Wednesday, 11 August 2021

 कोविड काळात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांना शुल्क माफी

 आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन सकारात्मक

- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

 

          मुंबई दि. 11 : गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी म्हणजेच निवासी डॉक्टर कोविड काळात अहोरात्र काम करीत आहे. या निवासी डॉक्टरांना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            मंत्रालयात महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटने (सेंट्रल मार्ड)च्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांची भेट घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकरसेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर ढोबळे- पाटील, उपाध्यक्ष डॉ. प्रणव जाधवजनरल सेक्रेटरी डॉ.धनराज गीतेॲडीशनल जनरल सेक्रेटरी डॉ. अक्षय चावरेराज्य समन्वयक डॉ. निखील कांबळेजॉईट सेक्रेटरी डॉ. चेतनकुमार आद्रट उपस्थित होते.

            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणालेगेल्या दीड वर्षापासून निवासी डॉक्टर रात्र दिवस कोविड -19 परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काम करीत आहे. त्यामुळे या डॉक्टरांना  शैक्षणिक शुल्क माफी आणि प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असून याबाबत तसा प्रस्ताव तयार करण्यात येईल. वैद्यकीय संचालकांमार्फत प्रस्ताव सादर करुन वित्त विभागाला मंजुरीसाठी पाठविण्यात येईल.

            आपल्या घरापासून दूर राहत अनेक विद्यार्थी वसतीगृहांमध्ये राहून वैद्यकीय शिक्षण घेत असतात. अशा वेळी वसतीगृहांची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. त्यामुळेच वसतीगृहांचा प्रश्न सोडविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण संचालक याबाबत माहिती घेतीलअसेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

            सेंट्रल मार्ड मार्फत शैक्षणिक शुल्क माफीकोविड काळात  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना देण्यात येत असलेल्या प्रोत्साहन भत्त्याप्रमाणे  राज्यातील सर्व  शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता देणे,वसतीगृहांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणेनिवासी डॉक्टरांची सुरक्षितता या मागण्यांचे निवेदन यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांना देण्यात आले.

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसहभागातून राज्यभर

विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे

- मुख्य सचिव सीताराम कुंटे

 

            मुंबई, दि. 11 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभर स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त राज्यभर शिक्षणसांस्कृतिकपर्यटननगर विकाससार्वजनिक बांधकामसहकारकृषी व महिला व बालकल्याण या विभागांतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. त्यामध्ये विद्यार्थीनागरिकविविध संस्था यांच्या सहभागातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावेअसे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

            भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला ७५ वर्ष पुर्ण झाली आहेत. यानिमित्ताने १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत राज्यभर कार्यक्रम राबवून अमृतमहोत्सवी वर्षाचा सोहळा साजरा करावयाचा आहे. त्यासंदर्भात आज मंत्रालयातील परिषद सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य सचिव यांनी राज्यातील सर्व विभागांच्या अधिका-यांशी संवाद साधला. या बैठकीस सर्व विभागाचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            मुख्य सचिव म्हणालेइंडिया ॲट 75 (India@75) या अंतर्गत कार्यक्रम राबवावयाचा असूनस्वातंत्र्य लढासंकल्पसकल्पनासाध्य व कार्यवाही या बाबींवर कार्यक्रमाची आखणी करण्यात यावी. कार्यक्रमांची संकल्पना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याभोवती गुंफलेली असावी. भारताचा स्वातंत्र्यसंग्रामनाविन्यपुर्ण कल्पनानवे संकल्पस्वातंत्र्योत्तर फलनिष्पत्ती आणि अंमलबजावणी या संकल्पनेवर कार्यक्रम आधारलेले असावेत. स्वातंत्र्यचळवळीतील अज्ञात नायकांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचा इतिहास जतन करणेत्यांच्या निवासस्थानी भेट देणेसंबंधित जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्यातील  निगडीत महत्वाची ठिकाणेस्वातंत्र्य चळवळींशी संबंधित व्यक्तीमत्वे यांचा इतिहास जतन करणे. पथनाट्यमहानाट्यचर्चासत्रप्रदर्शन मेळावेलोककलेचे सादरीकरणहेरिटेज वॉकसायकल वॉक या कार्यक्रमांचे लोकसहभागातून आयोजन करण्यात यावेअसेही मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.

            यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरव विजय यांनी प्रास्ताविक केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त करण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत यावेळी सादरीकरण करण्यात आले.

 पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते

बीकेसी येथे मियावाकी वनीकरणास सुरूवात

 

            मुंबईदि. 11 :- मुंबईत अधिकाधिक हिरवाई निर्माण करण्यासाठी कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी जपानी पद्धतीची मियावाकी वने विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. याचाच एक भाग म्हणून एमएमआरडीएच्यावतीने बीकेसी येथील वनीकरणाची सुरूवात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी एमएमआरडीए चे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासअपर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदी उपस्थित होते.

            बीकेसी येथील मियावाकी वनामध्ये पस्तीस प्रजातींची झाडे लावण्यात येत असून यामध्ये फळझाडेफुलझाडेऔषधी गुणधर्म असणारी झाडे अशा विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने चिंचपळसकरंजबेहडासावरसागपेरूआपटाभोकरअडुळसाअनंतातामणविलायती चिंचफणसपळससुरूपारिजातककाशीदमोहासप्तपर्णीबेल यासारख्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.

मियावाकी वनपद्धती

            कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी मियावाकी वने ही कोकणातील 'देवराईशीआणि सिंगापूरमधील 'अर्बन फॉरेस्टसंकल्पनेशी नाते सांगणारी आहेत.

            सामान्य वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणाऱ्या वनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात. सामान्य पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास जेवढा कालावधी लागतो त्या तुलनेत साधारणपणे निम्म्यापेक्षा कमी कालावधी तेवढ्याच उंचीचे झाड वाढते. साधारणपणे दोन वर्षात विकसित होणाऱ्या मियावाकी पद्धतीच्या वनांमध्ये झाडांमधील अंतर हे कमी असल्याने ती घनदाट असतात. साधारणपणे दोन किंवा तीन वर्षांनंतर ही वने नैसर्गिकरीत्या वाढून अव्याहतपणे प्राणवायू देत राहतात. या दृष्टीने मुंबईत अधिकाअधिक मियावाकी वने विकसित करून पर्यावरणीय समतोल राखण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

 💐🌸🌷🍀🍂🌿🌹🌼🌻🍁🌺


        *☝🏻कोण होती भवानी ?*

                     ✍️

महाराष्ट्र राज्यात , मु.पो. सांबरी, ता.अलिबाग ,जि.रायगड या ठिकाणी *भवानी बाई पाटील व हिराबाई पाटील* या दोन जुळ्या बहिनी राहत होत्या.


           इ.स.१६२५/२७ दरम्यान कार्ला संस्थान येथे पोर्तुगीजांचा व्यापार होता तिथे बायकांची विक्री होत असे. हे जेंव्हा *जिजामातांच्या* लक्षात आलं तेंव्हा त्यांनी *शहाजी महाराजांना* ती बातमी सांगितली. 


जनावराप्रमाणे बायकांची विक्री होणे त्यांना पटल नाही हे थांबलं पाहिजे असं त्यांना वाटलं.


तेंव्हा तो व्यापार *शहाजी महाराजां* समवेत जाऊन त्यांनी बंद पाडला व तेथे विक्री साठी असलेल्या *भवानीबाई व हिराबाई* ला सोबत घेऊन आल्या.


       त्यानंतर १९ फेब्रुवारी १६३० ला शिवनेरी किल्ल्यावर *शिवरायांचा* जन्म झाला.


         *शहाजी राजे* मोगल सैन्याशी लढाई करत असतांना त्यांना कल्याण पारगण्यात सहा महिने भुमिगत रहावं लागलं. ( म्हणुनच तो प्रांत *शहापुर* या नावाने प्रसिद्ध झाला.)


       शिवनेरी गडावर निवडक सैन्य होते. व त्यांचा म्होरक्या अर्थात सेनापती साताऱ्यातील वेलंग गावचा *सिद्धनाथ महार* होता.


           *शिवाजी महाराजांच्या* जन्मानंतर पाच वर्षे किल्ला लढविल्यावर किल्ल्यावरील रसद संपत आली. तेव्हा *माँ साहेब जिजाऊंनी*,  निर्णय घेतला , व हिराबाईला सोबत (विश्वासात) घेऊन मोगल सेनापतीला चर्चेत गुंतवलं, आणि *भवानी बाई* पाटील बाळ शिवरायांना घेऊन *साबरी* गावी निघून गेल्या. भवानी बाईने शिवराय ५ ते १२ वर्षाचे होईपर्यंत त्यांचं आई प्रमाणे संगोपन केल.


         इ.स.१६४२ मध्ये *तुकाराम महाराज* कोकण दौऱ्यावर असतांना त्यांनी *जिजाऊ* आणि *भवानीआईची* भेट घडवून आणली. तेंव्हा *जिजाऊं* च्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 


आपल्या मुलाचं संगोपन *भवानी* ने उत्तम पध्दतीने केले ते पाहून त्या भावुक झाल्या.आणि *भवानी आईला* म्हणाल्या *"तु माझ्या बाळाला पोटच्या आपत्यां प्रमाणे वाढवलंस,मी तुला वचन देते भविष्यात जेंव्हा केंव्हा माझ्या मुलाचा जयघोष केला जाईल तेंव्हा तेंव्हा तुझ्या नावाचा प्रथम उल्लेख केला जाईल".*

 आणि तेंव्हा पासून  

*जय भवानी..! जय शिवाजी(शिवराय)..!*

हे घोषवाक्य तयार झाले.


         छत्रपती *शिवरायांना* कोणत्याही प्रकारच्या काल्पनिक देवीने नव्हे तर *आई भवानी पाटील  यांनी व सांबरी गावच्या ग्रामस्थांनी तलवार बाजी व व युद्ध कला शिकवली होती.*


ब्रिटनची राजधानी लंडन च्या संग्रहालयात जी हिरे जडित मुठ असलेली ३५ किलो वजनाची *भवानी तलवार* आहे ती *शिवरायांनी* इ.स.१६४८ दरम्यान कोकणातील सरक्षदार सावंत यांच्या शस्त्रास्त्र लिलावात सुमारे ३५० होन एवढी रक्कम देऊन विकत घेतली होती.अशी नोंद राजेंच्या लेखापाल विभागात आहे. म्हणून *छत्रपती शिवरायांना* कोणत्या तरी *काल्पनिक देवी* ने ही तलवार दिली होती असा चूकीचा प्रचार अजिबात चुकून सुध्दा करु नये.आणि जर देवींनी तलवार दिलीच असती तर महाराजाना एवढे कष्ट यातना सहन करण्याची गरजच पडली असती एकाच *जादूने* सगळे कोमात नाहीतर स्वर्गात पाठवले असते.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 बिना सोंडेचा गणपती पाहीलाय? 

जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख असलेले पाहायला मिळते गणपतीच्या अन्य रुपाची कुणी कल्पनाही करू शकत नाही.मात्र, दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे.मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते. तामिळनाडूमध्ये कुथनूरपासूनजवळ तिलतर्पणपुरी जवळ हे मंदिर आहे. आदि विनायक असे या मंदिराचे नाव आहे गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदि गणपती संबोधले जाते.

|| गणपती बाप्पा मोरया || 🚩

 *एक किलो लोणी...*


एक *शेतकरी* आपल्या गावामधून शहराच्या बाजारात *लोणी* विकण्यासाठी जायचा. 

एका दुकानदाराला त्याचे लोणी खूप आवडले.दुकानदाराने शेतकऱ्याला दररोज एक किलो लोणी घेऊन ये असे सांगितले. शेतकरीसुद्धा हे ऐकून खुश झाला.शेतकऱ्याने त्याच दुकानातून एक किलो साखर आणि इतर वस्तूंची खरेदी केली. सामान घेऊन तो घरी आला. दुसऱ्या दिवसापासून शेतकरी दररोज दुकानावर *एक किलो लोणी* देऊ लागला.

दुकानदारही दररोज शेतकऱ्याला लोण्याचे पैसे देत होता.काही दिवस असेच चालू राहिले.

एका दिवशी दुकानदाराने शेतकऱ्याने दिलेल्या लोण्याचे वजन केले,तर ते *९०० ग्रॅमच भरले*.दुकानदाराला खूप राग आला.पैसे एक किलोचे घेतो. आणि लोणी ९०० ग्रॅमच देतो,हे दुकानदाराला अजिबात आवडले नाही.

शेतकरी *फसवणूक* करत आहे, असा विचार त्याच्या मनात आला...

दुसऱ्या दिवशी शेतकरी लोणी घेऊन दुकानात आल्यानंतर दुकानदाराने त्याच्या समोरच लोण्याचे वजन केले तर ते ९०० ग्रॅमच भरले.आता मात्र दुकानदाराच्या क्रोधाचा पारा अधिकच वाढला.तो शेतकऱ्यावर ओरडून म्हणाला ,तू मला धोका देत आहेस.

शेतकरी म्हणाला, *अहो भाऊ माझ्याकडे वजन करण्यासाठी एक किलोचे मापच नाही,तुमच्याकडून जी एक किलो साखर खरेदी केली होती त्याचे माप बनवूनच मी लोणी मोजून आणतो*.'

शेतकऱ्याचे हे उत्तर ऐकून दुकानदाराची मान शरमेने खाली गेली.

*कारण तो स्वतःच चुकीचे काम करत होता.*

त्याच्या लक्षात आले की,

*आपण जसे कर्म करतो, तसेच फळ आपल्याला मिळते.*


या छोट्याच्या कथेची शिकवण अशी आहे की, *आपण चुकीचे काम केल्यास, आपल्याला त्याचे फळही तसेच मिळते.*

कारण शेवटी *जैसी करनी,वैसी भरनी*.

मी जगाला देईन,तसे जग मला देईल, ही भावना प्रत्येकाच्या मनात सतत असावी.

*सुगंध देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राख उरते,त्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही*

तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे ,तोपर्यंत छान जगा.

कारण जीवन खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा...

*भूक लागली म्हणून, भाकरीऐवजी 'पैसा' खाता येत नाही आणि 'पैसा' जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त "अन्न" खाता येत नाही*

*म्हणजेच जीवनात 'पैशाला' ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे.*

पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा,आयुष्यभर *प्रामाणिक राहून कमाविलेली सोन्यासारखी माणसं* हीच  श्रीमंती आहे.

अत्तर सुगंधी व्हायला, फ़ुले सुगंधी असावी लागतात.


*नाती सुंदर व्हायला ,माणसांचे स्वभाव निर्मळ असावे लागतात.*


            🙏🏻🌹 🌹🙏🏻

Tuesday, 10 August 2021

 

 इंग्रजी माध्यमात पदवीधर झालेल्या सुनेने सासुला विचारलं: 

  "तडफड" म्हणजे नेमके काय  असतं" ?


सासु शांतपणे उठली आणि वायफायचा स्विच बंद केला. म्हणाली...

"घे अनुभव".


😜😜😝😂😂

Featured post

Lakshvedhi