Wednesday, 11 May 2022

 *A company of good people is like walking into a shop of perfume. Whether you buy the perfume or not, you are bound to receive the fragrance.*

*Good morning*😊

 **रोज मुठभर फुटाणे आणि गूळ खा ! चला तर मग जाणून घेऊ याचे फायदे .....*

गुळाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गुळामध्ये 'आयरन' मुबलक प्रमाणात असते . गुळाचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते.तसेच हे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते.

एवढेच नाही तर गुळामध्ये सोडियम, व्हिटॅमिन्स, पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात आढळतात.त्यामुळे गूळ आणि फुटाणे खाणे आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने शरीरातील घाण साफ होते.

मधुमेहाच्या समस्या, तसेच पोटाशी संबंधित समस्या इ. दूर करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. फुटाण्यामध्ये कार्बोहायड्रेट,प्रोटिन्स, आयरन, कॅल्शियम आणि अनेक प्रकारची विटामिन आढळतात. त्याच्या नियमित सेवनाने रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते, जे आपले शरीरास अनेक रोगांपासून वाचवते. फुटण्याचे सेवन केल्याने मन तीक्ष्ण होते. पण जर फुटाणे आणि गूळ खाल्ल्यास त्याची ताकद अनेक पटींनी वाढते. ज्यामुळे ते आपल्यासाठी आणखी फायदेशीर ठरते.

चला तर जाणून घेऊया फुटाणे आणि गूळ खाण्याचे फायदे :-

 *1. चेहऱ्यावर चमक येते :-* 

गूळ आणि हरभरा त्वचा सुधारते कारण त्यात झिंक मुबलक प्रमाणात असते . पुरुषांनी रोज याचे सेवन केले पाहिजे, ज्यामुळे चेहऱ्याची चमक वाढण्यास मदत होते आणि ते पूर्वीपेक्षा अधिक सुंदर दिसूही लागते .

 *2. हे स्नायूंसाठी फायदेशीरआहे :-* 

गूळ आणि हरभऱ्यामध्ये प्रोटिन्स मुबलक प्रमाणात असतात , ज्यामुळे स्नायू मजबूत होण्यास मदत होते. स्नायू(मसल्स) बनवणाऱ्या लोकांसाठी दररोज गूळ आणि हरभरा खाणे फायदेशीर आहे.

 *3. लठ्ठपणा कमी करते :-* 

गूळ आणि हरभरा एकत्र खाल्ल्याने शरीरातील मेटाबॉलिज्मचे प्रमाण वाढते, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी, बरेच लोक जिममध्ये जातात, व्यायाम करतात, तसेच त्या लोकांना गूळ आणि हरभरा खाणे आवश्यक आहे.

 *4. बद्धकोष्ठता दूर करते :-* 

कमकुवत पचनशक्तीमुळे, बद्धकोष्ठता आणि एसिडिटीची समस्या असते, अशा परिस्थितीत हरभरा आणि गूळ खाणे फायदेशीर असते कारण त्यात फायबर भरपूर प्रमाणात असते जे पचनशक्ती व्यवस्थित ठेवते.

 *5. मन तीक्ष्ण करते :-* 

गूळ आणि हरभरा एकत्र खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होण्यास मदत होते ,कारण त्यात व्हिटॅमिन-बी मुबलक प्रमाणात असते जे स्मरणशक्तीला पॉसिटीव्ह चालना देते.

 *6. दात मजबूत करते :-* 

गूळ आणि हरभऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात फॉस्फरस असते , जे दातांसाठी खूप फायदेशीर आहे. गूळ आणि हरभरा एकत्र खाल्ल्याने दात मजबूत होतात आणि दातांशी संबंधित समस्या दूर राहतात.

 *7. हृदयासाठी फायदेशीर :-* 

ज्या लोकांना हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या आहे. गूळ आणि हरभरा यांचे सेवन त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात पोटॅशियम असते जे हृदयविकाराचा धोका येण्यास टाळते.

 *8. हाडांसाठी फायदेशीर :-* 

संधिवात आणि शरीरातील थकवा यासारख्या समस्यांवर दररोज गूळ आणि हरभरा खाणे खूप फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॅमिन आणि कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात असतात. जे थकवा दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Tuesday, 10 May 2022

 राज्यातील विमानतळ विकासासाठी कृती आराखड्याची

प्रभावी अंमलबजावणी करा 

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

· अकरा लाख प्रवाशांचा टप्पा पार करून शिर्डी विमानतळाने केली गौरवास्पद कामगिरी

· व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचा सन्मान

            मुंबई, दि. 10 : राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोल्हापूर, चिपी (सिंधुदुर्ग), नांदेड, गोंदिया व नाशिक विमानतळावरून विमानसेवा सुरू असून देशातील प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या शिर्डी विमानतळाने 11 लाख 58 हजार प्रवाशांचा टप्पा पार करून गौरवास्पद कामगिरी केली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. या कामगिरीबद्दल 'बेस्ट स्टेट विथ अ डेडिकेटेड आउटलुक फॉर द एव्हिएशन सेक्टर' या श्रेणीत भारत सरकारकडून एमएडीसीला मिळालेले पारितोषिक मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांना प्रदान केले.

             मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला परिवहन मंत्री ॲड अनिल परब, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, विमानपत्तनच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंग, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.नितीन जावळे, दूरदृश्यप्रणालीद्वारे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अन्बलगन, नागपूर महापालिका आयुक्त बी.राधाकृष्णन, नागपूर सुधारणा ट्रस्टचे अध्यक्ष मनोजकुमार सुर्यवंशी, नागपूरच्या जिल्हाधिकारी आर.विमला या बैठकीला उपस्थित होते.

               मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील विमानतळ विकासासाठी शासन करत असलेल्या कृती आराखड्यातील कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. शिर्डी विमानतळावरून ३० एप्रिल २०२२ अखेर ११ लाख ५८ हजार प्रवाशांचा टप्पा पार केला आहे ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे.तसेच शिर्डी येथून कार्गोने भाजीपाला,फुले व फळे हे बंगलोर,चेन्नई व दिल्ली येथे पाठविण्यात येत आहेत. आतापर्यंत शिर्डी वरून कार्गोने १ लाख ७० हजार किलो पर्यंतचा शेतमाल देशाच्या इतर भागात नेण्यात आला ही कौतुकाची बाब आहे. शिर्डी बरोबरच इतर जिल्ह्यातील सुरू असलेली विमानवाहतूक सेवा दर्जेदार असावी यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने लक्ष द्यावे. मिहान येथे सद्यस्थितीत सुरू असलेल्या प्रकल्पांची कामे गतीने करावीत.समृद्धी महामार्गामुळेही नजीकच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या विमानवाहतूकीस चालना मिळेल त्यामुळे या भागातील प्रस्तावीत प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत. कोल्हापूर-रत्नागिरी येथील विमानतळ विस्तारीकरणासाठी सुरू असलेली कार्यवाही, अमरावती विमानतळ धावपट्टीची लांबी वाढविणे ही कामे देखील गतीने करावीत. पालघर येथे सॅटेलाईट विमानतळाच्या प्रस्तावित प्रकल्पाबद्दल तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

            यावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सद्यस्थितीत एमएडीसीमार्फत सुरू असलेले व भविष्यात राबविण्यात येणारे उपक्रम, मिहानमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, केंद्रशासनाची उडाण योजना राबविण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही याबाबत व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी माहिती दिली.

         यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पूर्ण केलेल्या विमानतळांचे हस्तांतरण महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे करावे जेणेकरून एकाच यंत्रणेकडे विमानसेवेच्या विकासाबाबत काम करता येणे सुलभ होईल असेही संचालक मंडळाच्या बैठकीत ठरले.

००००

भवताल

 रायरेश्वर पठारावरील मातीच्यारंगांचे रहस्य उलगडणारी ही गोष्ट

(भवतालाच्या गोष्टी ०८)

रायरेश्वरचे पठार… शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली तेच हे ठिकाण! महाराष्ट्रातील सर्वांत उंच ठिकाणांपैकी एक. कोकणात सापडणारा जांभा या पठाराच्या माथ्यावर वसला आहे. तिथे सात रंगांची माती आढळते. या मातीला इतके रंग कसे आले? याबाबत लोकांमध्ये प्रचंड कुतूहल आहे. त्यामागचे भूवैज्ञानिक रहस्य उलगडण्याचे आव्हान ‘भवताल’ने स्वीकारले आणि मग सुरू झाली एक मोहीम. या मोहिमेतून आणि मातीच्या पृथ:करणातून भन्नाट रहस्ये बाहेर आली आहे. ही मोहीम आणि उलगडलेली रहस्ये यांची ही रंजक गोष्ट.

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील आठवी गोष्ट.)

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक:

https://bhavatal.com/Raireshwar-Soil-Conclusions

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय- bhavatal.com

या मोहिमेचा व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक : https://youtu.be/rQ076mj0Oek

(इतरांसोबतही शेअर करा)

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

 महाराष्ट्र शासन राज्य विकास कर्ज 2022 ची

 4.45 टक्के दराने परतफेड

                   मुंबई, दि 10 : महाराष्ट्र शासन राज्य विकास कर्ज, 2022 ची परतफेड दि. 10 जून 2022 रोजी 4.45 टक्के व्याज दराने करण्यात येणार आहे, असे वित्तीय सुधारणा सचिव शैला ए. यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

                 महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, अधिसूचना क्र. एलएनएफ-10,11/प्र.क्र.42/अर्थोपाय दि.5 जून 2020 अनुसार 4.45 टक्के महाराष्ट्र शासन राज्य विकास कर्ज 2022 अदत्त शिल्लक रकमेची दि. 9 जून 2022 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. 10 जून 2022 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. "परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. 10 जून 2022 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

            सरकारी प्रतिभूती विनियम, 2007 च्या उप-विनियम 24(2) व 24(3) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

            तथापि,बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 4.45 टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2022 च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस" प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली." असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.

            रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत, लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील असे वित्तीय सुधारणा विभागाचे सचिव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

----- ००० -----

नगरपालिका निवडणुकी

Featured post

Lakshvedhi