Wednesday, 4 August 2021

 नशाबंदी मंडळाचे प्रलंबित अनुदान तातडीने वितरीत करा

- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

 

·        वार्षिक अनुदानाची रक्कम  ३०  लाखावरून ६० लाख करणार

 

            मुंबई दि. 4 : नशाबंदी मंडळ ही शासनाच्या व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनामार्फत कार्यरत असलेली एकमेव अनुदानित संस्था आहे. राज्यातील भावी पिढी व्यसनाधीन होऊ नये यासाठी पूर्णवेळ कार्यरत असलेल्या या मंडळाचे २०१८ पासूनचे ५४ लाख १५ हजार अनुदान तात्काळ वितरीत करण्यात यावेयाचबरोबर काळाची गरज ओळखून नशाबंदी संदर्भात मोठ्या प्रमाणात तरूणांचे प्रबोधन अत्यावश्यक असून त्याद्वारे महाराष्ट्राची प्रगती साध्य करता येणार आहे. नशाबंदी मंडळाचे काम आणि राज्याची व्याप्ती पाहता दरवर्षी वितरीत होणाऱ्या अनुदानात वाढ करून ती 30 लाखावरून 60 लाख इतकी करण्याच्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

            मंत्रालयात नशाबंदी मंडळ या संस्थेच्या अनुदान व कामकाजासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.

            या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमारसमाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरेसामाजिक न्याय विभागाचे सह सचिव दि.रा. डिंगळे आदिसह नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष माजी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.राजेंद्र वेळुकरकार्याध्यक्ष आयुक्त आर.के. गायकवाडसरचिटणीस वर्षा विद्या विलासकार्यकारिणी सदस्य प्रिया पाटीलडॉ.प्रभा तिरमारेप्रिया पाटील हे उपस्थित होते.

            सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणालेनशाबंदी हा संवेदनशील विषय असूनयाबाबत तरुणांमध्ये जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे.

            २०२०-२१ या आर्थिक वर्षातील एकूण देय अनुदानापैकी १४.८५ हजार इतके अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अंमली पदार्थ विरोधी मोहिम आणि व्यसनाधिन व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी स्वयंसेवी संघटनांना तीन कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.

            व्यसनमुक्ती धोरणाअंतर्गत प्रत्येक महसुली विभागास दोन याप्रमाणे व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या १२ संस्थांना प्रत्येकी ११ लाख अशी एकूण एक कोटी ३२ लाख याचबरोबर राष्ट्रीय महात्मा गांधी पुरस्कार व सातवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तीन कोटी रक्कम वितरीत करण्यात येत असल्याचे श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.

 पॉझिटिव्हीटी दर जास्त असलेल्या चार जिल्ह्यांमध्ये

लसीकरणाचे प्रमाण वाढवावे

- आरोग्यमंत्री राजेश टोपे

           

            मुंबई, दि. 4 : राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर जास्त असून या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यानुसार यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

            या चारही जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या राज्यातील अन्य जिल्ह्यांपेक्षा जास्त आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेमार्फत ट्रॅकिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर अधिक भर दिला जात आहे. या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना नोडल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून जास्तीचे लसीकरण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले आहे.

            कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी कोरोना प्रतिबंध नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर ज्या देशांमध्ये लसीकरण जास्त झाले तेथे तिसरी लाट आली तरी तिचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यामध्ये अधिकाधिक लसीकरण करण्यावर भर देण्यात येत असून अखंडितपणे लस पुरवठ्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

            पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये झिकाचा एक रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून तीन सदस्यांचे पथक पाहणीसाठी आले आहे. या भागात डास उत्पतीची ठिकाणे नष्ट करण्यावर भर देण्यात येत असून लक्षणानुसार उपचार केले जात आहे. या आजाराचे संक्रमण झाले नसून त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत उपाययोजना केल्या जात आहे. झिका वायरसमुळे घाबरुन जाऊ नये असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

 दि. 4 ऑगस्ट 2021

टोकियो ऑलिंपिकमध्ये बॉक्सिंगचं कांस्यपदक जिंकणाऱ्या लव्हलिनचे उपमुख्यमंत्री तथा

राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

लव्हलिन बोर्गोहेन हिच्या बॉक्सिंगमधल्या कांस्यपदकाने

देशाचा गौरव आणि देशवासियांना आनंद बहुगुणीत झाला

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. 4 :- टोकियो ऑलिंपिकमध्ये महिला बॉक्सिंग स्पर्धेचे कांस्यपदक जिंकणाऱ्या लव्हलिन बोर्गोहेन हिचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. तुर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेलीन हिच्याविरुद्ध लव्हलिन जिंकली नसली तरी तिने देशवासियाचे मन जिंकले आहे. टोकियो आलिंपिकमध्ये देशाला तिसरे पदक जिंकून देत तिने देशाचा गौरवदेशवासियांचा आनंद बहुगुणीत केला आहे. लव्हलिनने जिंकलेल्या कांस्यपदकाचे मोल सुवर्णपदकापेक्षा कमी नाही. मुष्ठीयुद्धाचा गौरवशाली इतिहास असलेल्या भारतात लव्हलिनच्या यशापासून प्रेरणा घेऊन  अनेक मुली पुढे येतील. देशाचा गौरव वाढवतीलअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लव्हलिनेचे कौतुक केले असून भविष्यातील उज्ज्वल यशासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

            उपमुख्यमंत्री अभिनंदनपर संदेशात म्हणतात कीलव्हलिन बोर्गोहेनने ऑलिंपिक बॉक्सिंगच्या 69 किलो वजनी गटातलं ऑलिंपिक पदक आधीच निश्चित केले होते. उपांत्यफेरीत विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेलीनकडून पराभव पत्करावा लागला तरीतिने कडवी झुंज दिली. तीच्या मेहनतीचायशाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. लव्हलिनने जिंकलेले ऑलिंपिक पदक भारतीय बॉक्सिंगचा नवी ऊर्जाप्रेरणा देईल. विजेंदरसिंगने 2008 मध्येमेरी कोम हिने 2012 मध्ये जिंकलेल्या बॉक्सिंगच्या ऑलिंपिक पदकांनंतर देशासाठीचे तिसरे ऑलिंपिक पदक जिंकून लव्हलिनने इतिहास घडवला आहे. लव्हलिनच्या यशाचा महाराष्ट्रालादेशाला अभिमान असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे.

००००

 नेवली - हिल लाईन भागात जोडप्यांवर हल्ला केलेल्या घटनेची

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल

आरोपींना त्वरित अटक करण्याचे निर्देश

 

            मुंबई, दि. 4 : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील नेवली व हिल लाईन येथे फिरण्यासाठी गेलेल्या दोन जोडप्यांवर काही आरोपींनी हल्ला करून अत्याचार केलेल्या घटनेची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. आरोपींना त्वरित अटक करण्याचे निर्देश देखील डॉ. गोऱ्हे यांनी पोलीस उपायुक्त श्री मोहिते यांना दिले आहेत.

            या घटनेतील चौघे रविवारी सुट्टी असल्याने सायंकाळच्या सुमारास मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले होते. अचानक पाऊस आल्याने त्यांनी एका शेडचा आसरा घेतला. याठिकाणी उपस्थितीत असलेले समाजकंटक यांनी मुलींना छेडछाड करण्यास सुरुवात केली व त्या मुलींसोबत उपस्थित असलेल्या दोन तरुणांना मारहाण केली. यावेळी त्यांच्या तावडीतून सुटून हे तरुण नेवली पोलीस ठाण्यात आले होते. पोलीस ठाणे येथून त्यांना मेडिकल करण्यासाठी पत्र देण्यात आले होते परंतु तेथे सदरील तरुण तेथे न जाता घरी गेले व त्यांनी सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट व्हायरल केली. यानंतर नेवली पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी त्यांना संपर्क करून गुन्हा नोंद करून घेतला असल्याची माहिती ठाणे पोलीस उपायुक्त श्री प्रशांत मोहिते यांनी डॉ. गोऱ्हे यांना दिली.

            या घटनेत काही त्रुटी असल्याचे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी मेडिकल रिपोर्टला पीडितांना पाठवत असताना पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना का पाठवले नाहीअसे विचारुन अशा घटनेत पीडितेसोबत मेडिकल करण्यासाठी पाठवित असताना पोलीस अधिकारी सोबत पाठविण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी श्री मोहिते यांना केली.

            या घटनेतील आरोपींना अद्यापपर्यंत अटक झाली नाही. त्यामुळे ज्या सुजाण नागरिकांना आरोपीबद्दल माहिती असेल त्यांनी ठाणे पोलीस उपायुक्त श्री मोहिते यांच्याकडे द्यावी त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

            दुर्गाडी किल्लामलंग गडच्या पायथ्याशी किंवा सदरील परिसरात नागरिक मोठ्याप्रमाणात फिरण्यासाठी जात असतात. त्यामुळे याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सूचना देखील डॉ. गोऱ्हे यांनी केली. तसेच यासाठी निधीची आवश्यकता असेल तर ते स्थानिक आमदार निधीतून देण्याची तयारी  डॉ.गोऱ्हे यांनी दाखवली. तसेच या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियंत्रण स्थानिक पोलीस ठाणे आणि कंट्रोल रूम मध्ये ठेवण्याची सूचना यावेळी त्यांनी दिली.

 स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीग्रस्त आजारावरील

उपचाराच्या सुविधेमुळे रुग्णांना नवजीवन

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       शतायुषी नायर रुग्णालयाचे अभिनंदन करताना भविष्यकालीन वाटचालीसाठी मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

·       मुंबईत आता जिनोम सिक्वेन्सींग लॅब

·       डॉ. शिशीर श्रीवास्तव यांच्या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

 

            मुंबईदि. 4 : लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’ या दुर्मिळ आजारावरील महागडी उपचाराची सुविधा येथील नायर रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. यामुळे योग्यवेळी उपचार मिळाल्याने या मुलांना नवजीवन मिळेलअसा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. या सुविधेसोबतच  मुंबईत जिनोम सिक्वेंसिंग लॅब देखील सुरू करण्यात आली असून कोरोनाविरुद्धच्या लढ्याला त्यामुळे बळ प्राप्त झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई यमुनाबाई लक्ष्मण नायर रुग्णालयाच्या शतकोत्तर महोत्सवास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त जिनोम सिक्वेसिंग लॅब आणि स्पिनराझा औषधोपचार प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरआमदार श्रीमती यामिनी जाधवउप महापौर ॲड. सुहास वाडकरमहानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता श्री. रवी राजामहापालिका आयुक्त आय. एस. चहलटास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओकसदस्य डॉ. शशांक जोशीबालरोग तज्ञांच्या टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू आदि मान्यवर उपस्थित होते.

            अनेकांना दीर्घायुष्य  देणाऱ्या शतायुषी नायर रुग्णालयाच्या सेवेला प्रणाम करून सर्व डॉक्टरनर्सेस आणि कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन करीत शतकोत्तर वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते  रेज अगेन्स्ट दि डाईंग ऑफ लाईट या डॉ. शिशिर श्रीवास्तव लिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

            मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यावेळी म्हणालेस्पायनल म्स्क्युलर ॲट्रोफीसारख्या दुर्धर आजारापासून लहान मुलांना वाचवण्याची गरज आहे. या आजारावरील उपचाराचा खर्च हा कोट्यावधीमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी  वेदिका शिंदे या बालिकेचे याच आजाराने निधन झाले. तिला १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्यात आले होते मात्र तिचे प्राण वाचू शकले नाहीत. भविष्यात या आजाराने  लहान मुले दगावू नयेत म्हणून महापलिकेचे डॉक्टर्स अविरत प्रयत्न करत आहेत. त्यावरील औषध भारतात उपलब्ध करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.  आजपासून नायर रुग्णालयात स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’ या दुर्मिळ आजारावरावर उपचाराची सुविधा निर्माण झाली आहे.  अमेरिकास्थित संस्थेच्या माध्यमातून या आजारावर प्रभावी असणारे महागडे इंजेक्शन रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार असून सध्या नायर रुग्णालयातील १७ रुग्णांना त्याचा लाभ होईल.

            कोरोनाविरुद्धची लढाई गेल्या दीड वर्षांपासून सुरू असून त्यात डॉक्टर्सकर्मचारी खंबीरपणे लढत आहेत. या परिश्रमामुळे लाखो नारिकांना जीवनदान देण्याचे काम झाले आहे. मुंबई महापालिकेमार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे जगात मुंबई मॉडेलचे कौतुक झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाचा विषाणु नवीन अवतार घेत असतो. विषाणूने बदलेला अवतार शोधून त्यावर वेळीच उपचार शोधण्यासाठी जिनोम सिक्वेंसिंग लॅब उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे मुंबईमध्ये अशी लॅब असणे गरजेचे होते. आजपासून ही लॅब कार्यरत होईल त्यामुळे कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्याला अधिक बळ प्राप्त होईलअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            कोरोनाची वाढ जिथे जिथे होते तिथल्या विषाणुला शोधून काढणेत्याचे जनुकीय परिणाम शोधणे गरजेचे असते. नसता अनर्थ घडतो. जेवढा विषाणुचा प्रकार ओळखण्यास उशीर तितके त्याचे परिणाम समजून घेणेही कठीण असते हे कोरोना विषाणुवरून आपणास दिसून आले आहे. त्यामुळे मुंबईमध्ये सुरु झालेली जिनोम सिकवेन्सींग लॅब स्थापन करण्याची इच्छा महापालिकेने पूर्ण करून दाखवली. त्यासाठी शासन आणि महापालिकेवर आर्थिक भार न टाकता त्यांनी सीएसआर निधीतून हे काम केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

            यावेळी महापौर किशोरी पेडणेकरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्ष श्रीमती राजुल पटेलडॉ. शशांक जोशीडॉ. संजय ओकमहापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मनोगत व्यक्त केले. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी प्रास्ताविक केले.

            या कार्यक्रमास स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधवश्रीमती राखी जाधवशिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती संध्या दोशीमहिला व बाल कल्याण समिती अध्यक्ष श्रीमती राजराजेश्वरी अनिल रेडकर सह आयुक्त (मनपा आयुक्त कार्यालय) श्री. चंद्रशेखर चोरेउप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कुऱहाडेसंचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) तथा नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांच्यासह संबंधीत मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

            जिनोम सिक्वेसिंग लॅबविषयी : नेक्स्ट जनरेशन जीनोम सिक्वेसिंग ही पद्धती वापरुन विषाणूंचे जनुकीय सूत्र ओळखता येते. त्यामुळे एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते. जिनोम सिक्वेसिंग वैद्यकीय प्रयोगशाळा (लॅब) मध्ये एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय नमुन्यांची चाचणी करता येणे शक्य होते. सध्याच्या कोविड – १९ विषाणू संसर्ग कालावधीत कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करुन उपचारांना वेग देणे शक्य होणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेसिंग संयंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीनेअमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए. एस. जी. - बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून एकूण ६ कोटी ४० लाख रुपये किंमतीचे २ जीनोम सिक्वेसिंग संयंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला दान स्वरुपात दिले आहे. त्यासोबत ए. टी. ई. चंद्रा फाऊंडेशन यांनी देखील सुमारे ४ कोटी रुपयांची मदत या संयंत्रांसाठी आणि त्याद्वारे होणाऱ्या चाचण्यांसाठी केली आहे. जीनोम सिक्वेसिंग संयंत्राद्वारे एकाचवेळी ३८४ नमुन्यांची तपासणी होऊन ४ दिवसांच्या आत वैद्यकीय निष्कर्ष प्राप्त होऊ शकतात.     

          स्पिनराझा औषधोपचार प्रकल्पाविषयी : स्पायनल मस्क्युलर ऍट्रॉफी (एस. एम. ए.) हा लहान मुलांमध्ये आढळणारा दुर्मिळ आजार असून त्यातून मुलांचे स्नायू विकसीत होत नाहीत. परिणामीया आजाराने ग्रस्त संबंधीत मुलांना आयुष्यभर विकलांग जीवन जगावे लागू शकते किंवा त्यांचा मृत्यू देखील ओढवू शकतो. या आजारावरील औषधोपचार अत्यंत महागडे आहेत. ही बाब लक्षात घेताअमेरिकेतील कॅलिफोर्निया स्थित डायरेक्ट रिलिफ या बिगर शासकीय संस्थेने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये स्पायनल मस्क्युलर ऍट्रॉफी रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सदर आजाराने ग्रस्त १७ रुग्णांची निवड आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने केली आहे. या १७ रुग्णांना स्पिनराझा हे औषध देण्यासाठी डायरेक्ट रिलिफ ही संस्था सर्व आर्थिक भार उचलणार आहे. स्पिनराझा औषधाच्या एका डोसची किंमत सुमारे ८७ लाख रुपये इतकी असून पहिल्या वर्षी सुमारे ६ कोटी तरत्यापुढील प्रत्येक वर्षी ३ कोटी २० लाख रुपये इतका खर्च संपूर्ण आयुष्यभर एका रुग्णाला करावा लागतो. ही आत्यंतिक महागडी उपचार पद्धती निवडलेल्या १७ रुग्णांना पुरविण्यासाठी डायरेक्ट रिलिफ ही संस्था महानगरपालिकेला सहकार्य करीत आहे.

0000

 *डाॅ. कडे जाताय..एकदा वाचा !*

*ADR  म्हणजे अडवर्स ड्रग रिअक्शन - संपूर्ण  जगामध्ये  मानवी मृत्यूचे सर्वात मोठे कारण ADR आहे.*  आपण ज्या ऑलोपॅथिक औषिधी घेतो त्यांचा आपल्या शरीरावर प्रतिकूल प्रभाव पडतो व शरीर हळू हळू रुग्ण होत जाते.  


सर्व प्रगत देशांमध्ये जिथे सर्वाधिक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, आय.सी. सी.यु. युनिट्स आहेत, मल्टीस्पेशिअलिटी हॉस्पिटल आहेत, नेओनेटलॉजि युनिट्स आहेत तिथे लोकांचे आरोग्य खराब आहे असे UNO 2007 च्या सर्वेक्षनामध्ये नमूद करण्यात आले आहे.


कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या स्टॅटिन्स या औषधामुळे दरवर्षी 11लाख लोकांना मधुमेह  (Diabetis) होतो.


आणखी एका पुस्तकाने संपूर्ण जगात खळबळ उडूवून दिली आहे त्या पुस्तकाचे नाव आहे *"ओव्हर डोस अमेरिका"* या पुस्तकाचे लेखक डॉ.जॉन अब्राहम या सुप्रसिद्ध अमेरिकन लेखकाने संपूर्ण जगाला पुराव्यानिशी हे दाखवून दिले आहे की, अमेरिकेसहित संपूर्ण जगाचे स्वास्थ्य ऑलोपॅथिक औषधांमुळे कसे खालावत चालले आहे. लेखक हे सुप्रसिद्ध हॉर्वर्ड स्कूल ऑफ मेडिसिन चे मानद सदस्य आहेत.


अँटिडिप्रेसंट औषधी, Antiboitics, कोलेस्टेरॉल च्या औषधी यामध्ये साक्षी बदलवून आकड्यांचा भयंकर उलट फेर करून सर्व जगाला भ्रमीत केले आहे.


आणखी एका पुस्तकाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे *"DEATH BY PRESCRIPTION"* या पुस्तकाचे लेखक सुविख्यात अमेरिकन डॉक्टर *Dr RESTRAIN* आहेत.  


आज  *संपूर्ण जगामध्ये मृत्यूचे सर्वात मोठे कारण हार्टअटॅक अथवा अपघात नसून उपचारादरम्यान दिल्या जाणाऱ्या ऑलोपॅथिक औषधी आहेत* हे Dr. Restrain यांनी सप्रमाण  दाखवून दिले आहे....


*जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आरोग्याची काळजी व जबाबदारी स्वतः घेणार नाही, तोपर्यंत डॉक्टर व हॉस्पिटल काहीच करू शकणार नाहीत.* इतर कोणत्याही कारणांपेक्षा औषधांच्या दुष्परिणामांनी  मरणाऱ्यांची संख्या पाचपट जास्त आहे.

- Dr.B.M.Hegde (पद्मभूषण) MD, FRCP (London)


लोकांना असे वाटते की, ऑलोपॅथिक चिकित्साविज्ञान हे ज्ञान व प्रक्रियांचे सुव्यवस्थित क्षेत्र आहे. परंतु हा केवळ एक भ्रम आहे. हे एक अत्यंत अपूर्ण व अनेक दोषांनी युक्त विज्ञान आहे. ऑपेरेशन व उपचारा दरम्यान मानवी शरीरात घडणाऱ्या जैव रासायनिक प्रक्रिया इतक्या धोकादायक व अनिश्चित असतात - डॉ. अतुल गावंडे (HOD, सर्जरी डिपार्टमेंट - बोस्टन युनिव्हर्सिटी)


हेल्थ चेकअपच्या नावाने एक जबरदस्त व्यापार व भ्रष्ट व्यवस्था अस्तित्वात आहे. लोकांना असं वाटत असेल की पृथ्वीवर जीवंत राहण्यासाठी ऑलोपॅथिक चिकित्सा / औषधी / रक्त - लघवी तपासण्या व हायटेक सर्जरी व टेक्नॉलॉजि आहे तर हे साफ चुकीचे आहे   Famous डॉ. B M हेगडे येथे नमूद करतात, की देवाची कृपा आहे की, हे *ऑलोपॅथिक चिकित्सा विज्ञान only 100-150 वर्ष जुने आहे* & त्यामुळे मानव जात अजून पृथ्वीवर जीवंत आहे.


मानवी प्रतिकार क्षमता किंवा आजार ठीक करण्याची अंगभूत क्षमता यांवर ऑलोपॅथिक डॉक्टरांचा विश्वास नाही. चिकित्सा जगतातील व्यापारीकरणामुळे टेक्नॉलॉजिमुळे चिकित्सेला बाजाराचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.


हृदयरोग व कॅन्सर यामध्ये सर्वाधिक टेक्नॉलॉजि चा वापर केला जातो. हे दोन विभाग प्रचंड पैसा  कमविण्याचे साधन बनले आहेत. बायपास, कॅन्सर, अँपेंडिक्स, मणक्याचे ऑपेरेशन, सिझेरिअन, गर्भाशय काढण्याचे, कृत्रिम गुडघेरोपनाचे ऑपरेशन हे गरज नसतांना सर्रास केले जाणारे व त्याद्वारे प्रचंड पैसा उकळण्याचे साधन बनले आहे.


ऑलोपॅथिक चिकित्सा पद्धती निदान (Dignosis) च्या बाबतीत अचुक आहे असे म्हटले जाते परंतु हा सुद्धा एक भ्रम आहे. त्यात चलाखी, कृत्रिमपणा अधिक असतो. Dr.Jecob Kuriyan यांनी ही निदानाची प्रक्रिया अचूक असूच शकत नाही हे आपल्या पुस्तकात सिद्ध केले आहे.


अनावश्यक रक्त - लघवी तपासणी, X-Ray, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, MRI, एन्डोस्कोपी, अँजिओग्राफी ई.अनेक तपासण्या करण्यासाठी रुग्णांना बाध्य केले जाते. *यापैकी 90% तपासण्यांची रुग्णांना गरज नसते. डॉक्टर स्वतः आपल्या अनुभव व  कौशल्याच्या आधारे योग्य निदान करू शकतात.* जे शेकडो तपासण्यांपेक्षा जास्त अचूक असू शकते. या तपासण्यांमागे 50% पर्यंत कमिशन मिळते हे अमीर खानने सत्यमेव जयते या टीव्ही कार्यक्रमात जगजाहीर केले आहे. यात काही अपवाद नसतील असे नाही.


*अनावश्यक व्हॅक्सिनेशनचा* धंदाही फार जोमात आहे. लसीकरण करतांना BCG, POLIO, TRIPLE, MMR, MISEALS, TYPHOID ई. लसी वगळता अनेक लसी अनावश्यक असून या  लसींची विश्वासाहार्यता आपल्या देशात अगदीच कमी आहे. औषधी कंपन्या लसीकरणाच्या नावाने अब्जावधी रुपयांचा नफा कमवितात. *मेडिकल सायन्सच्या इतिहासात लाखो लोकांचा बळी या अनावश्यक लसीकरणामुळे गेला आहे.*


औषधी कंपन्या आपली औषधं लिहावी म्हणून डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात रोख, भेटवस्तू, विदेश दौरे प्रायोजित करतात. रुग्णांना जास्तीत जास्त औषधं लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. अनावश्यक औषधांच्या दुष्परीणामामुळे रुग्णाच्या शरीरावर घातक दुष्परिणाम होऊन रुग्णांचा जीव व पैसा दोन्हीवर गदा येते. रुग्ण मात्र याबद्दल अनभिज्ञच राहतात.


साच भ्रष्टाचार  OR Unreasonable  Profit Making मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलनी अवलंबलेला असून, अनावश्यक ऑपरेशनची मालिकाच आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्यामुळे अनेक ऑपरेशनचा दुरुपयोग सर्रास होतांना दिसून येतो. खुप कमाई असल्यामुळे अनेक शहरांत सुपरस्पेसिलिटी व मल्टीस्पेसिलिटी हॉस्पिटलची साखळीच निर्माण होत आहे. मोठी कार्पोरेट घराणी आता या व्यवसायात उतरली आहेत.


 *रुग्णाचा आजार किती गंभीर आहे हे रुग्णाच्या नातेवाईकांना अतिशय चांगल्या पद्धतीने पटवून दिले जाते (तो तसा नसतांना). त्याला विचार करायला वेळही मिळू न देता महागडी ऑपरेशन e.g. Bypass, Angioplasty करायला भाग पाडले जाते.* हे सत्य आहे


असे अनावश्यक ऑपरेशन करतांना किंवा उपचार करतांना रुग्ण दगावला अथवा अधिक गंभीर झाला, तर हॉस्पिटल कोणतीही जबाबदारी न घेता पॆसे मात्र पूर्ण वसुल करतात. अनेक वेळा असे दिसून आले आहे की, सामान्य आजारांकरिता केलेल्या अनावश्यक उपचार  अथवा  ऑपरेशनमुळे रुग्णाला जीव गमवावा लागला आहे.


Very Few किडणीचोर  डॉक्टरांच्या कुकृत्यामुळे देशाला अनेक वेळा व्यथित व्हावे लागले.


व्यवस्थेच्या मुळापर्यंत पसरलेला हा भ्रष्टाचार थांबवणे शासकीय यंत्रणेला शक्य नाही. कारण त्याच भ्रष्ट वृत्तीने ही यंत्रणाही किडलेली आहे.


*स्वतः चे स्वास्थ्य अबाधित राहील अशा आरोग्यदायी सवयी  सर्वांनी आत्मसात करायला हव्यात.*


डॉ निलेश वंजारी, MBBS - Boston University

संकलन

(अॅड. विजय हिंमतराव बाजड

  योग शिक्षक )

 [03/08, 21:50] Baby: *इन्फोसिस हेड चा पगार आहे 17 करोड, आणि विराट कोहलीचा 2 महिन्याचा पगार आहे 17 करोड*


*तर एका मुलाने वडिलांना विचारले,मग मी शाळेत जाऊ की खेळायला?*


*तर त्यावर वडिलांनी दिलेले सुंदर उत्तर, स्वतः पुरते पैसे कमवायचे असतील तर खेळायला जा*..

*आणि लोकांना रोजगार द्यायचा असेल तर शाळेत शिकायला जा*


*कारण इन्फोसिस च्या हेड ने दुसऱ्यांन साठी रोजगार निर्माण केला तर कोहली ने स्वतः साठी*...🙏🏻😊

[03/08, 22:58] Baby: *देवाघरी जातानाही हात रिकामा नको.*

💫🌪🌪💫🌪🌪💫🌪🌪💫

*आयुष्याचा शेवटचा मुक्काम कुणीही पाहिलेला नाही पण असं म्हणतात की, हा शेवटचा मुक्काम देवाच्या घरी असतो.*


 *ज्याला आपण कधीही पाहिलेलं नाही पण त्याच्यावर श्रद्धा मात्र असतेच. पाहुणा म्हणून कुणाच्याही घरी जाताना आपण रिकाम्या हाताने जात नाही मग,*


*ज्याची पूजा आयुष्यभर केली, ज्याच्यावर श्रद्धा ठेवली, त्या देवाच्या घरी जाताना तरी मोकळ्या हातांनी कसे जाणार ?*


 *म्हणून जमेल तेव्हा चांगले काम केलं पाहिजे म्हणजे देवाच्या घरी जाताना, त्याच सत्कर्माची शिदोरी घेऊन जाता येईल ना...*


: *किती करशील भरवसा या सुंदर नरदेहाचा।*

*अजून तुला कळला नाही फटका या यमाचा।*

          *मृत्यूची नोटीस नसते,समन्स नसते तर डायरेक्ट पकड वाॅरंट असते.*

       कोणत्याही वयामध्ये ते येऊ शकते.मृत्यू राजा,रंक, लहान,थोर स्त्री,पुरूष काहीही पहात नाही.

         यमदूत वाॅरंट घेऊन येतात तेंव्हा 

दुस-या कोणाला ते सही करून घेता येत नाही किंवा तो माणूस घरात नाही असे सांगताही येत नाही.

कारण *वाॅरंट रिसीव्ह करणे हा प्रश्नच नसतो तर डायरेक्ट बेड्या ठोकल्या जातात (फास आवळला जातो) यमस्य करूणा नास्ती:भूकेलेल्याला ताटावरून,तहानलेल्याला पाण्याचा ग्लास सोडून,शृंगारक्रीडा करणा-याला शयन मंदिरातून,शल्यकर्म चालू असता बेडवरून उचलले जाते.

मृत्यूघटिका टळल्याचे आख्ख्या जगात एक उदाहरण नाही.

मग आपल्याला नेतात  कुठे? हा विचार करणारे फार थोडे. (लंडन,अमेरिकेला जाताना पौंड्स,डाॅलर्स इ.तिथल्या करन्सीची व्यवस्था केली जाते,)

*पण मृत्यूनंतर आपण जेथे जाणार आहोत तेथील अज्ञात परलोकात "पुण्य करन्सी" महत्वाची असते ती जिवंतपणीच जमा करायची असते*

ही जाणीव वृद्धापकाळ आला तरी होत नाही.आपण अमरपट्टा घेऊन आल्याची गैरसमजूत असते.

99 व्या वर्षी 99 वर्षाच्या कराराने जमीन खरेदी करतो आणि सही करतो तोच मृत्यू गाठतो.         *दागदागिने आणि कॅश लाॅकर मध्येच रहाते,*

*गुरे गोठ्यात रहातात.*

*बरोबर काहीच नेता येत नाही*

तरी जीव नश्वराच्याच मागे लागतो.

अजगर बेडकाला गिळतअसतो आणि बेडुक माशा पकडण्यात रंगून जातो.

सहस्त्रचंद्रदर्शन झालेले *राजकारणी पुढील गतीची तयारी न करता नवीन पक्ष काढून राजकारण खेळतात आणि कलावंत करोडो रुपये कमवूनही दहा मिनिटेही परमेश्वराला न देता पैशासाठी परदेश दौरे करतात*.भक्ती बर्वे,पद्मा चव्हाण,मॅरिलीन मनरो,जयश्री गडकर,गणेश भालेराव यांची काय जाण्याची वये होती का?पण *यमाग्रजाने वाॅरंटच* काढले होते.

*बरोबर फक्त शुभाशुभ कर्मेच येतात*

या व्यस्त कलावंताना कुठे वेळ होता पुण्यसंचयासाठी? म्हणून श्रीगुरूचरित्रात महाराज सांगतात की वय तरूण असतानाच पुण्यसंचय करून ठेवा कारण जीविताचा भरवसा नाही.ते मातुःश्रींना म्हणाले,

*"आई तू मला सांगतेस की अग्राह्य संन्यास बालपणी,*

     वानप्रस्थानानंतर 

संन्यास घ्यावा

पण आई मला तेवढे आयुष्य आहे याची खात्री तुला आहे का?

" मातुःश्री निरुत्तर झाल्या.

*प्रपंचाबरोबरच आध्यात्मही जवळ केले म्हणजे ज्ञान व सुरक्षितता लाभते!*


 *"नाही भरवसा या घडीचा रे अभिमान धरीसी कोणाचा"*


यासाठी *भंगवताला प्रेम , भक्ती द्या.* मग तो तुमच्या आवडीचा देव,संत चालेल पण *एकच संत,गुरु,देव* पाहिजे: अनेक नको; तुमची श्रद्धा, भाव त्यावर पाहिजे.मग बघा चमत्कार होतो कि नाही.

*"हरि नामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा।*

    *ही हरीनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा"

______________________________

*🌹।। श्री स्वामी समर्थ।। 🌹*

_________________________

Featured post

Lakshvedhi