Monday, 8 November 2021

 *ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिटनेस प्रशिक्षण !*


🎁🎁 आपल्या आई-बाबा , आजी-आजोबा आणि ओळखीतील इतर ज्येष्ठ नागरिकांना ही भेट अवश्य द्या ! 


ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिटनेस प्रशिक्षण !

मोफत । मराठी । ऑनलाईन । LIVE


नमस्कार मित्रांनो,


वाढत्या वयाबरोबर शरीराच्या तक्रारी सुध्दा वाढायला सुरुवात होते. त्यातच सध्याच्या काळात वयोवृद्ध माणसांनी घरा बाहेर पडू नये, घरातच रहावे अशी सक्त ताकीद दिली जाते. त्यामुळे या वयात बाहेर पडून चालण्याचा जो थोडाफार व्यायाम होत होता तो सुध्दा बंद झाला आहे.


पण खरं तर व्यक्तिला याच वयात सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी व्यायामाची जास्त गरज असते. त्यासाठीच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स आणि फिटनेस मास्टर तर्फे आम्ही विनामूल्य 7 Days Fitness Training for Senior Citizens ट्रेनिंग प्रोग्राम आपल्यासाठी घेऊन येत आहोत.


8 November 2021 पासून दररोज संध्याकाळी 6:00 - 7:00 PM मराठी मधून, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांकडून घरच्या घरी करता येण्यासारखे व्यायाम प्रकार आपण शिकणार आहोत.


यामध्ये अनेक व्यायाम प्रकार, डायटिंग बद्दलचे मार्गदर्शन , आपल्या वयानुसार आणि शरीर रचनेनुसार योग्य व्यायाम अशा अनेक गोष्टी तर आपण शिकणार आहोतच. त्यासोबत तज्ञांना थेट प्रश्न विचारण्याची संधी देखील मिळणार आहे.


👉🏻  *अधिक माहिती आणि मोफत रजिस्ट्रेशन साठी येथे क्लिक करा*  - https://my.netbhet.com/ftsc.html


Whatsapp - 99309 36050 / 90822 05254


धन्यवाद !


टीम नेटभेट

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

www.netbhet.com

 *ज़िंदगी के इस रण में खुद ही*

*कृष्ण और खुद ही अर्जुन*

*बनना पड़ता है। रोज अपना ही* *सारथी बनकर जीवन की* *महाभारत को लड़ना पड़ता है।।*


आपका दिन मंगलमय हो💐🙏

Sunday, 7 November 2021


 

 ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

              *🔸भाऊबीजेची कथा.🔸*


*सूर्याला दोन अपत्य होती. मुलाचे नाव यम आणि मुलगी यमुना अशी त्याची नावे होत. सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला खूप कमी जात असे. यमाला माहीत होते की तो मृत्यूची देवता आहे म्हणून आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्या वर कोणतेही संकट यायला नको आणि म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करायचा. यमुनेच्या सासरच्या लोकांनाही यमाचे त्यांच्या घरी येणे अजिबात आवडत नव्हते, पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती लहानपणापासून एकत्र राहिलेले, पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नसे, आणि त्यामुळेच यमुनेचे यमाला खूप कळकळीची विनंती केली. त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेला भेटायला जावेच लागले. ज्या दिवशी यम यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला, तो दिवस म्हणजेच कार्तिक शुध्द द्वितीया होय..!! यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुने नेे त्याचे अगदी आनंदाने आदरतिथ्य केले. पाटावर बसवून त्याला ओवाळले..! यमानेही बहिणीसाठी साडी, चोळी, अलंकार अनेक भेटवस्तू तिला दिल्या आणि म्हणाला, यमुने माग अजुन काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून! तेव्हा यमुना म्हणाली "मला तर कसली कमी नाही, नको धन नको आणखी काही पण तू दरवर्षी याच दिवशी मला भेटायला येत जा..! आणि हो, या दिवशी जी कोणी बहीण भावाला ओवाळेल त्या तिच्या भावावर तुझी नजर पडू देऊ नको ..! त्यांचे मृत्यू पासून संरक्षण करावे." यमाने यमुनेला तथास्तु म्हटले, आणि म्हणूनच या दिवशी सगळीकडे भाऊबीज साजरी करतात. या दिवशी बहीण भावाला ओवाळत आपल्या भावावर कोणत्याही प्रकार चे संकट येऊ नये आणि आलेल्या संकटापासून त्याचे रक्षण व्हावे हाच यामागील उद्देश होय.*                  

🌹जय गुरु महाराज🌹

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

Saturday, 6 November 2021

 दि. 6 नोव्हेंबर 2021

 

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनाप्रकरणी

मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

दुर्घटनेसंदर्भात व्यक्त केला शोक


            
मुंबई दि. 6 : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटने संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक संवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

            आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने सध्या उपाचारधिन रूग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ते पाहण्यास सांगितले असून जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत.

००००

 

 

अहमदनगर जिल्हा रुग्णालय जीवितहानीबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख

          मुंबई दि. 6 : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील अग्निकांडात झालेल्या जीवित हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 

            अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयु विभागात झालेल्या दुर्दैवी अग्निकांडात काही निरपराध रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचे वृत्त समजून व्यथित झालो. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींना सद्गती लाभो,  यासाठी प्रार्थना करतो तसेच त्यांच्या कुटुंबियांना आपल्या शोकसंवेदना कळवतो. दुर्घटनेतील जखमींना त्वरित बरे वाटावे ही प्रार्थना करतोअसे उत्तराखंड दौऱ्यावर असलेल्या राज्यपालांनी आपल्या  संदेशामध्ये म्हटले आहे. 

0000


 

Vadi re maya


 

Featured post

Lakshvedhi