सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 13 October 2021
‘माविम’च्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लावणार
- महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर
मुंबई, दि. 12 : महिला आर्थिक विकास महामंडळ ही राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी, त्यांना सक्षम करणारी महत्वाची यंत्रणा आहे. या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकर मार्गी लावण्यात येतील असे महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
महिला आर्थिक विकास महामंडळाबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीस माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होत्या.
‘माविम’मधे कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये वाढ करणे, तेजस्विनी उपक्रमा दरम्यान १० टक्के असलेली वेतनवाढ कमी करुन ३ टक्के करण्यात आली होती. नवतेजस्विनी अंतर्गत पुन्हा १० टक्के वाढ लागू करणे आदी प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली. महिला ब बाल विकास विभाग या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक असून हे विषय पूर्णत्वास नेणे बाबत संबंधितांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश यावेळी ॲड.ठाकूर यांनी दिले.
००००
रत्नागिरीतील रिक्त जागा लवकरच भरणार
- आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 31 रुग्णवाहिकांचे लोकार्पण
मुंबई, दि, 12 : रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरल्या जातील, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्हा परिषदेस सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 31 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी श्री. टोपे बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात श्री. टोपे मंत्रालयातून सहभागी झाले.
यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव दूरदृश्यप्रणालीव्दारे सहभागी झाले होते.
सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. यासाठी राज्यात आतापर्यंत एक हजार रुग्णवाहिका घेण्यात आल्या. त्यापैकी 31 रुग्णवाहिका रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत देण्यात येत आहेत. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी विशेष मदत होईल.
रुग्णवाहिकांमुळे अर्भक-मृत्यू दर आणि माता मृत्यू दर कमी होण्यात मदत होईल. रुग्णवाहिकांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागातील गर्भवतींचा संस्थात्मक प्रसूती होईल, याकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने लक्ष द्यावे, अशा सूचना श्री. टोपे यांनी दिल्या.
लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी राज्य शासनाने मिशन कवच कुंडले अभियानात रत्नागिरी जिल्ह्यात जास्त जास्त लसीकरण करण्यासाठी रुग्णांची माहिती संकलित करुन ठेवावी, अशा सूचनाही श्री. टोपे यांनी दिल्या.
लोकार्पण कार्यक्रमास रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. इंदूराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने, शिक्षण आणि अर्थ सभापती चंद्रकांत मंणचेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले उपस्थित होते.
0000
22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे सुरु होणार
मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता
■ सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई, दि. 12 : राज्यातील चित्रपटगृहे 22 ऑक्टोबर 2021 पा
राज्यातील कोविड-19 पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 11 ऑक्टोबर 2021 रो
याशिवाय चित्रपटगृहांमध्ये वेळोवेळी ऑडिटोरिअम, कॉमन एरिया आणि वेंटिग एरिया यामध्ये एकदम गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. सिनेमागृहांमध्ये सिनेमा पाहण्यास येणाऱ्या प्रेक्षकांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. चित्रपटगृहांमध्ये सॅनिटायझर आत आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी, स्वच्छतागृहांमध्ये तसेच इतर ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच चित्रपटगृहांमध्ये येणारे प्रेक्षक कुठेही थुंकणार नाही याची दक्षता घ्यावी, आणि आत येणाऱ्या प्रेक्षकांचे थर्मल चेकअप करणे आवश्यक आहे. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती "सुरक्षित" अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील. याशिवाय प्रेक्षकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रेक्षकांनी ठराविक ठिकाणी कसे उभे राहावे याबाबत आखणी करण्यात यावी. तसेच सिनेमागृहांमध्ये बाहेर पडत असताना गर्दी होणार नाही याची काळजी सुध्दा घेणे आवश्यक आहे. मल्टीप्लेक्समध्ये अनेक सिनेमे वेगवेगळया पडदयांवर दाखवले जातात, अशा वेळी मध्यंतर एकाच वेळी येणार नाही याची काळजी घेण्यात यावी जेणेकरुन प्रेक्षकांची गर्दी होणार नाही.
सिनेमागृहांमध्ये काम करणारे कर्मचारी खाद्य पदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी कार्यरत कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचे सुध्दा लसीकरण करणे आवययक आहे. शॉपिगमॉलमध्ये प्रवेशासाठी पूर्ण लसीकरण हे नियम ठरिवण्यात आले असले तरी मॉलमधील मल्टीप्लेक्समध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपटगृहांच्या तिकिटावर मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल.
सिनेमागृहे 50 टक्के आसनक्षमतेने सुरु करण्यात येणार
सिनेमागृहे आणि मल्टीप्लेक्समध्ये प्रेक्षकांची 50 टक्के आसनक्षमता असेल. याचाच अर्थ दोन प्रेक्षकांमध्ये एका खुर्चीचे अंतर ठेवण्यात यावे. तसेच 50 टक्के आसनक्षमता असताना सिनेमागृहांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. ज्या ठिकाणी प्रेक्षक बसणार नाहीत त्या खुर्चीवर क्रॉस मार्किंग करणे आवश्यक आहे. ऑनलाईन तिकिट काढताना आणि तिकीट खिडकीवर तिकीट काढताना ज्या खुर्च्यावर बसू नये असे मार्किंग करण्यात आले आहे ते नमूद करणे आवश्यक आहे. सिनेमागृहांतील पार्किंगच्या ठिकाणी सुध्दा आणि सिनेमागृहांतील लिफ्टमध्ये सुध्दा गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मल्टीप्लेक्समधील सिनेमांच्या वेळा वेगवेगळया ठेवून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यावे. तिकीट खिडकीवर गर्दी होऊ नये यासाठी डिजिटल पध्दतीने तिकीट बुकींगवर भर देण्यात यावा. तसेच सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये तिकीट काढताना तिकीट खिडकीवर गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन आवश्यक तितक्या तिकीट खिडक्या उघडण्यात याव्यात.मल्टीप्लेक्समध्ये सुध्दा फ्लोअर मॅनेजमेंट करुन गर्दी टाळण्यात यावी.
चित्रपटगृहांमध्ये संपूर्ण जागेचे सॅनिटाईझेशन करण्यात यावे. सिनेमागृहांमधील प्रत्येक स्क्रिनिंग नंतर सॅनिटायझेशन करण्यात यावे. खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, कर्मचाऱ्यांचे बसण्याचे ठिकाणी, स्वच्छतागृहे यांची साफसफाई नियमितपणे करण्यात यावी. सॅनिटायझेशन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट देणे, बुटस, ग्लोज्व्ह, मास्क देण्यात यावे. कोविड संसर्गाचा एक व्यक्ती आढळल्यास त्या जागेचे निर्जंतुकीकरण तात्काळ करण्यात यावे. सिनेमागृहांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. सिनेमागृहांमध्ये काम करणारे ज्येष्ठ कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.या कर्मचाऱ्यांनीही आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे आवश्यक असून या कर्मचाऱ्यांचे दोन डोसचे लसीकरण होऊन 14 दिवसांपेक्षा जास्त कालावधी असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांनी आपली आरोग्य तपासणी नियमित करावी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
याशिवाय सिनेमागृहांमध्ये मोक्याच्या ठिकाणी काय करावे आणि काय करु नये याची माहिती थोडक्यात नमूद करणारे बोर्ड लावणे आवश्यक आहे. हे बोर्ड स्वच्छतागृहे, तिकीट खिडकीजवळ, सिनेमागृहांमध्ये आत येताना, खाद्यपदार्थांच्या स्टॉलजवळ लावणे आवश्यक आहे. तसेच सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना नियमांची माहिती करुन देण्यासाठी माहिती देणारा ऑडिओ संदेश देण्यात यावा. याशिवाय ठिकठिकाणी पोस्टर्स, स्टॅण्डीज यांची उभारणी करण्यात यावी. याशिवाय सिनेमा सुरु होण्यापूर्वी जनहितार्थ कोविड नियमांची माहिती तसेच इतर आवययक माहिती ऑडिओ व्हिज्युअल क्लिप मधून देण्यात यावी.
सिनेमागृहांमधील एअर कंडिशन, व्हेंटिलेशन हे ठरवून दिलेल्या मार्गदर्शक नियमांनुसार असणे आवश्यक आहे. सिनेमागृहांमधील एअर कंडिशन 24 ते 30 सेल्सिअस टेपरेंचर इतका असावा. ह्युमिडीटीची रेंज 40 ते 70 टक्के असावी. सिनेमागृहांमध्ये हवा येईल तसेच क्रॉस व्हेंटिलेशन होईल हे पाहण्यात यावे. सिनेमागृहांमध्ये एक्झॉस्ट फॅन्सची सोय असावी.
कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघरमध्ये जमीन
देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी
- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई, दि. 12 : कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघर येथील जमिनीचे वाटप करण्यासंदर्भात सातारा जिल्हाधिकारी अथवा पुनर्वसन अधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून तातडीने कार्यवाही करावी आणि यासंबंधीचा अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
कोयना प्रकल्पग्रस्तांना पालघर जिल्ह्यात पर्यायी जमीन मिळण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते तर सातारा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री.शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातील ६१ कोयना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी जमीनी बाबत तपासणी करून अहवाल सादर करावा. तसेच यासंदर्भात तातडीने जिल्हा पुनर्वसन अधिकारी किंवा जिल्हाधिकारी सातारा यांनी प्रकल्पग्रस्तांची सुनावणी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे व प्रकल्पग्रस्तांची पात्रता, देय जमीन व वारसांबाबत खात्री करून तातडीने अंतिम निर्णय घ्यावा, असे निर्देश श्री. वडेट्टीवार यांनी यावेळी दिले.
00000Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...