सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 4 October 2021
*आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस युती*
अलिबाग-मुरुडसाठी महेंद्र दळवी यांची घोषणा; शेकापचा पराभव करण्यासाठी एकीचे बळ
अलिबाग, ता. 3: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी विधानसभेच्या अलिबाग-मुरुड मतदार संघासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. महेंद्र दळवी यांनी नवे समिकरण जुळवून आणले आहे. शेतकरी कामगार पक्षाला या मतदार संघातून हद्दपार करण्यासाठी बलाढ्य शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढविणार असल्याची घोषणा महेंद्र दळवी यांनी रविवार (ता.3) रोजी राजमळा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली.
या नव्या समिकरणाची जुळवणी मागिल काही दिवसांपासून सुरु होती. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच ही त्रिपक्षीय आघाडी झाली असल्याची माहिती आ. महेंद्र दळवी यांनी आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिली. या एकीच्या बळाने आपण शेकापला या मतदार संघातून हद्दपार करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. नव्या आघाडीमुळे शेकाप एकाकी पडला आहे. त्यांच्या नेत्यांना पराभव समोर दिसू लागल्यान शेकापचे नेते अर्थहिन आरोप करु लागले आहेत. त्यांच्या आरोपांना आणि धमक्यांना घाबरण्याची वेळ संपली असून शेकापचे अनेक वर्षांचे वर्चस्व संपवण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहनही आ. महेंद्र दळवी यांनी कार्यकर्त्यांना केले. राजमळा येथील मेळाव्यास जिल्हापरिषदेचे विरोधी पक्ष नेता सुरेंद्र म्हात्रे, शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, मुरुड तालुका प्रमुख श्रीकांत डोंगरीकर महिला जिल्हा संघटीका दिपेश्री पोटंफोडे जिल्हा खजिनदार सुरेश म्हात्रे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष निगडे ॲड.सुशील पाटील यांच्यासह अलिबाग मुरुड तालुक्यातील शिवसेना उप तालुका प्रमुख विभाग प्रमुख महिला आघाडी च्या पदाधिकारी संपर्क प्रमुख शिवसेना शाखा प्रमुख उप शाखा प्रमुख आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
मुलांची काळजी घेणे आपली जबाबदारी
सुरू झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत हा निर्धार ठेऊया
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
· राज्यातील शाळा सुरु
· मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद
· ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ अभियानाचे उद्घाटन
· खेळती हवा, निर्जंतुकीकरण, आणि मुलांमध्ये अंतर ठेवण्याच्या सूचना
मुंबई, दि. 4 : आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत अशा निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. शाळा सुरु करुन आपण मुलांच्या विकासाचे, प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. मात्र मुलांची अधिक काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.
कोरोनासाठीचे निर्बंध शिथील करून राज्यातील शाळांची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड, अपर मुख्य सचिव श्रीमती वंदना कृष्णा, या प्रत्यक्ष तर शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, संचालक राहुल त्रिवेदी, टास्क फोर्स सदस्य डॉ.सुहास प्रभू, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT) चे विकास गरड ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, आज जेव्हा सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेत जाणार आहेत. तेव्हा मला माझे शाळेचे दिवस आठवत आहेत. सुटीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. मित्रांना भेटण्याची उत्सुकता असायची, नवीन वह्या-पुस्तके, गणवेश मिळायचे. आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा सर्वात आव्हानात्मक काळ सुरू आहे. मुलं ही फुलासारखी नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते या विषयावर टास्क फोर्सशी नियमित चर्चा होत असते.
शाळा सुरु करताना वर्ग खोल्यांची दारे बंद नसावीत, हवा खेळती असावी, शाळेंचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. निर्जंतुकीकरण करताना मुलांच्या आरोग्याला अपाय होणार नाही याची देखील काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन सांगितले.
आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या. पावसाळ्यामुळे तसेच इतर अनेक साथीचे रोग येत आहेत. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेवावे. स्वःताला बरे वाटत नसेल तर शंका आल्यास लगेच कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन श्री.ठाकरे यांनी केले.
मुलांशी भावनिक संवाद साधणार - प्रा.वर्षा गायकवाड
आजपासून शाळा सुरु होत असल्या तरी काही दिवस मुलांशी भावनिक पातळीवर संवाद साधला जाणार आहे. प्रदीर्घ कालावधीसाठी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक गरज, त्याच्याजवळ शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध असलेली शैक्षणिक साधने यानुसार गुणवत्ता वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.
शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये आपण अनेकदा शाळा सुरु करण्याबाबतचे प्रयत्न केले पण कोविड -१९ ची तीव्रता लक्षात घेवून विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करून आपण प्रत्यक्षपणे शाळा सुरु करू शकलो नाही.
सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचा शुभारंभ
आज जरी ग्रामीण आणि शहरी भागातील काही शाळा आपण सुरु करीत असलो तरी काही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन,ऑफलाईन पद्धतीने त्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ या अभियानाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचा शुभारंभ करीत आहोत. विद्यार्थिनिहाय शैक्षणिक गरजा, उपलब्ध सुविधा, विद्यार्थ्यांचे मुलभूत कौशल्य व अध्ययन नि:ष्पतीचे सर्वेक्षण करून शाळास्तरावर निश्चित व सातत्यपूर्ण आराखडा तयार करून अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये अध्यापनाचे नियोजन, वेळापत्रक, उपस्थिती, साहित्य, पालक सहभाग, मूल्यमापन, अभ्यासेतर नियोजन, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शैक्षणिक सुविधा, शारीरिक आरोग्य व मानसिक स्वास्थ्यासाठीचे विशेष नियोजन करण्यात येणार आहे<span style="font-size: 12.0pt; font-family: DVOT-SurekhMR;" data-mce-style="font-size: 12.0p
विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह पाहून वेगळाच आनंद झाला
- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
· "वेलकम बॅक टू स्कुल..." सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 'शिक्षणोत्सवानिमित्त' जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे केले पुष्प देऊन स्वागत...
· शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण, मास्क सॅनिटायझर आदी सुरक्षा उपाययोजनांबाबत सूचना
परळी (दि. 04) -: कोविड कालावधीच्या मोठ्या ब्रेकनंतर प्रथमच परळी तालुक्यातील टोकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गुलाब पुष्प देत त्यांचे शाळेत स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या वर्गात जाऊन त्यांच्याशी संवाद साधत पालकमंत्री श्री.मुंडे यांनी 'वेलकम बॅक टू स्कुल...' म्हणताच विद्यार्थ्यांनी एका सुरात 'थँकू यु सर...' म्हणत दिलेल्या प्रतिसादाने शाळेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
कोविडच्या काळात जवळपास दीड वर्ष शाळा बंद राहिल्यानंतर, आता दुसरी लाट ओसरली आहे. राज्य सरकारने शाळांची घंटा वाजवण्याचा निर्णय घेतला असून राज्यात शाळा सुरू झाल्या असून राज्यभरात शिक्षणोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद शाळा, टोकवाडी येथे जाऊन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शिक्षणोत्सव पुढे अखंडित सुरू राहावा, अशा शुभेच्छा दिल्या.
पुन्हा नव्याने शाळा सुरू झाल्या आहेत, त्या आता कायम सुरू राहाव्यात यासाठी मास्क, सॅनिटायझर, अन्य स्वछता याबाबत दक्षता घेण्यात यावी. यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण केले जावे, शाळेचा परिसर स्वच्छ ठेवावा याबाबत संबंधितांना सक्त सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत.
यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले.
मधल्या काळात शाळा बंद राहिल्या पण शाळा पुन्हा सुरू होताना विद्यार्थी व शिक्षकांच्या मनातील उत्साह एक वेगळाच आनंद देतो आहे, तसेच मधल्या काळात झालेले शैक्षणिक नुकसानही भरून निघेल असा विश्वास वाटत असल्याची प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी पंचायत समितीचे सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, मार्केट कमिटीचे संचालक सूर्यभान नाना मुंडे, डॉ.राजाराम मुंडे, टोकवाडीच्या सरपंच गोदावरीताई मुंडे, ग्रा.प. सदस्य तुकाराम काळे, नामदेव मुंडे, सुरेश रोडे, शालेय समितीचे अध्यक्ष मदन काळे, गणेश मुंडे, माधव मुंडे, यांसह शाळेचे मुख्याध्यापक श्याम आघाव तसेच शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.
0000
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...