Friday, 14 January 2022

 डीबीटी पोर्टलद्वारे लाभ घेण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

          मुंबई, दि. 13 : महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.

            त्याचबरोबर 2020-21 या वर्षात अर्ज केलेले मात्र त्रृटी असलेल्या विद्यार्थ्यांना देखील त्रृटींची पूर्तता करणे किंवा अर्जात दुरुस्ती करण्यासाठी 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

            अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील सुमारे 4.70 लाख विद्यार्थी दरवर्षी डीबीटी पोर्टलवरून वरील सवलतींचा लाभ घेत असतात. यावर्षी यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 12 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती.

            काही कोर्सेसचे सीईटीचे राऊंड अजूनही सुरू आहेत, त्यामुळे दि. 12 जानेवारीपर्यंत केवळ 1.16 लाख विद्यार्थीच डीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकले आहेत. याचा विचार करून, पात्र असलेले लाभार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी लाभांपासून वंचित राहू नयेत यासाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास किंवा मागील वर्षीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास 31 जानेवरी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी 31 जानेवारीच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहनही श्री.मुंडे यांनी केले आहे.

००००


 14 ते 28 जानेवारी 2022मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

· साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखकांशी होणार संवाद

            मुंबई, दि. 13 : राज्य शासनाच्या वतिने दि. 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. या अंतर्गत भाषा संचालनालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात मी का लिहितो? या विषयावरील मान्यवरांच्या व्याख्यानासह कवी संमेलन, शालेय विद्यार्थी आणि वाचन, भाषा आणि जीवन यासह इतर विषयावर तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांपैकी काही ऑनलाईन तर काही ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत.

        भाषा संचालनालयाच्या वतीने मराठी भाषा पंधरवडा - 2022 दरम्यान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.       

दि. 14 जानेवारी

            साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त युवा लेखकांशी संवाद हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी हे आहेत. या कार्यक्रमात श्री.प्रणव सखदेव (कथाकार), श्रीमती सोनाली नवांगुळ (अनुवादक), रवी कोरडे (कवी), संजय वाघ, बाल साहित्यिक, सहभागी होणार आहेत या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती विजया डोनीकर, भाषा संचालक या असतील, प्रास्ताविक नामदेव कोळी, आणि सूत्रसंचालन -डॉ.महादेव डिसले करणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 11 ते दु.1 या दरम्यान होणार आहे.

दि. 17 जानेवारी

            मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यवरील परिषद सभागृहात मराठी तरुण कवींचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्ष महेश दत्तात्रय लोंढे असतील. यात कवी अनिल साबळे, पवन नालट, प्रशांत केंदळे, विशाखा विश्वनाथ, अविनाश उषा वसंत, प्रदीप कोकरे, वृषाली विनायक, अक्षय शिंपी, कमलेश महाले कुमार सहभागी होणार आहेत. सूत्रसंचालन नामदेव कोळी, आभार प्रकटन भारत जाधव करतील.

दि. 18 जानेवारी

            आभासी परिसंवाद- मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा होईल का? याचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे आयोजक वाडिया महाविद्यालय, पुणे हे आहेत. या परिसंवादात वक्ते - अच्युत गोडबोले, दिनकर गांगल, अनिल गोरे, विवेक सावंत, अध्यक्ष : विजया डोनीकर, भाषा संचालक, सूत्रसंचालन - प्रा.मनोहर सानप, प्रास्ताविक - भारत जाधव करणार आहेत.

दि. 19 जानेवारी

            आभासी व्याख्यान - मी काय वाचतो?या विषयावर वक्ते नितीन वैद्य, सोलापूर, हे व्याख्यान देणार आहेत. या व्याख्यानाचे आयोजक - भाऊसाहेब नेने महाविद्यालय, पेण हे आहेत. अध्यक्ष : विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक : डॉ.संजय पवार, सूत्रसंचालन :- डॉ.मनीषा पाटील करणार आहेत.

दि. 20 जानेवारी

            आभासी व्याख्यान- प्रशासनात मराठी भाषेचे उपयोजन वक्ते - विजया डोनीकर, भाषा संचालक, आयोजक - संत गोन्साल्वो महाविद्यालय, वसई, अध्यक्ष : सोमनाथ विभुते, प्राचार्य, प्रास्ताविक- संतोष गोसावी

दि. 21 जानेवारी

            आभासी चर्चासत्र- शालेख विद्यार्थी आणि वाचन संस्कृती, आयोजक श्रीमती दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ. सहभाग - दीपा देशमुख, पुणे, सुरेश सावंत, नांदेड, नामदेव माळी, सांगली, रमेश पानसे, अध्यक्ष -विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक -डॉ.संजय पवार, सूत्रसंचालन - प्रा.राजश्री कुलकर्णी

दि. 24 जानेवारी

                व्याख्यान -मुखी माझ्या रमो माय मराठी, प्राचार्य डॉ. महेशचंद्र जोशी, चेतना महाविद्यालय, वांद्रे आयोजक. अध्यक्ष- श्रीमती विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक व सूत्रसंचालन<span lang="HI" style="font-size: 12.0pt; mso-bidi-font-size: 10.0pt; font-family:



 लसीकरणाला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडे

अधिक लस पुरवठ्याची मागणी

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

            मुंबई, दि. 13 : कोविड-19 विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कोव्हीशिल्ड 50 लाख आणि कोव्हॅक्सिनच्या 40 लाख लसींच्या मात्रांचा पुरवठा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातील मुख्यमंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे कोविड स्थितीबाबत आढावा घेतला.

            बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, राज्यमंत्री डॉ.भारती पवार, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, आरोग्य आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

            सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हणाले, केंद्र सरकारने स्टँडर्ड ट्रिटमेंट प्रोटोकॉलबाबत राज्यांना कळवावे. होम किटद्वारे टेस्टींग केल्यानंतर बाधित असलेल्या रुग्णांची कुठेही नोंद होत नाही. या नोंदी ठेवण्यासाठी ज्या मेडीकल दुकानातून या किट खरेदी केल्या आहेत त्यांच्याकडून माहिती गोळा करण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहे. तसेच या नोंदीसाठी यंत्रणा उभी करण्याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वे ठरवावी. राज्यातील निर्बंधाबाबत केंद्र सरकारने विशेष कार्यपद्धती ठरवावी, असे श्री.टोपे यांनी सांगितले.

             लसीकरण मोहिम राबविताना राज्यात पहिली मात्रा 90 टक्के, दुसरी मात्रा 62 टक्के, 15 ते 18 किशोरवयीन मुलांचे 36 टक्के लसीकरण झाले आहे. फ्रंट लाईन वर्कर्स, हेल्थ वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिक यांना द्यावयाच्या प्रतिबंधात्मक मात्रांचे लसीकरण सुरु केले असून लसीकरणाचे प्रमाण आणखी वाढविण्यासाठी लसीकरण मोहिमेला आणखी गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

             पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेबाबत दिलेल्या सूचनेची दखल घेत राज्यातील अर्थव्यवस्थेची गती कायम राहील याची दक्षता घेवून उपाययोजना करण्यात येतील. तसेच आपत्कालीन कोविड प्रतिसाद पॅकेज (ECRP-II) अंतर्गत मनुष्यबळासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. हा निधी 100 टक्के खर्च करण्यात येईल. या पॅकेजद्वारे राज्यांना मिळालेल्या निधीचा खर्च अधिक गतीने करण्यासाठी द्रव्य वैद्यकीय ऑक्सीजन (Liquid Medical Oxygen), ऑक्सीजन पाईपलाईनसाठी केंद्र सरकारने ठरविलेले दरात तफावत असल्याने वाढीव खर्चाला मान्यता देण्यात यावी, असेही आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी यावेळी सांगितले. 

००००



 

Thursday, 13 January 2022

 कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही

- परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची ग्वाही

प्रवासी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी, एसटीच्या भविष्यासाठी

संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर यावे

- ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांचे आवाहन

            मुंबई, दि. 10 : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांहून अधिककाळापासून संप पुकारला आहे. विलिनीकरणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता व घरभाडे भत्ता देण्यात आल्यानंतरही केवळ विलिनीकरणासाठी संप सुरु ठेवण्यात आला आहे. राज्यभरात एसटी बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. आतापर्यंत ज्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, अशा सुमारे 50 हजार कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू झाल्यास त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. त्याचबरोबर बडतर्फ, निलंबित आणि सेवासमाप्ती यासारख्या कारवाई झालेल्या संपकरी कर्मचाऱ्यांच्याबाबतीत वाहतूक सुरळीत सुरु झाल्यानंतर सकारात्मक विचार करू, अशी ग्वाही परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.

            या संपाच्या पार्श्वभूमिवर खासदार शरद पवार व परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी कृती समितीने संपकरी कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या कारवाईबाबत एसटी प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे मत मांडले. तसेच एसटीचे दैवत असलेल्या जनतेचे अतोनात हाल टाळण्यासाठी तातडीने एसटी सुरु करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.

            गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे एसटी महामंडळासारख्या सर्वसामान्यांशी नाळ जोडलेल्या संस्थेला आर्थिक संकटाशी सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये लाखो प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच आपल्या महामंडळाच्या भविष्यासाठी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रूजू व्हावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषीमंत्री व खासदार शरद पवार यांनी केले.

            खासदार श्री.शरद पवार म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ विलिनीकरणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महाराष्ट्रातील लाखो प्रवासी जनतेचे अपरिमित हाल होत आहेत. गेली 70 वर्षांपेक्षा अधिककाळ सर्वसामान्यांची एसटी कष्टकरी एसटी कामगारांच्या प्रामाणिक प्रयत्नांवर व प्रवाशांच्या विश्वासार्हतेवर टिकून आहे. एसटी ही प्रवाशांच्या हितासाठी आहे. प्रवाशांच्या हिताची जोपासना करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक व्यवसाय संकटात सापडले आहेत. त्याला एसटी देखील अपवाद नाही. तरीदेखील एसटीच्या कर्मचाऱ्यांना 41 टक्क्यांपर्यंत वेतनवाढ देण्यात आलेली आहे. हा निर्णय अंत्यत धाडसी असून त्याबद्दल त्यांनी एसटी प्रशासन आणि शासनाचे कौतुक केले. तथापि, कृती समितीने सुधारीत वेतनवाढीतील तफावतीबाबत नोंदविलेल्या आक्षेपावर एसटी प्रशासन आणि राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

            परिवहन मंत्री ॲड.परब म्हणाले, निलंबन, बडतर्फ आणि सेवासमाप्ती झालेले कर्मचारी सोडून सुमारे 50 हजार कर्मचाऱ्यांना गैरहजेरीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हे कर्मचारी कामावर रूजू झाल्यास नोटीस मागे घेण्यात येईल, तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. तसेच या बाबतचे परिपत्रकही काढण्याचे निर्देशही त्यांनी एसटी महामंडळ प्रशासनाला दिले. तसेच याबरोबरच बडतर्फ, निलंबित आणि सेवासमाप्ती यासारख्या कारवाई झालेल्या संपकरी कर्मचाऱ्यांच्याबाबतीत वाहतुक सुरळीत सुरु झाल्यानंतर सकारात्मक विचार करू, असे प्रति़पादन करीत संपकरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन मंत्री ॲड.परब यांनी केले.


००००




 



 सर्वसामान्यांचे आधारवड व्हापोलीस दलाची शान वाढवा

उपमुख्यमंत्री अजित पवार

·        भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

 

            मुंबईदि. 13 : महाराष्ट्राच्या पोलीस दलाला त्यागाचीबलिदानाचीशौर्याची परंपरा  आहे. महाराष्ट्र पोलीस दल जागतिक पातळीवर लौकिक प्राप्त झालेले पोलीस दल आहे. या पोलीस दलाचा राज्यातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. अशा महाराष्ट्र पोलीस दलात सेवा करण्याची आपणास मोठी संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करत सर्वसामान्यांचे आपण आधारवड व्हापोलीस दलाची शान वाढवाअसे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना केले.

            मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी परिविक्षाधीन अधिकारी अभयसिंह देशमुख (प्रशिक्षण जिल्हा लातूर)गोकुल राज (प्रशिक्षण जिल्हा कोल्हापूर)अशीत कांबळे (प्रशिक्षण जिल्हा जळगाव)महक स्वामी (प्रशिक्षण जिल्हा वाशीम)रश्मिथा राव निथीपुडी (प्रशिक्षण जिल्हा बीड)पंकज अतुलकर (प्रशिक्षण जिल्हा औरंगाबाद ग्रामीण)ऋषीकेश रेड्डी सिंगा रेड्डी (प्रशिक्षण जिल्हा रत्नागिरी)तेगबीर सिंह संधू (प्रशिक्षण जिल्हा पुणे ग्रामीण)एम.व्ही. सत्या साई कार्तिक (प्रशिक्षण जिल्हा सोलापूर ग्रामीण)शफकत अम्ना (प्रशिक्षण जिल्हा वर्धा) उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार  म्हणालेपोलीस दलातील अधिकारी म्हणून  सर्वसामान्य जनतेला तुमचा आधार वाटला पाहिजे. आपला माणूस’ अशी तुमची समाजात प्रतिमा असली पाहिजे. नोकरी करताना तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुमच्या कार्यालयात येणाऱ्या माताभगिनींना सन्मानाची वागणूक द्या. त्यांचे प्रश्न समजून घ्या. शाळकरीमहाविद्यालयीन मुलींना कोणी त्रास देत असेल तर त्यांचा बंदोबस्त करा. महाराष्ट्राचा वारसाइतिहाससामाजिक लढेचळवळीपरंपरा आपण समजून घ्या.

            महाराष्ट्र पोलीस दलाची शान वाढवण्याचीप्रतिष्ठा जपण्याचीप्रतिमा उंचावण्यासाठी कार्यरत राहून महाराष्ट्र पोलीस दलाचे वैभव समृद्ध करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

00000

 ☝️खासदार शशी थरूर यांचा हा व्हिडियो नुकताच पाहण्यात आला. एका विद्यार्थिनीने त्यांना असा प्रश्न विचारला की 'ब्रिटिश भारतात आलेच नसते तर काय झालं असतं ?'un त्यावर थरूर यांनी उत्तर दिलंय की, "ब्रिटिश भारतात आले नसते तर आज भारतावर मराठा साम्राज्याचे म्हणजेच महाराष्ट्रातील मराठी जनतेचे देशावर राज्य राहिले असते, आणि मराठ्यांनी म्हणजेच महाराष्ट्रातील मराठी जनतेने छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या लोकशाही आणि सर्वधर्म समभावाच्या विचाराने संविधानिक मार्गाने देशावर राज्य केलं असतं !" आपणही जरूर पहा !


 *साखर पूर्णपणे बंद करण्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का? ठाऊक नसेल, तर ते जाणून घ्यायची इच्छा नक्कीच असेल ना....? तर मित्रहो, साखर पूर्णपणे बंद केल्याने शरीरावर काय परिणाम दिसून येतो हे तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊ या!*

१. साखर कमी केल्याने तुमचे हृदय चांगल्याप्रकारे काम करेल. हृदय हा एक संवेदनशील अवयव आहे, त्यामुळे त्याची अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे. साखर कमी केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

२. साखर कमी केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमधेही फरक दिसेल. तुमची त्वचा आणखी सुंदर आणि तजेलदार दिसेल. विशेषतः रात्रीच्या वेळी साखरेचे पदार्थ न खाल्यास तुमच्या त्वचेववर सुरकुत्या उमटत नाहीत.तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमे, डाग घालवण्यासाठी तुम्हाला क्रीम वगैरे लावायची देखील गरज भासणार नाही. साखर कमी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये विलक्षण फरक दिसेल.

३. साखर कमी केल्याने तुम्हाला शांत झोप लागते. तर दुसरीकडे साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला निद्रानाशास सामोरे जावे लागते.

४. साखर जास्त खाल्याने जळजळ आणि श्वासोच्छवास करण्यास त्रास होणे, अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

५. साखर कमी करून तुम्ही तुमचे अतिरिक्त वजन कमी करू शकता. डोनेट, पेस्ट्री आणि तत्सम साखरयुक्त गोड पदार्थ खाणे बंद केले पाहिजे.

६. साखर कमी केल्याने तुम्ही तुमची स्मरणशक्ती सुधारू शकाल.साखरेचे अधिक सेवन केल्याने तुमच्या बुद्धीयंत्रणेवर परिणाम होतो आणि स्मरणशक्ती कमजोर होते. त्यामुळे साखरेचे सेवन कमी केल्याने तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

७ .साखर कमी केल्याने तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका राहणार नाही. मधुमेह हा आजार तुमच्या यकृतामध्ये वाढणाऱ्या चरबीमुळे होण्याची संभावना असते.साखरेमुळे आपले स्वादुपिंड योग्यरीत्या काम करत नाही. त्यामुळे साखर कमी करणे हा मधुमेहावरचा रामबाण उपाय आहे.

८. साखर बंद केल्यानंतर पोट आणि आतडे चांगल्याप्रकारे अन्न पचवण्यास मदत करते.

९. साखर खाणे बंद केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. साखर पांढऱ्या पेशींना घातक जीवाणू नष्ट करण्यापासून रोखते.

१०. साखर कमी केल्यानंतर तुमच्या सांधेदुखी व तत्सम वेदना (Joint Pains) कमी होण्यास मदत होईल.

११. शरीरातील शर्करेचे प्रमाण कमी झाल्यास इन्सुलिनची मात्रा वाढून मधुमेहाचं प्रमाण कमी करू शकता.

*काय तर मग? घ्याच आता साखर कमी करण्याचा कटू निर्णय!*

*अधिक माहितीसाठी जॉईन करा*

https://chat.whatsapp.com/Ho3lXqZWBrH9hGdABTmPOz

Featured post

Lakshvedhi