूत्रे लिहिलेली होती !

हे त्यातीलच एक सूत्र आहे !!

महर्षी वागभट लिहीतात की कधीकधी हृदयाचा घात होत असतो!

म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये blockage  व्हायला सुरुवात झालेली असते!

म्हणजे याचा अर्थ असा की रक्तामध्ये (blood) , acidity (आम्लता ) वाढलेली आहे!

आम्लता म्हणजे काय ते आपण जाणताच!

यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात acidity !!

आम्लता  दोन प्रकारची असते !

एक असते  पोटाची आम्लता !

आणि दुसरी म्हणजे रक्ताची (blood) आम्लता !!

आपल्या  पोटात जेव्हा  आम्लता वाढते!

तेव्हा आपण म्हणतो  पोटात आग पडल्यासारखं वाटतंय!!

आंबट ढेकरा येतायत!

तोंडात सारखं पाणी येतय!

आणि ही आम्लता (acidity) जेव्हा आणखीन वाढते तेव्हा!

तिला इंग्रजीत hyperacidity म्हणतात !

आणि हीच पोटातली आम्लता वाढत वाढत जेव्हा रक्तात उतरते तीलाच रक्त आम्लता (blood  acidity)  म्हणतात!!

आणि  जेव्हा blood मध्ये acidity वाढते तेव्हा हे आम्लयुक्त  रक्त (blood)  हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधून वाहू शकत नाही!

आणि रक्तवाहिन्यांमध्ये blockage होते !

आणि असं होतं तेव्हाच  heart  attack येतो !! त्याशिवाय heart attack नाही येत !!

आणि हे आयुर्वेदाचं सर्वात मोठं सत्य आहे जे कुठलाही डॉक्टर आपल्याला सांगत नाही!

कारण यावरील उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे!!

काय उपाय आहे हा??

महर्षी वागभट यांनी लिहून ठेवलेलं आहे की जेव्हा रक्तात (blood) आम्लता  (acidity)  वाढलेली असेल!

तेव्हा आपल्या आहारात क्षारयुक्त पदार्थांचा समावेश करावा!

आपल्याला हे तर माहीतच आहे की पदार्थ दोन प्रकारचे असतात, आम्लयुक्त आणि क्षारयुक्त!!

acidic  and  alkaline

आता आम्ल आणि क्षार यांना एकत्र केलं तर काय होईल! ?????

acid  and  alkaline यांना एकत्र केलं तर काय होईल ?????

neutral

होईल हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे !!

तर वागभट पुढे लिहितात !

की जर रक्ताची आम्लता वाढली असेल तर क्षारीय (alkaline) पदार्थांचं सेवन करावं !

*म्हणजे रक्ताची आम्लता (acidity)  neutral  होईल!!!*

आणि रक्ताची आम्लता neutral झाली की मग!

heart  attack ची शक्यता आयुष्यात कधीही उद्भवणारच नाहीं !!

अशी आहे एकंदरीत कथा !!

आता आपण साहजिकच विचाराल की असे कोणकोणते पदार्थ आहेत जे क्षारीय असतात आणि आम्ही आहारात घ्यायला हवेत?????

आपल्या स्वयंपाक घरात असे पुष्कळसे पदार्थ आहेत की जे क्षारीय आहेत!

आणि ज्यांचं आपण सेवन केलं तर आपल्याला कधीच heart attack  येणार नाही !

आणि जर येऊन गेला असेल !

तर पुन्हा येणार नाही  !!

आपल्या घरात सर्वांत अधिक क्षारीय पदार्थ जर कोणता असेल तर तो म्हणजे दुधी भोपळा !!

हिंदीत त्याला लौकी म्हणून ओळखल्या  जातं!!

English भाषेत त्याला म्हणतात bottle  gourd  !!!

याची आपण भाजी करून खात असतो!

ह्यापेक्षा क्षारीय दुसरा कुठलाच पदार्थ नाही!

तर आपण रोज दुधी भोपळ्याचा रस काढून पित राहावे !!

किंवा कच्चा दुधी भोपळा खाल्ला तरी चालेल!!

वागभट पुढं  लिहितात की रक्ताची आम्लता कमी करण्याची सर्वाधिक शक्ती दुधी भोपळ्यातच !

तेव्हा आपण दुधीच्या रसाचा सेवन जरूर करावं!!

किती रस सेवन करायचा ?????????

रोज  200 ते 300  मिलीग्राम रस प्यावा !!

केव्हा प्यायचा ??

सकाळी अंशापोटी (प्रातर्विधी आटोपल्यावर) पीऊ  शकता !!

किंवा नाश्ता केल्यावर अर्ध्या  तासानंतर पीऊ शकता !!

या दुधी भोपळ्याच्या रसाला आपण आणखीन अधिक क्षारीय बनवू शकताढ

याच्या रसात ७ ते १० तुळशीची पानं टाका

तुळस फार क्षारीय आहे !!

तसंच यात आपण पुदीन्याची  ७ ते १० पानंही टाकू  शकता!

पुदीना फार क्षारीय  आहे !

याच्यासोबत आपण काळं मीठ किंवा सेंदवमिठ जरूर टाका !

हे मीठ देखील खूप क्षारीय आहे !!

पण लक्षात असू द्या

मीठ काळं वा सेंधव मीठच असलं पाहिजे !

ते दुसरं आयोडीन  युक्त मीठ  अजिबात टाकू नका !!

हे आयोडीन युक्त मीठ आम्लीय असतं !!!!

तर  मित्रांनो आपण या दुधी भोपळ्याच्या ज्युसचं सेवन जरूर  करा !!

२ ते ३ महीन्यांच्या अवधीत  आपल्या   heart चे सारे blockages ठीक होतील!!

२१ व्या दिवशीच आपणास या उपायांचा  खूप अधिक परिणाम दिसून येणं सुरू होईल !!!

कुठल्याही शस्त्रक्रियेची जरूरत आपल्याला पडणार नाही !!

घरातूनच आपल्या भारताच्या आयुर्वेदानं या आजाराचा इलाज  होऊन जाईल !!

आणि आपलं हे अनमोल  शरीर आणि ऑपरेशनचे  लाखो  रुपये वाचतील !!

आपण पूर्ण पोस्ट  वाचलीत, आपणास खूप खूप धन्यवाद !!

आपल्याला योग्य वाटल्यास आपण ही माहिती इतर सर्वत्र पोहोचवावी ही विनंती.

 🙏🏻जय श्रीमन नारायण नारायण नारायण🙏

 



त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना अनुदान देण्यास उपमुख्यमंत्र्यांची मान्यता
.

            मुंबई, दि. 7 :- १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये घोषित केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/ तुकड्या/ अतिरिक्त शाखावरील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान व ज्या शाळा २० टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना वाढीव २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि काही शाळांच्या त्रुटींमुळे अनुदान सुरू करता आले नव्हते. या शाळांनी त्रुटी पूर्तता केल्यामुळे अनुदान देण्यास आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.


            या बैठकीस आमदार सर्वश्री सुधीर तांबे, जयंत आजगावकर, अभिजित वंजारी, कपिल पाटील, विक्रम काळे, सतीश चव्हाण, किरण सरनाईक, बाळाराम पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, प्रधान सचिव ओ.पी.गुप्ता, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल आदी उपस्थित होते.

            आज झालेल्या बैठकीमध्ये त्रुटी पूर्तता केलेल्या २० टक्के अनुदानासाठी ७९ प्राथमिक शाळा, २८४ तुकड्यांमधील ८३५ शिक्षकांच्या पदांना, ५३ माध्यमिक शाळांमधील २५३ शिक्षकांच्या आणि १५९ शिक्षकेतर पदांना, १२९ माध्यमिक तुकड्यांमधील १९४ शिक्षकांच्या पदांना तसेच २५१ उच्च माध्यमिक शाळांमधील १२८४ शिक्षक आणि ३६ शिक्षकेतर पदांना मान्यता देण्यात आली. याचबरोबर वाढीव २० टक्के अनुदानासाठी ८२ प्राथमिक शाळा, २४० तुकड्यांमधील ७७३ शिक्षकांच्या पदांना, २०२ माध्यमिक शाळांमधील ९८९ शिक्षकांच्या तर ७१० शिक्षकेतर पदांना, ४८४ माध्यमिक तुकड्यांमधील ६७५ शिक्षकांच्या पदांना मान्यता देण्यात आली. यासाठी एकूण १७७.०६ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.

            तसेच कायम शब्द वगळलेल्या अनुदानास पात्र असलेल्या परंतु अनुदानास पात्र घोषित न केलेल्या मूल्यांकन पात्र खाजगी शाळांना देखील अनुदानास पात्र घोषित करण्यास आजच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली. कायम शब्द वगळलेल्या अघोषित खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/ तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

            मूल्यांकन पात्र ठरलेल्या २९८ प्राथमिक शाळा, ६१९ तुकड्या, ३३८ माध्यमिक शाळा, १३८६ तुकड्या तर १३२० उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय अशा एकूण ३९६१ शाळा/तुकड्या अनुदानासाठी पात्र घोषित करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती.


 





 

 स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा

दिनेश वाघमारे

 

            मुंबईदि. 7 :"सध्याच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करूनच आपला स्पर्धेमध्ये टिकाव लागू शकतो"असे मत ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केले.

            महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात श्री. वाघमारे बोलत होते. यावेळी मंचावर महापारेषणचे संचालक (संचलन) अनिल कोलपसंचालक (प्रकल्प) नसीर कादरीसंचालक (वित्त)अशोक फळणीकरसंचालक (मानव संसाधन) सुगत गमरे उपस्थित होते.

            "आपली कंपनी जोपर्यंत कात टाकत नाहीतोपर्यंत या खासगी कंपन्यांसमोर आपला टिकाव लागणार नाही. महापारेषणने ड्रोनच्या साहाय्याने काम करण्यास सुरुवात केली आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नव्या संकल्पनेचा अवलंब केला पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे, असेही श्री.वाघमारे म्हणाले,

            प्रास्ताविकात श्री.गमरे म्हणाले, "कंपनीची संस्कृती व कर्मचाऱ्यांमध्ये एकसंघ वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येणेसकारात्मक विचारांची देवाणघेवाण करणेमैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करून कंपनीचा विकास साधावाया हेतूने महापारेषणतर्फे कंपनीचा १७ वा वर्धापनदिन व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावाहा त्यामागचा हेतू आहे"

            यावेळी ऊन-पावसाची तमा न बाळगता विशेष कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना  श्री.वाघमारे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले.

            कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महापारेषणचे मुख्य महाव्यवस्थापक (मा.सं.) सुधीर वानखेडेमहाव्यवस्थापक (मानव संसाधनमनुष्यबळ नियोजन) राजू गायकवाडमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटीलराजशिष्टाचार अधिकारी सतिश जाधवअधीक्षक अभियंता (प्र.) योगेश पाचपांडेजनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद अवताडेसंचालक (मानव संसाधन) यांचे विशेष कार्य अधिकारी महेश आंबेकर यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला राज्यातील विविध परिमंडळातील अधिकारीकर्मचारी व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi