Wednesday, 9 March 2022

 आधार सर्व्हरमधील त्रुटी दूर झाल्यानेधान्य वितरण सुरळीत सुरू

            मुंबई, दि. 09 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत पात्र लाभार्थींची ई-पॉसद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तुंचे वितरण करण्यात येते. रास्तभाव दुकानातील ई-पॉस उपकरणांमध्ये मागच्या आठवड्यात आधार सर्व्हरमुळे तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे धान्य वितरण संथ गतीने होत होते. तथापि सदर तांत्रिक अडचण आता दूर झाली असून मागील 4 दिवसांपासून धान्य वितरण सुरळीत होत आहे. मागील 4 दिवसांमध्ये राज्यातील रास्तभाव दुकारातील ई-पॉसद्वारे 30.09 लक्ष व्यवहार झाले आहेत, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.

000


 

 विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या 9 महिलांना

राज्यपालांच्या हस्ते नवदुर्गा सन्मान प्रदान.

            मुंबई, दि. 9 : विविध क्षेत्रात आपल्या विलक्षण प्रतिभेचा आणि उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या ९ महिलांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते जागतिक महिला दिनानिमित्त 'नवदुर्गा' सन्मान प्रदान करण्यात आले.

            पल्लवी फाउंडेशन व स्वामीराज प्रकाशनतर्फे दामोदर हॉल, परळ येथे 'जागर स्त्रीच्या आत्मभानाचा' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपालांच्या हस्ते नवदुर्गा सन्मान प्रदान करण्यात आले.

            कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते व नाट्य निर्माते प्रशांत दामले, पल्लवी फाउंडेशनच्या अध्यक्षा शलाका कोरगावकर, स्वामीराज प्रकाशनच्या रजनी राणे, भाऊ कोरगावकर, अनिल जोशी, ॲड. नैना परदेशी आदी उपस्थित होते.

            समाजातील कर्तृत्ववान महिलांना शोधून त्यांना नवदुर्गा सन्मानाने सन्मानित केल्याबद्दल पल्लवी फाउंडेशन व स्वामीराज प्रकाशन संस्थेचे अभिनंदन करताना राज्यपालांनी मातृशक्तीचा गौरव केला. देशात अनादी काळापासून महिलांना सन्मान दिला जातो. आज महिला सर्व क्षेत्रात पुढे येत आहेत. आगामी युग महिलांचे असून पुढील काळात महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर होतील, असे राज्यपालांनी सांगितले. . 

            या कार्यक्रमात दृष्टिबाधित असून देखील अनेक वाद्यात पारंगत असलेल्या योगिता तांबे, कचऱ्यात गेलेल्या टेट्रापॅकचा पुनर्वापर करणाऱ्या लता पाटील, मराठी शाळांच्या उन्नतीसाठी योगदान देणाऱ्या क्षमा गडकरी, गडकिल्ले संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या सुवर्णा वायंगणकर, जबाबदार नेटिझन्स निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सोनाली पाटणकर, रुग्णसेवेला समर्पित डॉ माया परिहार, नगरसेविका सोनम जामसूदकर, भटक्या कुत्र्यांना मायेची ऊब देणाऱ्या उमा गटानी व योग प्रशिक्षिका रूपा ध्रुव चापेकर यांना राज्यपालांच्या हस्ते नवदुर्गा सन्मान प्रदान करण्यात आले.

            कार्यक्रमात भूषण नेमळेकर, विक्रम मेहता, जाहिरात क्षेत्रातील मनोज चौधरी, औषध निर्माण उद्योगातील आशिष मंगल व जळगाव येथील होमिओपॅथी डॉक्टर सुनील दत्त चौधरी यांना राज्यपालांच्या हस्ते 'सावली' पुरस्कार देण्यात आले.

            यावेळी राज्यपालांच्या हस्ते 'रंगबावरी' या मानिनी चौसाळकर संपादित मराठी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

            कार्यक्रमापूर्वी व नंतर 'उंच माझा झोका' हा महिलांच्या संगीत वाद्यवृंदाचा कार्यक्रम झाला.

0000

Maharashtra Governor presents Navdurga Award to 9 women achievers

      Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Navdurga samman to 9 women achievers for their exceptional work on the occasion of International Women's Day at Damodar Hall Parel Mumbai on Wednesday (9 Mar).

      The Nav Durga Samman ceremony was organised by Pallavi Foundation and Swamiraj Prakashan.

      Film and theater personality Prashant Damle, President of Pallavi Foundation Shalaka Korgaonkar, President of Swamiraj Prakashan Rajani Rane, Bhau Korgaonkar, Anil Joshi, Adv Naina Pardeshi and others were present.

      Visually impaired music artist Yogita Tambe, Lata Patil, Kshama Gadkari, Suvarna Vayangankar, Sonali Patankar, Dr Maya Parihar, Sonam Jamsudkar, Uma Gatani and Rupa Dhruv Chapekar were given the Nav Durga Samman.

      The Governor also presented the 'Savali' Samman to Bhushan Nemnekar, Vikram Mehta, Manoj Chaudhari, Ashish Mangal and Dr Sunil Chaudhari.

      The Governor released the special issue 'Rangabavari' on the occasion. The programme was preceded and followed by an all women musical orchestra.

0000

वृत्त क्र. 769

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे

व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांची विशेष मुलाखत

          मुंबई, दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

          गुरूवार, दि. १० मार्च २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यूट्यूब- https://www.youtube.com/

: जगातील चार अवघड कामे 

१ ) मुंगिला लिपस्टीक लावणं .

२) हत्तीला मांडीवर बसवणं .

३) मच्छरांना कपडे घालणं .

४) *बायकोची समजूत काढणं*.


😜

: सकाळी *water* मध्ये 

       *Heater* टाकून 

  सुरवात केलेल्या दिवसाला

      रात्री *quarter* मध्ये 

  *Water* टाकून संपवणे 

          हेच खरे जगणे..... 

  हा मॅसेज 11 जणांना पाठवा, 

  कोणीतरी बसायला बोलावेल... 


🥃🍷🍸🥂🍻🍺🍾

🍾😂😛😜😝🤣

 रायगड जिल्हा परिषद ने नुकताच जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून गौरव केला आहे ,असे तालुक्यातील नामांकित चित्रकार ,सर्जनशील व्यक्तिमत्त्व ,माणगाव तालुक्यातील शिक्षक संघटनेतील चाणाक्ष व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे घोडशेत वाडी गावाचे सुपुत्रआमचे मोठे बंधू श्री.सखाराम भागोजी कदम यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या वीर यशवंतराव घाडगे यांच्या कॅनव्हास पेंटिंग चे अनावरण रायगड जिल्ह्याचे कलेक्टर श्री महेन्द्र कल्याणकर साहेब यांच्या शुभ हस्ते आणि माणगाव उपविभागीय अधिकारी श्रीमती दिघावकर मॅडम,तहसिलदार प्रियांका अहिरे मॅडम ,गट विकास अधिकारी श्री प्रभे साहेब, गट शिक्षण अधिकारी श्रीमती खरात मॅडम , माजी सैनिक संघटना प्रतिनिधी आणि तालुक्यातील बहुसंख्य अधिकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न....असा कलाकार आमच्या बोरवाडी विभागातील आहे याचा सार्थ आभिमान आम्हा मंडळींना आहे


 विधानसभा इतर कामकाज -

वेबसिरीजवरील महिलांच्या बीभत्स व अश्लिल चित्रणावर बंधने घालण्याबाबत

महाराष्ट्र पोलीसांकडून कारवाई सुरु

- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील.

            मुंबई दि. 8 : वेबसिरीजच्या माध्यमातून महिलांचे बीभत्स व अश्लिल चित्रण होत असल्याच्या तक्रारींची दखल घेवून अशा वेबसिरीजवर बंधने घालण्याबाबत महाराष्ट्र पोलीस कारवाई करत आहे, अशी माहिती गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली. शक्ती विधेयक मान्यतेसाठी राष्ट्रपती यांच्याकडे गेले असून राष्ट्रपती कार्यालयाकडून त्याला मान्यता‍ मिळाल्यानंतर त्या माध्यमातून महिलांना अधिक प्रभावीपणे न्याय देता येईल, असेही श्री. वळसे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

            यावेळी गृह, सार्वजनिक आरोग्य, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागासंबंधित सन 2021-22 या वर्षाच्या पुरवणी मागण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी गृह विभागाच्या चर्चेस उत्तर देतांना गृह मंत्री श्री.वळसे पाटील बोलत होते.

            वेबसिरीजच्या माध्यमातून महिलांचे बीभत्स व अश्लिल चित्रण होत असल्याच्या तक्रारींबाबत गृहमंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सिरीजमधील देहप्रदर्शन आणि इतर दृश्यांवर बंधने घालण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलिसांनी पाऊल उचलले आहे. केंद्रीय प्रसारण विभागाशी बोलून आक्षेपार्ह वेब सिरीजवर बंदी घालण्याबाबत पाउले उचलली जातील.

            गृहमंत्री श्री.वळसे-पाटील म्हणाले, रौलेट या ऑनलाईन गेम्ससंदर्भात आपल्याकडे अजून सक्षम कायदा नाही. पण कुणी महसूल बुडवून फसवणूक करत असेल तर त्यामध्ये गृहखाते गंभीरपणे लक्ष घालेल.

            शक्ती विधेयकाबाबत श्री.वळसे-पाटील म्हणाले, शक्ती विधेयक आता दोन्ही सभागृहे व राज्यपालांकडून मंजूर होऊन राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी गेले आहे. राष्ट्रपती कार्यालयाशी संपर्क साधून या विधेयकाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी विरोध पक्षानेही प्रयत्न करावा, जेणेकरून महाराष्ट्रातील महिलांना न्याय मिळवून देता येईल. शासकीय नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथियांना तीन टक्के आरक्षण देण्याची मागणी पुढे आली असून, त्यावरही येत्या काळात लक्ष घालू. बलात्कार प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी तरतूदी करण्यात येत आहेत, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच राज्यशासन खटले मागे घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तथापि, आंदोलन करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विचार करुनच आंदोलन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            बहुतेक सदस्यांनी आपापल्या मतदारसंघातील पोलिस स्थानकांच्या इमारती आणि पोलिसांच्या निवासस्थानांसंबंधी काही मागण्या यावेळी केल्या होत्या. त्यावर मार्च पूर्वी ८७ इमारतींच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी आवश्यक त्या तरतुदी केल्या आहेत. येणाऱ्या काळात आणखी निधी मिळवण्याचा प्रयत्न आहे. २०२१-२२ मध्ये ७२९ कोटींच्या निधीची मागणी होती, त्यातील ३६४ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. अर्थ विभागाकडून उर्वरित निधी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही केली जाईल. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना चांगली वाहने देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही श्री.वळसे-पाटील यांनी सांगितले.

            सीसीटीव्ही सुरक्षेच्या प्रश्नावर गृहमंत्री श्री.वळसे-पाटील म्हणाले की, सीसीटीव्ही संदर्भात न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. सर्व पोलिस स्टेशन्सच्या हद्दीत सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात न्यायालयाचा आग्रह आहे. सीसीटीव्ही बसवताना तंत्रज्ञान निवडण्यात वेळ जात आहे. त्यावर राज्य सरकार प्राथमिकता ठरवून लवकरच सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण करेल. नगर विकास, ग्राम विकास आणि गृह विभागाच्या माध्यमातून सीसीटीव्ही बसविण्याचे काम करू. गडचिरोली येथे सी 60 दलातील जवान लढाईचे काम करतात, त्यांच्या जीवाला नेहमी धोका असतो. त्यामुळे त्यांना इतर पोलिसांपेक्षा अधिकचा भत्ता वाढवून देण्याची मागणी होत आहे.

            रावेर येथील शेतीच्या भागात होणाऱ्या चोऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी अधिकची पोलिसांची कुमक उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचेही असेही श्री.वळसे-पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

कॅन्सर पीडित महिलांच्या उपचारासाठी पुढाकार – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे.

            आरोग्यमंत्री राजेश टोपे पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना म्हणाले की, कॅन्सर पिडित महिलांसाठी टाटा कॅन्सर इंस्टिट्यूटमध्ये मोफत तपासणी व उपचार दिले जात आहेत. विविध प्रकारच्या कँन्सर पिडित महिलांच्या उपचारासाठी राज्यशासन पुढाकाराने योजना राबवेल. ऑर्गन डोनेशनबाबत राज्यशासनाने टास्क फोर्स नेमलेला आहे. या टास्क फोर्सची लवकरच बैठक घेवून याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. रुग्णालयांचा दर्जा वाढविण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरल्या जात आहेत. काही जागांसाठी एमपीएसीकडे मागणी केली आहे. वर्ग 3 व वर्ग 4 च्या भरतीबाबत कार्यवाही सुरु आहे. तसेच रुग्णालयांच्या इमारत बांधकामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही श्री.टोपे यांनी सांगितले.

            सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत देण्याबाबत बँकाना सूचना दिल्या जातील. आगामी काळात पीक कर्ज वाटप 100 टक्के पूर्ण होईल यासाठी राज्यशासन काम करेल.   

            या चर्चेत सदस्य श्रीमती देवयानी फरांदे, सरोज अहिरे, प्रतिभा धानोरकर, मेघना बोर्डीकर, सुलभा खोडके, मंदा म्हात्रे, सदस्य सर्वश्री रमेश कोरगांवकर, प्रकाश सोळंकी, अबू आझमी, विश्वनाथ भोईर आदींनी सहभाग घेतला.

००००

वृत्त क्र. 752

समाजाच्या विकासासाठी महिला सबलीकरणाची आवश्यकता

- जलसंपदा मंत्री जयंत पाटील.

            मुंबई, दि. 8 : समाज आणि देशाच्या विकासासाठी महिलांना सबळ करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.

            राज्य महिला आयोगाच्या वतीने आदिशक्ती प्रेरणा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, डॉ. इंदिरा हिंदुजा आदी उपस्थित होते.

            जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले की, महिलांकडे कौशल्यपूर्ण काम करण्याची नैसर्गिक गुणवत्ता असते. त्यांना संधी दिली तर त्या अतिशय उल्लेखनीय काम करतात. समाज आणि देशाच्या विकासासाठी महिलांना विविध क्षेत्रात संधी दिली पाहिजे.

            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांनी राज्यातील महाविद्यालय आणि विद्यापीठ परिसर छेडछाडमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. मुलींना भयमुक्त वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

            शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड म्हणाल्या, महाराष्ट्रातील अनेक महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महिलांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. महिलांनी आपल्या अंगभूत गुणवत्तेला विकसित केले पाहिजे.

            सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेची माहिती देणारी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे मार्गदर्शन असलेला संदेश व्हिडिओ क्लिपद्वारे दाखवण्यात आला.

            यावेळी पोलीस आयुक्त संजय पांडे, डॉ. इंदिरा हिंदुजा यांनीही मनोगत व्यक्त केले.

            यावेळी लोहारा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक दिपमला भेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शुभांगी आगाशे, पोलीस कर्मचारी रेणुका सांगळे, प्रतिमा डेरे, श्रीमती रजनीगंधा गेडाम, संध्या दूरधवे, औरंगाबाद जिल्ह्यातील टपरगावच्या सरपंच रुपाली मोहिते, उपसरपंच वैशाली तुपे, सीमा भगवान, संध्या मोहिते, नाशिकच्या माधुरी आहेर, संगीता टेकाडे, नगरच्या ॲड. रंजना पवार-गवांदे, पोलीस उपायुक्त नियती ठाकर-दवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस, पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या दीक्षा दिंडे, मनिषा तोकले यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

            आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रास्ताविक तर कार्यकारी अधिकारी दीपा ठाकूर यांनी आभार मानले.

0000



 


मदर touch


 

Featured post

Lakshvedhi