Saturday, 7 May 2022

 लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचासामाजिक न्यायाचा वसा अखंड चालू ठेऊ

                                                         - धनंजय मुंडे

राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी100 सेकंद स्तब्ध उभे राहून केले अभिवादन

            मुंबई, दि. 6 : कृती व प्रगतीचा संगम असलेले लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाच्या विचारांनी महाराष्ट्र समृद्ध केला. त्यांच्याच विचारांचा वसा अखंड चालू ठेऊ, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

            राजर्षी शाहू महाराजांचे हे स्मृती शताब्दी वर्ष असून सकाळी 10 वा. सपूर्ण राज्यात 100 सेकंद जिथे आहेत तिथे स्तब्ध उभे राहून एकाच वेळी लोकराजास अनोखे अभिवादन करण्यात आले.

            मंत्री श्री. मुंडे यांनी मुंबईतील चित्रकूट निवासस्थानी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच 100 सेकंद स्तब्ध उभे राहून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

            धनंजय मुंडे यांनी शाहू महाराजांचे 100 वे स्मृतीवर्ष कृतज्ञता पर्व म्हणून साजरे करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 5 कोटी रुपयांचा निधी देखील कोल्हापूर जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत.


००००



Friday, 6 May 2022

 पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ हे तीन मराठी चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होणा

                      - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख.

            मुंबई, दि. 6 : ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

            दरवर्षीप्रमाणे कान्स, फ्रान्स येथे दि. 17 मे ते 28 मे दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवून देणे, देशातील चित्रिकरण व पर्यटन स्थळांचे महत्त्व वाढविणे या हेतूने मराठी चित्रपटांचा सहभाग कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येतो. या महोत्सवात निवड झालेल्या मराठी चित्रपटांचे प्रतिनिधी सहभागी होतात.

            या वर्षी कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) 2022 च्या फिल्म मार्केटिंग विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून पाठवावयाच्या 3 मराठी चित्रपटांच्या निवड प्रक्रियेसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव अंतर्गत अशोक राणे, सतिश जकातदार, किशोरी शहाणे-विज, धीरज मेश्राम, मनोज कदम, महेंद्र तेरेदेसाई व दिलीप ठाकूर या तज्ज्ञांची परिक्षण समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने 32 चित्रपटांचे परिक्षण करुन एकमताने नटराज एन्टरटेनमेंट निर्मित “पोटरा", नाईन आर्चस पिक्चर कंपनी निर्मित “कारखानीसांची वारी” आणि बिइंग क्रिएटिव्ह पिक्चर्स निर्मित “तिचं शहर होणं" या चित्रपटांची कान्स फिल्म फेस्टिवल 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी केलेली शिफारस शासनाने मान्य केली आहे, असेही श्री.देशमुख म्हणाले.

००००



भवताल

 कोल्हापूरच्या ‘धुण्याची चावी’ची गोष्ट

(भवतालाच्या गोष्टी ०६)


तुम्ही कोल्हापूरचा प्रसिद्ध रंकाळा तलाव पाहिला असेल, पण त्याच्याशी संबंधित असलेली ‘धुण्याची चावी’ पाहिलीत का?... अनेकांना त्याची कल्पना नसेल. पण रंकाळ्याचे पाणी जमिनीखालून उताराने अर्धा-पाऊण किलोमीटर अंतरावर नेले आहे. तिथे ही एक भन्नाट जलव्यवस्था. अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ही व्यवस्था. तिथून हे पाणी शेतीसाठी जाते. असा हा पुनर्वापरसुद्धा.

राजर्षी शाहू महाराजांसारखी माणसं इतिहासात अजरामर का होतात, याचं हे एक उदाहरण. त्यांच्या द्रष्टेपणाच्या आणि कर्तृत्वाच्या एक पैलूची, त्यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त ही एक आठवण.

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील सहावी गोष्ट.)

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://bhavatal.com/Kolhapur-Dhunyachi-Chavi

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय- bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

 #भवताल #भवतालाच्यागोष्टी #शाहूमहाराज #रंकाळा #धुण्याची_चावी #राधानगरी #कोल्हापूर #Bhavatal #StoriesOfBhavatal #ShahuMaharaj #Rankala #DhunyachiChavi #Radhanagari #Kolhapur

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com



 

 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासाठी समर्पित आयोगासमोर राजकीय पक्षांनी मांडली भूमिका

समर्पित आयोग निवेदनाची योग्य ती दखल घेणार

            मुंबई, दि. 5 : राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी समर्पित आयोग स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. ११ मार्च २०२२ रोजीच्या अधिसूचनेद्वारे “महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षणासाठी समर्पित आयोग” गठीत केला आहे.

            सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या आयोगाच्या कार्यकक्षेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून अभिवेदन / सूचना मागविण्यात आल्या आहेत. दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजीच्या पत्रान्वये मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे मत आयोगासमोर मांडण्यासाठी आज उपस्थित राहण्याचे निमंत्रण राजकीय पक्षांना देण्यात आले होते.

            त्यानुसार कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, भारतीय जनता पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जनता दल (सेक्युलर), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी आणि आम आदमी पार्टी अशा १० राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून त्यांच्या पक्षाची यासंदर्भात भूमिका आयोगासमोर मांडली आणि लेखी निवेदनही सादर केले आहे. या सर्व पक्षांच्या निवेदनाची योग्य ती दखल आयोग घेत असल्याची माहिती समर्पित आयोगाच्या सदस्य सचिवांनी दिली आहे.

000



 अन्य मराठी साहित्य संमेलन आयोजनासाठी अनुदान

साहित्य संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन

            मुंबई, दि. 5 : राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी संस्था नोंदणी अधिनियम १८६० आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या साहित्य संस्थांना सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी सहायक अनुदान देण्यासाठी पात्र संस्थांकडून दि. ०६ मे, २०२२ ते ०६ जून, २०२२ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

            साहित्य संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या व राज्यात अन्य मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या साहित्य संस्था अनुदानासाठी अर्ज करू शकतील. साहित्यबाह्य क्षेत्रात काम करणाऱ्या म्हणजेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विज्ञान, क्रीडा, कृषि, आरोग्य, पर्यावरण व अध्यात्मिक. यांसारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या बहुउद्देशीय संस्थांना अनुदानासाठी अर्ज करता येणार नाही.

            विहित नमुन्यातील अर्ज व नियमावली www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर "नवीन संदेश या सदरात 'अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी अनुदान या शीर्षाखाली 'what's new' या सदरात ‘Grant in Aid for Annya Marathi Sahitya Sammelane' या शीर्षाखाली, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या www.sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर 'नवीनतम संदेश' या सदरात 'अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी अनुदान' शीर्षाखाली उपलब्ध होतील, तसेच सदर अर्ज महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दूसरा मजला, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५२२२४३२ ५९३१) येथे विहित कालावधीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील.

            अनुदानासाठीचे अर्ज विहित नमुन्यात व विहित कालावधीत (दि.०६ मे, २०२२ ते ०६ जून, २०२२) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे सादर करणे बंधनकारक राहील. विहित कालमर्यादेनंतर (दिनांक (२०२२ ते ०६ जून २०२२) येणाऱ्या अर्जांचा अनुदानासाठी विचार केला जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे प्रपाठक रामेश्वर रोकडे यांनी कळविले आहे.

***






 प्रदर्शनाचा उत्स्फूर्त प्रतिसादात समारोप

एकाच ठिकाणी सर्व कामांची माहिती मिळणे ही मोलाची बाब

            मुंबई, दि. 5 : एकाच ठिकाणी शासनाने केलेल्या सर्व कामाची माहिती मिळणे ही मोलाची बाब आहे. अतिशय सुंदर, सुरेख, सर्वसामान्य जनतेला समजेल असे स्पष्ट मुद्दे पहावयास मिळाले !’, ‘प्रत्येक आणि शेवटच्या घटकासाठी शासनाने केलेले काम मोलाचे आहे.’, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आयोजित केलेल्या ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या सचित्र प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांनी अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने शासनाच्या विविध योजना व विकासकामांवर आधारित महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ ते ५ मे २०२२ पर्यंत चित्रमय प्रदर्शन जुहू येथे भरवण्यात आले होते. आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. प्रदर्शनाला सर्वच घटकातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

            प्रदर्शन बघून खूप छान वाटले. महाविकास आघाडी चे सरकार महाराष्ट्रात खूप चांगले काम करत आहे.आपल्या कर्तृत्वाला सलाम. खूपच चांगले काम केले आहे, मुंबई शहर पाहून दुसऱ्या देशापेक्षा महाराष्ट्र राज्य चांगली प्रगती करत आहे. शासनाने खूप कामे केली आहेत. ती कामे आता अशा सचित्र प्रदर्शनामुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतील अशा विविध प्रतिक्रिया प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केल््य


Featured post

Lakshvedhi