Monday, 6 September 2021

 भानुशाली समाज भाग्यशाली

कच्छी भानुशाली समाजाचे करोना काळातील सेवाकार्य कौतुकास्पदराज्यपाल

 

            मुंबई, दि. 4: व्यापार उदीमाद्वारे धनसंग्रह करून वाडी-इमल्या बांधणे कठीण काम नाही. परंतु ईश्वर कृपेने मिळालेली धनसंपदा आपल्याच उपेक्षित समाज बांधवांमध्ये निःस्वार्थपणे वाटणे हे श्रेयस्कर काम आहे, असे सांगून कच्छी भानुशाली समाजाने कष्टार्जित संपत्तीतून करोनाकाळात समाजासाठी केलेले सेवाकार्य कौतुकास्पद आहेअसे प्रशंसोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.

            स्त्रियांसाठी कार्य करणारे जेडल फाउंडेशन व कच्छी भानुशाली सेवा समाजाच्या माध्यमातून करोनाकाळात उल्लेखनीय सेवाकार्य करणाऱ्या 37 करोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आलात्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांचा यावेळी कच्छी टोपी व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

            कार्यक्रमाला जेडल फाउंडेशनच्या अध्यक्षा विजया चांद्राकच्छी भानुशाली सेवा समाज न्यासाचे अध्यक्ष नरेश सेठीयावल्लभदास भद्राडोंबिवली कच्छी भानुशाली मित्र मंडळाचे विश्वस्त - छायाचित्रकार नवीन भानुशालीअनिल भद्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

            भारताला संतांची मोठी परंपरा लाभली असून त्यांनी सांगितलेली जीवनमूल्ये भारतीय समाजाचा स्थायीभाव झाला असल्याचे सांगताना समाजाचे ऋण मान्य करणारा कच्छी भानुशाली समाज वास्तविक भाग्यशाली समाज आहेअसे राज्यपालांनी सांगितले.

            यावेळी नरेश धनजी शेठियावल्लभदास लीलाधर भद्रादिनेश लक्ष्मीदास चंद्रानवीन भानुशालीअरविंद चंदुलाल चंद्रराजेश पुरुषोत्तम जोईसर, धरमशीभाईनारायण लक्ष्मीदास मिठीयाजितेंद्र परशोत्तम गजरामंजी प्रेमजी गजरासतीश हरीश भद्राभरत रमेश माववीरेन हरिराम गजराअनिल शेठियाअमित मंगलदास मांगेअनिल भद्रामेहुल नारायण भानुशालीजगदीश जोईसरजितेंद्र शंकरलाल शेठियाराधा परिण जोईशरपरिन नवीनचंद्र जोइशरजितेश वालजी भानुशालीउमेश पुरुषोत्तम भानुशालीरावाजी नानजी दामाविशाल दयाराम गोरीजेठालाल नानजी भानुशालीमंथन खिमजी गजराराजेश बाबूभाई भानुशालीदर्शन चंदुलाल हेमानीखुशालभाई गडाअमर वल्लभदास गजरादर्शना दामलेमकरंद प्रभाकर प्रधानधर्मेंद्र नवनीतलाल शाहनिवा सेजल विशाल गडा यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

00000


 

 

Governor hails the contribution of Kutchi Bhanushali community during COVID-19 pandemic; Felicitates 37 Corona Warriors

 

Mumbai, 4th Sept: Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari felicitated 37 Corona Warriors from the Kutchi Bhanushali community at a felicitation organized by Jedal Foundation at Raj Bhavan, Mumbai on Saturday (4th Sept)

 

Speaking on the occasion, the Governor hailed the contribution of the Kutchi Bhanushali community during the COVID-19 pandemic.

 

President of the Jedal Foundation Vijaya Chandra, Secretary Darshan Hemani, photojournalist Navin Bhanushali and President of Kutchi Bhanushali Seva Samaj Trust Naresh Sethia were prominent among those present.

 

The Governor felicitated Naresh Dhanji Sethia, Vallabhdas Liladhar Bhadra, Dinesh Laxmidas Chandra, Navin Bhanushali,  Arvind Chandulal Chandra, Rajesh Purushottam Joyser,  Dharamshibhai, Narayan Lakshmidas, Jitendra Parshottam Gajra and other Corona Warriors on the occasion.

Sunday, 5 September 2021

 [9/4, 6:26 AM] Gym Bhosalee: *सकारात्मकता* 😀


स्वच्छ पांढरा शर्ट घालून ऑफिसला  जाताना कावळ्याने घाण केली तर निराश होऊ नका.


आकाशाकडे बघा, आणि ईश्वराने गाई-म्हशींना पंख दिले नाहीत म्हणून आभार माना.

😊😁

[9/5, 10:26 AM] Gym Bhosalee: आज एक नवीन शब्द शिकलो.


*'Ultracrepidarian'*

(अल्ट्राक्रेपिडारिअन)


 त्याचा डिक्शनरी अर्थ असा आहे

की

 The person having

 habit of giving opinions

 and advice on matters

 outside of his knowledge or

 competence.


आमच्याकडे त्याला *'पुणेकर'* असं म्हणतात.


इंग्रजीमध्ये ना, उगीचच Complicate करतात, 

इतका सोप्पा आणि 

सरळ शब्द असताना!


😀🤪🌹

[9/5, 6:28 PM] Gym Bhosalee: *आज शिक्षक दिन आहे..*

*त्या निमित्ताने गदिमांची एक सुंदर रचना..*


अरे कुंभारासारखा गुरु, 

नाही रे जगात,

वरी घालतो धपाटा,

आत आधाराचा हात॥ध्रु॥


आधी तुडवी, तुडवी, मग हाते कुरवाळी

ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी,

घट थोराघरी जाती,

घट जाती राऊळात ॥१॥


कुणी चढून बसतो, गावगंगेच्या मस्तकी

कुणी मद्यपात्र होतो,

राव राजांच्या हस्तकी

आव्यातली आग नाही,

कुणी पुन्हा आठवत ॥२॥


कुणी पूजेचा कलश, कुणी गोरसाचा माठ

देता आकार गुरुने,

ज्याची त्याला लाभे वाट

घट पावती प्रतिष्ठा,

गुरु राहतो अज्ञात ॥३॥


*॥ शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभकामना ॥*

🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻

Saturday, 4 September 2021

 *सकारात्मकता* 😀


स्वच्छ पांढरा शर्ट घालून ऑफिसला  जाताना कावळ्याने घाण केली तर निराश होऊ नका.


आकाशाकडे बघा, आणि ईश्वराने गाई-म्हशींना पंख दिले नाहीत म्हणून आभार माना.

😊😁

 महा आवास अभियान-ग्रामीण" पारितोषिक वितरण

विकासयोजना राबविताना कोकण विभाग राज्यात अग्रेसर

                                                              -विभागीय आयुक्त विलास पाटील

            नवी मुंबई, दि.03 : लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विकासयोजना राबवितांना सुसंवादाचे वातावरण ठेवले तर मोठे कार्य उभे राहते. कोकण विभाग शासकीय विकासयोजना राबवितांना राज्यात सर्व क्षेत्रात अग्रेसर असतो. असे प्रतिपादन कोकण विभागाचे महसूल आयुक्त श्री.विलास पाटील यांनी केले.

            “महा आवास अभियान-ग्रामीण" अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी व कामगिरीबाबत मूल्यमापन करुन उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना कोकण भवन येथे "महा आवास अभियान-ग्रामीण" पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळयाच्या वेळी ते बोलत होते.

            या कार्यक्रमास श्रीम.पुष्पाताई पाटील अध्यक्षजिल्हा परिषद ठाणे,श्रीम. वैदही विशाल वाढाण अध्यक्षजिल्हा परिषद पालघरश्रीम. योगिता पारधीमा अध्यक्षजिल्हा परिषद रायगड,श्रीम. संजना सावंत अध्यक्षजिल्हा परिषद सिंधुदुर्ग, श्री.भाऊसाहेब दांडगे मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.ठाणेश्री.सिद्धराम सालीमठ मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.पालघरश्री.डॉ.किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.रायगडश्रीम.डॉ.इंदुराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.रत्नागिरीश्री.प्रजित नायर मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.सिंधुदुर्गश्री.गिरीश भालेराव उप आयुक्त(विकास)श्री. मनोज रानडे उप आयुक्त (सामान्य)श्री. मकरंद देशमुख उप आयुक्त (महसुल)श्री. डी. वाय.जाधव उप आयुक्त (आस्थापना)श्री.चंद्रकांत वाघमारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.पालघर श्री.रणधीर सोमवंशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.रायगड/प्रकल्प संचालकजि.ग्रा.वि.यंत्रणारायगड श्री.दादाभाऊ गुंजाळ प्रकल्प संचालकजि.ग्रा.वि.यंत्रणाठाणेश्री.माणिक दिवे प्रकल्प संचालकजि.ग्रा.वि.यंत्रणापालघरश्रीम.नंदिनी घाणेकर प्रकल्प संचालकजि.ग्रा.वि.यंत्रणारत्नागिरी श्री. राजेंद्र पराडकर प्रकल्प संचालकजि.ग्रा.वि.यंत्रणासिंधुदुर्ग  आदि मान्यवर उपस्थित होते.

            पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना आयुक्त श्री.विलास पाटील म्हणाले कीकोकण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक ऊर्जा ठेवून यापुर्वीही काम केले आहे. अशीच ऊर्जा पुढेही ठेवावी. कोकण विभाग नेहमीच शासकीय योजना राबविण्याबाबत आघाडीवर असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोकणातील आदर्श व सुंदर गावे आहेत. कोकणाला नेहमीच स्वच्छतेची आवड आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक करतांना आयुक्त श्री.पाटील म्हणाले कीविकासकामे करतांना जिल्हा परिषदपंचायत समिती व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागते.

            आगामी गणेशोत्सव लक्षात घेता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळयांनी जागरुक राहून शासनाचे नियम पाळणे आवश्यक आहेत.  लोकप्रतिनिधींनी तळागाळापर्यंत कोरोनाबाबत जनजागृती करावी. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली

            सन 2020-21 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यात दि. 20 नोव्हेंबर, 2020 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दि.20 नोव्हेंबर, 2020 ते 5 जुन, 2021 या कालावधीत महा आवास अभियान ग्रामीण " राबविण्यात आले. अभियानात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ठाणे जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला असून संपूर्ण अभियानादरम्यान उत्कृष्ट काम केल्याबद्दल सर्वात जास्त पारितोषिके पालघर जिल्ह्याला मिळाली आहेत.

 

पारितोषिक प्राप्त संस्था पुढीलप्रमाणे

            प्रधानमंत्री आवास योजना- सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद प्रथम क्रमांक-जिल्हा परिषद ठाणेद्वितीय क्रमांक-जिल्हा परिषद रत्नागिरीतृतीय क्रमांक-जिल्हा परिषद रायगड.

राज्य पुरस्कृत आवास योजना- सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद प्रथम क्रमांक-जिल्हा परिषद रत्नागिरीद्वितीय क्रमांक-जिल्हा परिषद सिंधुदूर्गतृतीय क्रमांक-जिल्हा परिषद ठाणे.

             सर्वोत्कृष्ट पंचायत समिती प्रथम क्रमांक-पंचायत समिती म्हसळा जि.प.रायगडद्वितीय क्रमांक-पंचायत समिती दापोलीजि.प.रत्नागिरीतृतीय क्रमांक-पंचायत समिती कुडाळजि.प.सिंधुदुर्ग,

राज्य पुरस्कृत आवास योजना- सर्वोत्कृष्ट पंचायत समिती प्रथम क्रमांक-पंचायत समिती मोखाडा जि.प.पालघरद्वितीय क्रमांक-पंचायत समिती तलासरीजि.प.पालघरतृतीय क्रमांक-पंचायत समिती वैभववाडीजि.प.सिंधुदुर्ग,

 राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे काम सर्वांसाठी आदर्श

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

 

·        राज्यातील उत्तम काम करणाऱ्या स्वयंसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान

           

            मुंबईदि. 3 :  कोरोना काळात राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ( NSS ) स्वयंसेवकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत उत्कृष्ट कार्य केले असून त्यांचे काम आपणा सर्वांसाठी आदर्श असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

            मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना जिल्हास्तरीय कोविड योद्ध्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होतो. त्यावेळी श्री.सामंत बोलत होते.

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणालेकोरोना काळात राज्यातील सर्व विद्यापीठांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महत्वपूर्ण योगदान दिले आहे. एनएसएस स्वयंसेवकांनी, पोलीस मित्रआरोग्य मित्रमहसूल मित्र म्हणून  काम केले आहे. तसेच रक्तदान शिबीरजनजागृती अभियानपरिसर निर्जंतुकीकरण गरजूंना मास्क वाटपभोजनाची व्यवस्थाअन्न वाटपऔषधांचे वाटप अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविले आहेत.

            सामाजिक कार्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करणे ही जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा एकूण 37 एनएसएस स्वयंसेवकांचा जिल्हास्तरावर सन्मान होणार आहे. त्यानंतर यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या 13 कोविड योद्ध्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहेअसेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

            राज्यामध्ये सामाजिक चळवळ निर्माण करण्यात एनएसएसचा मोलाचा वाटा असून राज्यातील एनएसएसचा आदर्श देशभरातल्या इतर राज्यांनी घ्यावाअसे काम राज्यातील चार लक्ष स्वयंसेवक करीत असल्याचे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

            यावेळीप्र-कुलगुरू रविंद्र कुलकर्णीएनएसएस सल्लागार समितीचे सदस्य अंकित प्रभूप्रभारी कुलसचिव बळीराम गायकवाडएनएसएस राज्य संपर्क अधिकारी प्रभाकर देसाईकार्यक्रम समन्वयक सुधीर पुराणिकसिनेट सदस्यपुरस्कारार्थी विद्यार्थी आणि संबंधित उपस्थित होते.

00000


 पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांची दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका

सिडको प्राधिकरणाकडून पुरवल्या जाणाऱ्या नागरी सेवा पुढील दोन महिन्यात पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याचे नगरविकास मंत्र्यांचे निर्देश

 

            मुंबईदि. : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून  सोडवण्यासाठी सिडको प्राधिकरणाकडून पुरवल्या जाणाऱ्या नागरी सेवा पुढील दोन महिन्यात पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानंतर फक्त महापालिकेला कर आकारणीचे अधिकार मिळणार असल्याने दुहेरी कराचा मुद्दा कायमस्वरूपी निकाली निघेलअसेही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. सध्या आकारण्यात आलेल्या दुहेरी मालमत्ता कराचा प्रश्न सकारात्मकरित्या सोडवण्याची तयारीही त्यांनी यावेळी दर्शवली.

            सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीला रायगडच्या पालकमंत्री कु.अदिती तटकरेआमदार बळीराम पाटीलनगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि महेश पाठकपनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, श्री. बबन पाटील आणि पनवेलमधील रहिवासी उपस्थित होते.

            पनवेल महानगरपालिका 2016 मध्ये अस्तित्वात आली. मात्र पहिली काही वर्षे पालिकेने नागरिकांकडून मालमत्ता कर घेतलेला नव्हता. मात्र यावर्षी नागरिकांना मालमत्ता कर देण्यासाठी नोटीसा पाठवण्यात आल्या. मात्र या नोटिसा पूर्वलक्षी प्रभावाने पाठवल्यामुळे नागरिकांनी याबाबत नाराजी दर्शवली होती. पनवेल महानगरपालिका अतित्वात आल्यानंतरही अनेक नागरी सेवा या सिडको प्राधिकरणाकडून पुरवण्यात येत असल्याने आणि त्यासाठी लागणारा सर्व्हिस चार्ज सिडको प्राधिकरण आकारत असल्याने नागरिकांवर दुहेरी मालमत्ता कराचा बोजा पडत होता. जोपर्यंत सिडकोकडून पालिकेकडे सर्व सेवांचे हस्तांतरण होत नाही तोपर्यंत दुहेरी कराची ही तलवार कायम राहणार असल्याने या सर्व नागरी सेवांचे हस्तांतरण पुढील दोन महिन्यात करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी सिडको प्राधिकरण आणि पनवेल महानगरपालिका आयुक्तांना दिले.

            पनवेल महानगरपालिकेकडे सर्व नागरी सुविधा हस्तांतरित झाल्यानंतर त्यांची डागडुजी करण्यासाठी वर्षाला 216 कोटींची गरज असल्याचे पनवेल महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे निधी उभारण्यासाठी मालमत्ता कराची आकारणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सद्यस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना हा कर भरणे शक्य नसल्याने या करातून सवलत देण्याची मागणी रहिवाशांनी केला. लोकांना याबाबत दिलासा देण्यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराबाबत नागरिकांना नक्की दिलासा कसा देता येईल याबाबत कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेऊ असे श्री. शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

००००

 प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी घरांचे सर्वेक्षण करण्याचे

 नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

·        रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दोन महिन्यात पनवेल-उरण पट्ट्यात सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश

·        प्रकल्पग्रस्तांची घरे कायम करणारप्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना नगरविकास मंत्र्यांची ग्वाही

 

            मुंबईदि.3 : पनवेल-उरण गावातील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी या घरांचे रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. हे सर्वेक्षण पुढील दोन महिन्यात पूर्ण करून त्यानंतरच या घरांना नियमित करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेऊ शकेलअसेही त्यांनी स्पष्ट केले.

            सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीस रायगडच्या पालकमंत्री कु. अदिती तटकरेठाण्याचे खासदार राजन विचारेमावळचे खासदार श्रीरंग बारणेआमदार बाळाराम पाटीलआमदार मनोहर भोईरश्री. बबन पाटीलनगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणीसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जीपनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुखआणि प्रकल्पग्रस्तांचे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

            नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेली घर नियमित करण्यासाठी त्याचे सूत्र ठरवण्यासाठी २९ गावांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी दिले होते. त्याच धर्तीवर पनवेल-उरण पट्ट्यातील ५५ गावातील गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासंदर्भात विशेष बैठक सह्याद्री अतिथीगृहात झाली. त्यावेळी या प्रकल्पग्रस्तांच्या घरांची निश्चित आकडेवारी शासनाकडे उपलब्ध नसल्याने त्यांचे सर्वेक्षण करण्याची गरज असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार पुढील दोन महिन्यात हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी या बैठकीत दिले.

            पनवेल-उरण मधील प्रकल्पग्रस्तांनी नवी मुंबई विमानतळासाठी आपली जमीन दिली असल्याने त्यांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत शासन सकारात्मक आहेमात्र त्यासाठी या घरांचे सर्वेक्षण करणे गरजेचे असून त्यानुसार तसे आदेश दिले असल्याचे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यानुसार रायगड जिल्हाधिकाऱ्यांना हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून प्रकल्पग्रस्तांनी देखील त्यासाठी सहकार्य करावेअसे आवाहन श्री शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना या बैठकीत केले. तर शासन जर आमची घरे नियमित करण्यासाठी सकारात्मक असेल तर प्रकल्पग्रस्तही या सर्वेक्षणासाठी शासनाला पूर्ण सहकार्य करतीलअशी ग्वाही प्रकल्पग्रस्तांच्या सर्वपक्षीय नेत्यांनी दिली.

०००००

 

Featured post

Lakshvedhi