Friday, 8 April 2022

 शासनाच्या राज्य विकास कर्ज 2022 ची 11 मे रोजी परतफेड्ड

        मुंबई, दि 8: महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 7.42 टक्के कर्जरोखे 2022 ची परतफेड दि. 11 मे 2022 रोजी करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

            शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. 11 मे 2022 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

            सरकारी प्रतिभूती विनियम, 2007 च्या उप-विनियम 24(2) व 24(3) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याच्या संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

            तथापि,बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 7.42 महाराष्ट्र शासन कर्जरोखे, 2022 च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस" प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली." असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.

            रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत, लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील असे वित्तीय सुधारणा विभागाचे सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्धारे कळविले आहे.

-----०००-----



 

 मुंबई उपनगरसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन.

             मुंबई, दि.८ : "महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या अनुषंगाने" मुंबई उपनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत दि. ०६ ते १४ एप्रिल, २०२२ या कालावधीत जिल्ह्यातील ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील महाविद्यालय संबंधित प्राचार्य व इतर कर्मचारी यांचे करीता जात पडताळणीची कार्यपध्दती याबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

          ही कार्यशाळा दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी दुपारी २.०० ते ४.०० पर्यंत "साठे महाविद्यालय, दीक्षीत रोड, विलेपार्ले, मुंबई" येथे होईल तरी या कार्यशाळेस मुंबई उपनगर जिल्ह्यातील ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांनी तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयातील प्राचार्य व संबंधित कर्मचारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समिती मुंबई उपनगरचे अध्यक्ष रविराज फल्ले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

0000

 विंग्ज इंडिया 2022 पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (एमएडीसी) ला अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान.

            मुंबई, दि. 8 - नागरी उड्डयन मंत्रालय, भारत सरकार (एमओसीए) आणि फिक्कीद्वारे आयोजित विंग्स इंडिया 2022 इव्हेंट आणि अवार्डस् समारंभात महाराष्ट्र एयरपोर्ट डेवलपमेंट कंपनीला (एमएडीसी) अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. 

            सर्वोत्कृष्ट नागरी उड्डयन पद्धती, नवीनतम कल आणि नवकल्पना प्रदर्शित करणे आणि आदान – प्रदान करणे या उद्देशाने दिनांक 24 ते 27 मार्च 2022 या कालावधीत बेगमपेट विमानतळ, हैदराबाद येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

            महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (एमएडीसी) ने विंग्स इंडिया 2022 इव्हेंट आणि विंग्स इंडिया अवॉर्ड्समध्ये "भागीदार राज्य” (पार्टनर स्टेट) म्हणून महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व केले. एमएडीसीने महोत्सवाच्या ठिकाणी अतिशय प्रशस्त, नाविन्यपूर्ण आणि माहितीपूर्ण दालनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विमान वाहतूक क्षेत्रातील ठळक वैशिष्ट्ये, एमएडीसी, मिहान प्रकल्प, मिहानमधील प्रमुख विमान वाहतूक प्रकल्प आणि मिहानमधील कंपन्यांची माहिती प्रदर्शित करत विमान वाहतूक क्षेत्रातील राज्याच्या लक्षणीय कामगिरीचे प्रदर्शन केले. मान्यवर आणि व्यावसायिक ग्राहकांना हाताळण्यासाठी आणि बिझनेस टू बिझनेस मीटिंग आयोजित करण्यासाठी एअरसाइडवर आणखी एक सुंदर दालन उभारण्यात आले होते.

            केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया यांच्या हस्ते, प्रामुख्याने शिर्डी आणि नागपूर विमानतळांसाठी महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड यांना "बेस्ट स्टेट विथ अ डेडिकेटेड आउटलुक फॉर द एव्हिएशन सेक्टर" या श्रेणीतील पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला.

            राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी या पुरस्काराबद्दल एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचे अभिनंदन केले असून एमएडीसी भविष्यातही उत्तम कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


 

 सामान्य माणसाला न्याय हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य;

सामाजिक सौहार्द टिकविण्यावर भर द्या

- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील.

            मुंबई, दि. 8 : सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हे पोलीसांचे प्रमुख कर्तव्य आहे. जनतेच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्याबरोबच सामाजिक सौहार्द टिकविण्यावर भर द्या असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

            पोलीस महासंचालक कार्यालयात आयोजित राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेत ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह व्यासपीठावर उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी राज्यातील गुन्हे आणि कायदा व सुव्यवस्था आणि पोलिसांच्या एकूण कामकाजाचा आढावा घेतला.

            पोलीस दलाच्या विविध क्षेत्रातील विशेष कामगिरीबाबत समाधान व्यक्त करून गृहमंत्री श्री.वळसे-पाटील म्हणाले, राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पोलीस दलाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. भविष्यात यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वोतोपारी सहाय्य करण्यात येईल. एकूणच कामकाज करतांना सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करावे. सामान्यांचे समाधान हे सर्वात महत्वाचे आहे. सामान्य माणूस पोलीस दलाबद्दल काय विचार करतो यावर पोलीसदलाची प्रतिमा अवलंबून असतें.

            पोलिसिंग करतांना निःस्वार्थीपणे काम करुन त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वसामान्यांच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. गुन्ह्यामध्ये वेगवान तपास करुन आश्वासक कामगिरी केली पाहिजे असेही ते म्हणाले.

            सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच वेगवेगळ्या कारणांमुळे सामाजिक वातावरण आणि शांतता धोक्यात येणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. राज्याच्या विविध भागात गुन्हेगारीचे स्वरूप वेगवेगळे आहे. औद्योगिक क्षेत्रातील अशांतता, अवैध धंदे, महिला, बालक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावरील अन्याय अत्याचार हे महत्वाचे विषय असून त्यावर प्राधान्याने कारवाई करावी. पारदर्शी व प्रामाणिकपणे प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी असेही गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी सांगितले.

            गुन्हेसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी पोलिस दलाने प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त करून पोलिसांची सकारात्मक प्रतिमा उंचावण्याबरोबरच पोलिसांचा दरारा निर्माण करावा असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.

            राज्य पोलीस दलाला आवश्यक त्या सर्व सुविधा, आधुनिक सामग्री देण्यात येईल. पोलिसांच्या घरांचे प्रश्न मार्गी लावले जातील. विभागाच्या आधुनिकीकरण आणि बळकटीकरणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिली.

            गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते विविध पोलीस घटकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी प्राप्त अधिकाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

            प्रास्ताविक पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी केले. कायदा व सुव्यस्थेबाबत विविध विभागांच्या प्रमुखांनी सविस्तर सादरीकरण केले.

००००



 भारनियमन टाळण्यासाठी महावितरणलावीज खरेदी करण्यास मान्यता

            राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

            उन्हाळा आणि सिंचनासाठी राज्यातील विजेची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यातच कोळसा टंचाईमुळे अपुरी वीज निर्मिती होऊ लागली आहे. पॉवर एक्सचेंजमध्ये उपलब्ध होणारी वीजही महागडी ठरू लागली आहे. अशा परिस्थितीत राज्यातील विजेचे भारनियमन टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग केंद्रीय विद्युत मंत्रालयाने ठरविल्याप्रमाणे वीज खरेदी करार करण्यासंदर्भात आवश्यक तो निर्णय महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या संचालक मंडळाला घेता येईल, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

            वीजनिर्मिती प्रकल्पातून राज्यातील वीज निर्मिती आणि उपलब्धतेची परिस्थिती पुर्वपदावर येईपर्यंत काही काळाकरिता साधारणतः 15 जून 2022 पर्यंत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला वीज खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली.

            राज्यात सर्वसाधारणपणे एकून वीज वापराच्या 87 टक्के वीज महावितरणकडून वितरीत होते. मार्च 2022 पासून कृषी ग्राहकांकडूनही विजेचा वापर वाढला आहे. तीव्र उन्हाळ्यामुळेही राज्याची उच्चतम मागणी 28 हजार 489 मेगावॅटपर्यंत पोहचली आहे. ही मागणी मागच्या वर्षाच्या तुलनेत 8.2 टक्क्यांनी वाढली आहे. सध्या साडेतीन हजार ते चार हजार मेगावॅटचा तुटवडा भासत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी 1 हजार 900 मेगावॅटचा कोयना जल विद्युत प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालवण्यात येत आहे. परंतू यात पाणी वापरावर मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा यासाठी महावितरणला वीज खरेदी करार करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

-----०-----



 

 


हेल्थ वेल्थ

 खूप छान माहिती आहे संपुर्ण वाचा👌


 1. घशात अन्न अडकणे

 2. मान दुखणे

 3. पायात गोळे येणे

 4. पायला मुंग्या येणे.

 विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी खाली दिलेले सोपे उपाय डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी मदतीचे ठरू शकतात.

समस्या व‌ उपाय

 *१. घशात अन्न‌ अडकणे*

 आपल्याला फक्त "हात वर करणे" आवश्यक आहे.

 हात डोक्यापेक्षा वर सरळ ताणल्यास , आपल्या घश्यात अडकलेले अन्न आपसुक खाली जाण्यास मदत होईल.

 *२. मान दुखी*

 कधीकधी आपण मानेच्या दुखण्यासह सकाळी उठतो. याला चुकीची उशी वापरणे हे एक कारण असू शकते. अशा परिस्थितीत आपण फक्त आपले पाय उचलून जर बोट ओढून आपले पाय एका घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरूद्ध‌ दिशेने हलवले तर आराम मिळू शकेल

 *३. पायात गोळे येणे*

 जेव्हा आपल्या डाव्या पायाला गोळे अथवा‌ पेटके आले असतील तर आपला उजवा हात उंच करा, जेव्हा आपल्या उजव्या पायात पेटके आले असतील तर आपला डावा हात उंच करा. तुम्हाला त्वरित बरे वाटेल.

 *४. पायाला मुंग्या येणे*

  जेव्हा डावा पायास मुंग्या येत असतील तेव्हा आपल्या सर्व सामर्थ्याने आपला उजवा हात गोलाकार फिरवा, जेव्हा उजवा पाय मुंग्या येत असेल, तेव्हा आपल्या सर्व सामर्थ्याने आपला डावा हात गोलाकार फिरवा. याने‌ लगेच फायदा होईल.

 फक्त ही माहिती जतन करू नका.

.. 🚶🏾‍♀️🚶🏾‍♂️🏃🏾‍♀️🏃🏾‍♂️👩🏾‍🦯🧑🏾‍🦯🚶🏾‍♀️🚶🏾‍♂️🏃🏾‍♀️🏃🏾‍♂️

*चालणे म्हणजे दुसरे हदय*

आपल्या पायाच्या पोटरीच्या स्नायूंना जर आपले "दुसरे हृदय" म्हटले तर ती अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही.

सर्वाँना हृदयाचे कार्य काय असते ते ठाउक असेलच.

हृदय म्हणजे शरीरातील एक पंप आहे. हा पंप रक्ताला पुढे पुढे ढकलत राहतो आणि त्यामुळे रक्त शरीरात धमण्या आणि नीला याच्यातून गोल गोल फिरत राहते, ते एका ठिकाणी साचून राहातं नाही.

पण शरीरात आणखीही एक पंप कार्यरत असतो.

होय. खर आहे.

*आपले पोटरीचे स्नायू हेच आपले दुसरे हृदय आहे.*

हृदयाचे काम काय तर रक्त वाहिन्यांच्या जाळ्यातून सतत वाहते ठेवणे. यालाच रक्ताभिसरण असे म्हणतात.

रक्त असे गोल गोल सतत वाहत ठेवणे अत्यंत जरुरी आहे. तसे न झाल्यास आणि जर रक्त एकाच ठिकाणी साचून राहिले, तर शरीरातील अवयवांना रक्त पुरवठा होणार नाही आणि रक्ताच्या गुठळ्या बनून त्या प्राणघातक ठरू शकतात. हृदयाला शरीरात रक्त फिरते ठेवण्यास पायाच्या पोटरीचे स्नायू मदत करतात. जेव्हा आपण चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात आणि स्नायूतील रक्तवाहिन्यांमध्ये असलेले रक्त हृदयाच्या दिशेने ढकलून दिले जाते. निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच तशी केलेली आहे.

पायाच्या पोटरी मधील रक्त वाहिन्या ( नीला ) या एका प्रकारे रक्ताचा साठा करण्याचे काम करतात.

त्यांना " मसल विनस सायनस असे" म्हणतात.

ज्यावेळी पायाचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी पायात साठलेले रक्त नीलांमधून वर, म्हणजे हृदयाच्या दिशेने ढकलले जाते. या पायांच्या रक्त वाहिन्या मध्ये विशेष प्रकारच्या झडपा असतात. या झडपा रक्त वाहण्याची दिशा ठरवितात. या झडपा, रक्ताला पायाकडून हृदयाकडे जाऊ देतात, परंतु हृदया कडून पायाकडे जाऊ देत नाहीत. आपण उभे असताना गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावा मुळे रक्त हे खालच्या दिशेनेच जाण्याचा प्रयत्न करणार हे साहजिकच आहे. या झडपा, गुरुत्वाकर्षणामुळे रक्त पायात साचू देत नाहीत आणि रक्ताला हृदयाच्या दिशेने जाण्यास भाग पाडतात. आपण जेव्हा चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात व हृदयास रक्ताभिसरण करण्यास मदत करतात.

घोट्याखालचा जो पाय असतो त्यात देखिल काही प्रमाणात रक्ताचा साठा केला जातो.

आपण ज्यावेळी चालतो, त्यावेळी सर्वप्रथम तळपा यातील स्नायू आकुंचन पावल्याने तेथील रक्त वर हृदयाच्या दिशेने ढकलले जाते, नंतर जेव्हा पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी सर्व रक्त गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने आणखी पुढे ढकलले जाते आणि हृदयापर्यत पोहोचते.

रक्त वाहिण्यातील झडपा रक्ताला खाली येण्यापासून रोकतात. 

आपण एकाच ठिकाणी खूप वेळ स्तब्ध बसून राहिलो ( विमानात, कारमध्ये, खुर्चीत बरेच तास ) तर पोटरीचे स्नायू आकुंचन पावू शकत नाहीत. रक्त पायातच साचून राहते आणि रक्ताच्या गुठळ्या ( DVT, deep vein thrombosis ) होण्याची शक्यता वाढते. म्हणून चालणे व पळणे किती महत्त्वाचे आहे ते कळते. 

एखादा रुग्ण खूप दिवस अंथरुणात खिळून राहिला तर त्याला DVT होऊ शकते.

याचा अर्थ त्याच्या पायाच्या रक्त वाहिन्या मध्ये रक्ताच्या गाठी होतात. त्यामुळे पायाच्या पोटऱ्या दुखतात, तसेच सूज देखिल येते. अश्या प्रकारच्या रक्ताच्या गाठी पायातून निसटून फफुसात जाऊन फसू शकतात ज्याने जीवाला धोका उद्भवू शकतो.

जर पोटरितील झडपा कोणत्याही कारणाने खराब झाल्या तरी देखील पाय दुखू शकतात. झडपा खराब झाल्या की रक्त पायात साचून राहते. पाय जड होणे, थकवा, पाय ठसठसणे,

घोट्यात सूज, फुगलेल्या पायाच्या नसा, पायात अचानक चमक येवून दुखणे,

खाज येणे, चमडीचा रंग बदलणे, पायात बरी न होणारी जखम होणे, इत्यादी त्रास होऊ शकतो.

*थोडक्यात - चालत रहा,* शक्य असल्यास धावत रहा.

निरोगी आणि सुदृढ रहा.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*👩🏾‍🦯🏃🏻‍♂️चाला आरोग्यासाठी.* 🚶🏾‍♀️🏃🏻‍♂️

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

       जर तुम्ही रोज पहाटे चालत असाल तर तुम्हाला जे फायदे सकाळी मिळतात ते पहाटे मिळणार नाहीत.

जर आपण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने चाललात तर तुम्हाला आरोग्यदायी असे अनेक फायदे मिळतील...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

    ...होय सकाळी कोवळे ऊन येत असताना सहा/ साडेसहाच्या दरम्यान जर तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये चालायला सुरुवात कराल तर तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*सकाळी चालणे आवश्यक का आहे?*

      जेव्हा तुम्ही सकाळी चालायला जाता तेव्हा कोवळे ऊन जर असेल तर तुम्हाला विटामिन डी भरपूर प्रमाणात मिळेल,

त्यामुळे शरिरातील विटामिन डी ची कमतरता भरून निघेल.

दररोज सकाळी चालण्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळेल.

अंधारात ऑक्सीजन कमी उपलब्ध असल्यामुळे तो कमी मिळतो, कारण रात्री झाडे कार्बन डायऑक्साइड सोडतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी कॅल्शियम सोबतच विटामिन डी खूप आवश्यक असते, जर तुम्ही योग्य प्रमाणात कोवळे ऊन तुम्हाला मिळाले तर शरीरात कॅल्शियम चा उपयोग योग्य पद्धतीने होऊ शकतो.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*स्ट्रेस / तणाव मुक्ती साठी उपयोगी.*

        मानसिक ताणतणाव असणाऱ्या व्यक्तींना सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरणे अत्यंत उपयुक्त आहे, किबहुना आवश्यकचं आहे , यामुळे सकाळचे सकाळी चालण्याने मिळणारे सर्व फायदे डिप्रेशन कमी करण्यासाठी उपयोगी उपयुक्त आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर डायबिटीक आहात तर त्या व्यक्तीने कोवळ्या उन्हामध्ये जर फिरले तर डायबेटिस, ब्लडप्रेशर आणि हृदयरोग त्याचबरोबर मानसिक ताणतणाव दूर राहण्यास मदत होते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*सकाळीच का चालायचे?*

      सकाळी हवेमध्ये प्रदूषण कमी असते, वातावरणात शांतता असते, स्फूर्ती प्रदान करणारे असते, त्याचबरोबर शरीरास व्यायाम होतो. ज्याचा फायदा तुमची ऑक्सिजन लेवल वाढण्यासाठी होतो यामुळे तुमची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि प्रतिकारशक्तीही वाढते, फक्त चालताना एकमेकांशी गप्पा मारू नयेत हे महत्त्वाचे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*चालण्याचे सर्वसाधारण फायदे.*

१) त्वचा चमकदार होते, 

२) हृदयाचा स्वास्थ्य चांगले राहते, 

३) मधुमेह नियंत्रणात राहतो, 

४) वजन कमी करण्यासाठी उपयुक्त, 

५) मेंदूची कार्यक्षमता वाढते, 

६) झोप चांगली लागते, 

७) प्रतिकारशक्ती वाढते, 

८) कोलेस्ट्रॉल कमी होते, 

९) कॅन्सर चे पेशंटना उपयोगी, 

१०) मेंदूची कार्यक्षमता वाढते, 

११) प्रतिकारशक्ती वाढते, 

१२) हृदयाची कार्यक्षमता वाढते, 

१३) थकवा दूर होतो, 

१४) शरीरात स्फूर्ती येते, 

१५) कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत, 

१६) चरबीच्या गाठी कमी होण्यास मदत होते.

१७) सर्व प्रकारच्या

 *आजारांपासून मुक्त राहण्यासाठी उपयुक्त.*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

           एकूणच तुमच्या संपूर्ण शारीरिक स्वास्थ्यासाठी दररोज सकाळी कमीतकमी (45 मिनिटे 90 मिनिटे) चालणे आवश्यक आहे....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*चालणे सुरू करताना काय आहे आवश्यक*

१) एक जोडी स्पोर्ट्स शूज,

२) शॉर्ट किंवा लेगिन्स, 

३) शॉर्ट टी-शर्ट, 

४) महिलांसाठी स्पोर्ट्स ब्रा हेअर बँड , 

५) स्पोर्ट्स वॉटर बॉटल 

आणि 

६) तुमचा उत्साह...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

🚶🏾‍♀️🏃🏾‍♂️ *चाला आरोग्यासाठी....*🚶🏾‍♂️🏃🏾‍♀️

*( सुबह की हवा ; सव्वा लाख की दवा...)*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*पायी चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क!* 

अनेकजण सांगतात की, पायी चालल्याचे अनेक फायदे आहेत. अनेकजण चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात. पण आजच्या लाइफस्टाइलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, वेगात चालण्याने डिप्रेशनपासून मुक्ती मिळते. वेगात चालण्याने रुग्णालयात अॅडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहावं लागण्याची भीती कमी होते. 

 हळू चालणा-यांच्या तुलनेत वेगाने चालणा-यांची तीन वर्षात रुग्णालयात अॅडमिट होण्याची 37 टक्के शक्यता कमी आढळली आहे. 

चालणे वयोवृद्धांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. तरुणांनी पण याचा फायदा घ्यावा. हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो. 

*वेगाने चालण्याचे फायदे -*

*1)* आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते. 

*2)* रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते.

*3)* रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो.

*4)* दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते.

*5)* रोज कमीत कमी १ तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो.

*6)* सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.

*7)* हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते.

*8)* चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.

*9)* सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.

*10)* चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत

*11)* चालण्यामुळे झोपही चांगली लागते.

*12)* मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.

*13)* वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम

*14)* चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते

*15)* चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.

*16)* दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलंय.

*17)* चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.

*18)* झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो.

*19)* नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.

*20)* नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.

*21)* नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.

*22)* नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.

*23)* हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.

*24)* नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात.

*25)* मोतीबिंदूची शक्यता कमी होते.

*26)* नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो.

*27)* नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग.

*28)* चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते

होय 29)* दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते. 

*30)* नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे! 🙏🙏🙏

Featured post

Lakshvedhi