Monday, 2 August 2021

 राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम

मुंबईमुंबई उपनगर आणि ठाणेबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार

------

·        उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत काही प्रमाणात सूट

·        नागरिकांनी अतिशय काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

 

            मुंबई, दि. 2 : राज्यातील कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले असून मुंबईमुंबई उपनगर आणि ठाणे या  जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरविणार आहे. अशा रीतीने हे १४ जिल्हे सोडून राज्यातील उर्वरीत जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे . आज सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भात साथरोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ब्रेक दि चेनचे आदेश जारी केले आहेत

            ज्या ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध लागू राहतील ते पुढीलप्रमाणे आहेत : कोल्हापूरसांगलीसातारापुणेरत्नागिरीसिंधुदुर्गसोलापूरअहमदनगरबीडरायगडपालघर. या जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्गसाताराअहमदनगर येथे मोठ्या प्रमाणावर पॉझिटीव्हिटी दर आणि दैनंदिन वाढती रुग्णसंख्या पाहता या जिल्ह्यांतील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन किती प्रमाणात कडक निर्बंध लावायचे त्याचा निर्णय घेतील.

            मुंबईमुंबई उपनगर आणि ठाणे या 3 जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत निश्चित ठरवतील.

उर्वरित जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये खालीलप्रमाणे सूट राहील

            सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तू विक्री न करणारी दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी 3 पर्यंत सुरु राहतील. रविवारी जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने आणि मॉल्स बंद राहतील.

            सर्व सार्वजनिक उद्यानेमैदाने व्यायामचालणेधावणेसायकलिंग आदींसाठी खुले करण्यात आले आहेत

            सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु ठेवणार. प्रवासाची गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांची विभागणी करण्याची सूचना

            जी कार्यालये वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरु ठेवता येऊ शकतात ती तशी सुरु ठेवण्याची सूचना

            सर्व प्रकारची शेतीविषयक कामेबांधकामवस्तूंची वाहतूकउद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.

            जिमव्यायामशाळायोगा केंद्रब्युटी पार्लर्सकेश कर्तनालय यांनी वातानुकूलन वापरायचे नसून सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहतील.

            चित्रपटगृहेनाट्यगृहेतसेच मॉल्समधील मल्टीप्लेक्स हे बंद राहतील. यात कोणतीही सुट नाही.

            राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे बंदच राहतील.

            शाळामहाविद्यालयांच्याबाबतीत शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभाग निर्णय घेईल.

            सर्व उपाहारगृहे ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र आरोग्याच्या कोविडविषयक नियमांचे पालन करावे लागेल. टेक अवे किंवा पार्सल सेवा सध्याप्रमाणे सुरु ठेवता येईल.

            रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडता येणार नाही.

            गर्दीमुळे संसर्ग वाढू नये म्हणून वाढदिवस समारंभराजकीय, सामाजिकसांस्कृतिक समारंभनिवडणुकाप्रचारमिरवणुकानिदर्शन मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत 

            मास्क वापरणेसुरक्षित अंतर यासारखे कोरोना प्रतिबंधक नियम सर्व नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५साथरोग कायदाआणि भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

००००

 ग्राम कृषी संजीवनी समित्या तातडीने गठित करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 

·       ग्रामसेवकांची पदे प्राधान्याने भरण्याची ग्वाही

·       ग्राम कृषी संजीवनी समित्यांचे कामकाज करण्यास ग्रामसेवक युनियन तयार;

·       उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला ग्रामसेवक युनियनचा प्रतिसाद

 

            मुंबईदि. 2 : शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी ग्राम कृषी संजीवनी समिती महत्वाची असून या समित्या तातडीने गठित कराव्यातविशेषत: अकोलाअमरावतीबुलडाणाजालना जळगाव जिल्ह्यातील समित्या गठित करण्याची प्रक्रिया तातडीने गतीमान करावीग्रामसेवकांनी या समितीच्या कामकाजात सदस्य सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारून कामकाज सुरू करावेअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच ग्रामसेवकांची रिक्त पदे प्राधान्याने भरण्यात येतीलअशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

            नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करून अंमलबजावणी करण्याबाबत मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होत. या बैठकीला अॅड रोहिणी खडसेनियोजन विभागाचे अपरमुख्य सचिव देबाशिष चक्रवर्तीग्रामविकास विभागाचे अपरमुख्य सचिव अरविंद कुमारउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगीनानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या संचालक इंद्रा मालोकृषी सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. तर व्हीसीद्वारे जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारीमहाराष्ट्र ग्रामविकास युनियनचे अध्यक्ष एकनाथराव ढाकणेसरचिटणीस प्रशांत जामोदेराज्य कोषाध्यक्ष संजीव निकमपुंडलिक पाटील उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेग्रामीण भागाच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. विशेषत:अकोलाअमरावतीबुलडाणा जालनाजळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या समित्या गठित करण्याची प्रक्रिया गतीमान करावी. औरंगाबादबीडहिंगोलीलातूरनांदेडउस्मानाबादपरभणीवर्धावाशिमयवतमाळ जिल्ह्यातील उर्वरित समित्यांचे गठण करावे. समित्या गठित करण्याचे काम प्राध्यान्याने करून गावातील कामे मार्गी लावावीत.

उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला ग्रामसेवक युनियनचा प्रतिसाद

            ग्राम कृषि संजीवनी समितीत सदस्य सचिव म्हणून काम करण्याबाबतच्या अडचणी ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांकडून उपमुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या. या युनियनचे म्हणणे उपमुख्यमंत्र्यांनी ऐकून घेवून ग्राम कृषि संजीवनी समितीत सदस्य सचिव म्हणून ग्रामसेवकांनी काम करावेअसे आवाहन केले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवून शेतकऱ्यांसाठी थेट काम करण्याची संधी यानिमित्ताने ग्रामसेवकांना मिळते आहे. त्यामुळे या योजनेचे काम करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांनी घ्यावी. जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून शेतकरी बांधवांच्या हितासाठी काम करावेअसे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामसेवक युनियनने कामकाज सुरू करण्याचे मान्य केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी ग्रामसेवकांची पदे प्राधान्याने भरण्यात येतीलअशी ग्वाही दिली.

0000000000000

 पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणार

                              - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

 

             सांगलीदि. 02 : महापूराने झालेल्या नुकसानीमुळे कोणीही खचून जावू नका. राज्यसरकार आपल्या पाठीशी असून पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणारअशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्ररस्तांशी संवाद साधताना दिली.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी कसबे डिग्रज व मौजे.डिग्रज या पूरग्रस्त गावांना भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी  कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदमखासदार धैर्यशील माने,आमदार मोहनराव कदम. आमदार अनिल बाबरआमदार सुमन पाटीलआमदार अरूण लाडमुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.

             पुराचे संकट प्रत्येक वर्षी येते.  पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आता यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाची तयारी आहे, असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधतांना सांगितले.

            मौजे डिग्रज व कसबे डिग्रज येथील पाहणी दौऱ्यात नागरिकांनी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांना निवेदने सादर केली. ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मदत दिली जाईलअसा विश्वास मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना दिला.

000000


 

शासन प्रत्येक घटकाच्या पाठीशी ठाम उभे राहणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

            सांगलीदि. 02 :  शेतकरीव्यापारीछोटे मोठे व्यावसायिक या घटकाचे पुरामुळे नुकसान झाले असले तरी कोणीही खचून जावू नका. राज्यसरकार आपल्या पाठीशी असून आपल्यामध्ये असलेले आपुलकीचे नाते बाळगुयाअसा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारती विद्यापीठ येथे सांगली शहर पूरग्रस्त नागरिक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधताना दिला.

        यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदमआमदार मोहनराव कदममुख्य सचिव सीताराम कुंटेजिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह शहरातील पूरग्रस्त नागरीक व व्यापारी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणालेसांगली जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.  पुरामुळे झालेले नुकसान भरुन न निघणारे आहेपण कोणी खचू नकाराज्यसरकार आपलेच आहे. आपल्या दु:खाची सरकारला जाण आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी शासन प्रत्येक घटकाला मदत करेल. आता पूर ओरसत आहेत्यामुळे पंचनामे करण्याचे काम गतीने पूर्ण करुन पूरग्रस्तांना न्याय दिला जाईल. पुरामुळे बाधित झालेला कोणताही घटक मदतीपासून वंचित राहणार नाहीयाची खबरदारी घेतली जाईल, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

           मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, पूरग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत करण्याचे काम सुरु आहे. मदतीचे हे निकष 2015 चे आहेत. हे निकष बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. राज्य शासनाप्रमाणेच बँकाविमा कंपन्यांनीही पुढे येऊन पूरग्रस्तांना मदत करावी. राज्याच्या महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे विमा कंपन्यांनी ग्राह्य धरावेतयासाठी संबंधितांची बैठक घेवून तशा सूचना दिल्या आहेत. व्याज दर कमी करण्याबाबतही आवाहन केले आहे. यासाठी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र येऊन याचा पाठपुरावा करावा. पूर व्यवस्थापनासाठी महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणेयाचा आराखडा बनविणेनदीपात्रातील अतिक्रमणे काढणे यासारख्या बाबींना आता प्राधान्य देणे महत्वाचे असल्याचेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणालेगेले वर्ष-दोन वर्ष आपण कोरोना आपत्तीशी लढा देत आहोत. जीव वाचविणे महत्वाचे असल्यानेच निर्बंध लागू केले. दुसरी लाट आता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. केंद्र सरकाराने संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली असून त्या दृष्टिनेही काळजी घेणे आवश्यक आहे.

            कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी स्वागत करुन प्रास्ताविक केले.

            व्यापारी संघटनांच्यावतीने शरद शहा यांनी मनोगत व्यक्त करुन व्यापाऱ्यांच्या समस्या मांडल्या

 वक्फ मंडळाच्या निवडणुकीसाठी मुतवल्लींची मतदारयादी

अद्ययावत करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 

            मुंबईदि. २ : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मुतवल्ली निर्वाचन गणातून निवडणूक घेण्यासाठी राज्यातील मुतवल्लींची मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहेअशी माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी दिली.

            वक्फ मंडळावर मुतवल्ली प्रवर्गातील सदस्याची निवडणुकीद्वारे निवड करण्याकरिता वक्फ संस्थांच्या पात्र मुतवल्लीव्यवस्थापकीय समितीच्या नामनिर्देशित सदस्यांची मतदारयादी अद्ययावत करण्यात येत आहे. राज्यातील सर्व वक्फ संस्थांच्या मुतवल्लीव्यवस्थापकीय समितीच्या सदस्यांना वक्फ मंडळामार्फत आवाहन करण्यात येते कीज्या वक्फ संस्थांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रूपयांपेक्षा जास्त आहे त्या वक्फ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मुतवल्लीनामनिर्देशित सदस्यांचे नाव मतदारयादीत समाविष्ट करण्याकरिता सन २०२०-२१ या वर्षापर्यंत संबंधित वक्फ संस्थेचे लेखापरीक्षण करूनवार्षिक लेखे व त्या अनुषंगिक वर्गणी जमा करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. ही कार्यवाही संबंधीत वक्फ संस्थांनी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पूर्ण करावीअसे आवाहन श्री. शेख यांनी केले आहे.

०००

 महापुरासारख्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजनांना प्राधान्य;

पूररेषेची अमंलबजावणी काटेकोरपणे व्हावी

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       पुनर्वसन व अतिक्रमणाबाबत प्रसंगी कठोर निर्णय

·       राज्यात पूर व्यवस्थापनसाठी तज्ज्ञांच्या मदतीने आराखडा

·       एन.डी.आर.एफ.चे निकष बदलण्यासाठी केंद्र शासनाला विनंती

·       कोरोनाचे संकट पुन्हा उफाळू नये यासाठी कोरोना चाचणी वाढवा

            सांगलीदि. 02 : जुलै महिन्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीव्यापारउद्योगघरे यांचे नुकसान झाले आहे. पुन्हा असे होऊ नये यासाठी तात्काळ आणि दूरगामी अशा दोन्ही स्वरुपाच्या उपाययोजनांवर काम करावे लागेल. महापुरासारख्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी प्राधान्य दिले जाईल. राज्यात पूर व्यवस्थापनासाठी महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणेनद्याजोड उपक्रम या बाबींवर विचार करुन तज्ज्ञांच्या मदतीने आराखडा तयार केला जाईल. भविष्यातील दुष्परिणाम विचारात घेवूनच विकासकामे केली जातील. पुनर्वसनअतिक्रमण यासारख्या विषयांमध्ये प्रसंगी कठोरतेने निर्णय घेवून आराखडा तयार केला जाईल. असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

            महापूर व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमी सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भिलवडीअंकलखोपकसबे डिग्रजमौजे डिग्रजआयर्विन पुलहरभट रोड येथे भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयसांगली येथे आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 2019 चा महापूरकोरोना आणि आता 2021 चा महापूर या सर्व पार्श्वभूमीवर पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणेयासाठी शासन कटीबद्ध आहे. सर्व बाबींचा समतोल राखत जनतेच्या सहभागाने आपण या संकटावरही मात करु.           

            वारंवार येणारी संकटे पाहता आतापर्यंत विकास करताना काही उणीवा राहिल्या असल्यास कठोरतेने नियमांची अंमलबजावणी कराब्ल्यु लाईनरेड लाईन अशा रेषा किती दिवस काढायच्या त्याबाबतच्या नियमांची अंमलबजावणीही होणे आवश्यक आहे. ज्या वस्त्यांमध्ये पाणी वाढत आहे. त्याचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. पुराचे व्यवस्थापन सुनियोजितपणे करणे आवश्यक आहे. सांगली शहरातील शेरी नाल्याचे पाणी अन्यत्र वळविता येईल का यासाठीही विचार व्हावा. विचित्र पद्धतीने पावसाचा पॅटर्न बदलत असून त्यातून कोणीच सुटत नाही. याचा विचार करुन बदलत्या हवामानाबरोबर आपल्या आयुष्यातही बदलाची आवश्यकता भासते आहे.

            महापुरासारख्या आपत्ती टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने आराखडा तयार करण्यात येईलआतापर्यंतच्या विविध समित्यांनी केलेल्या सूचनांचा साकल्याने विचार करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल. आता जो आराखडा तयार करु त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठीजनता आणि लोकप्रतिनिधी या सर्वच घटकांचा सहभाग अत्यावश्यक आहे.

            दूरगामी दुष्परिणामांचा विचार न करता राबविण्यात आलेल्या विकासाच्या संकल्पना अंगलट येत आहेत. कोरोना संकटाचा सामना करत असतानाच महापूराच्या संकटाला तोंड देत प्रशासनाने जिवित हानी होऊ नये याला दिलेल्या प्राधान्याबद्दल मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी संपुर्ण यंत्रणेची प्रशंसा केली. या संकटातून बाहेर पडत असताना कोरोनाचे संकट पुन्हा उफाळू नये यासाठी सातारासांगलीकोल्हापूररत्नागिरी आदी भागात कोरोना चाचण्या वाढविण्याची गरजही त्यांनी प्रतिपादीत केली.

            पूरग्रस्त भागाला पुन्हा खंबीरपणे उभे करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशिल आहेच असे सांगूनमुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेएन.डी.आर.एफ.चे निकष जुने झाले आहेत. ते बदलण्यासाठी केंद्र शासनाला विनंती केली आहे. व्यापाऱ्यांनी विमा काढला असला तरी विमा कंपन्यांकडून त्यांचा पंचनामा कधी होणार हाही प्रश्न आहे. त्यामुळे महसूल विभागाने केले पंचनामे ग्राह्य धरुन तात्काळ 50 टक्के रक्कम अदा करावी. बँकांचे व्याज दर कमी करावेत. याबाबत निर्देश देण्याचीही केंद्र सरकारला विनंती केल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

            यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले, सांगली जिल्ह्यातील उद्योगव्यापारशेतीसर्वसामान्य जनता यांचे 2019 चा महापूरकोरोनास्थिती व 2021 चा महापूर यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. रस्ते, पुलविद्युत विभागपाणी योजना याबरोबत संबंधित सर्व बाबींचे नुकसान झाले आहे. या सर्वांचा विचार करुन कायमस्वरुपी उपायोजनांसाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याची गरज आहे. शेतीबरोबरच उद्योग व व्यापार क्षेत्रालाही मदत करुन पूरबाधितांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल. पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना स्थिती तसेच महापूर स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून अत्यंत चांगले काम केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी महापूर व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर केला.

            यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदममहापौर दिग्विजय सुर्यवंशीजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरेखासदार धैयशिल माने,  आमदार सर्वश्री मोहन कदमअरुण लाडडॉ. सुरेश खाडेअनिल बाबरधनंजय गाडगीळसुमनताई पाटीलविक्रम सावंतमुख्य सचिव सिताराम कुंटेविभागीय महसूल आयुक्त सौरभ रावजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरीमिरज व कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीससांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडीविशेष पोलीस महानिरिक्षक मनोजकुमार लोहियापोलीस अधीक्षक दिक्षीत गेडामअप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डेनितीन बानूगडे पाटील आदी उपस्थित होते.

00000

 ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधु हिचे

उपमुख्यमंत्री तथा राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष

अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

 

            मुंबईदि. 1 :- टोकियो ऑलिंपिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेचं कांस्यपदक जिंकणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधु हिचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. पी. व्ही. सिंधुने देशासाठी दुसरं ऑलिंपिक पदक जिंकून देशाचा गौरव वाढवला आहे. तिने जिंकलेल्या ऑलिंपिक कांस्यपदकाचा आनंद देशवासियांसाठी सुवर्णपदकापेक्षा कमी नाहीअशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी तिचे कौतुक केले आहे. 

            उपमुख्यमंत्री आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात कीपी. व्ही. सिंधुकडून देशाला ऑलिंपिक सुवर्णपदकाची अपेक्षा होती. संपूर्ण स्पर्धेत तीनं कामगिरीही दमदार केली. सुवर्णपदक जिंकून देण्याच्या प्रयत्नात ती कुठेही कमी पडली नाही. तिच्या कामगिरीचा देशवासियांना अभिमान आहे. पी. व्ही. सिंधुनं कांस्यपदक जिंकलं असलं तरी तिचा खेळ आणि पदकामुळे देशवासियांना मिळालेला आनंद सुवर्णपदकापेक्षा कमी नाही. यापुढच्या काळातही पी. व्ही. सिंधुकडून अशीच जागतिक दर्जाची सर्वोत्कृष्ट कामगिरी घडेल. तिच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक उदयोन्मुख युवक खेळांकडे वळतील. जागतिक दर्जाची कामागिरी करुन पदक जिंकतील. देशाचा गौरव वाढवतीलअसा विश्वासही उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

000

 माजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

 

गुरुजींनी शिक्षणप्रसाराच्या माध्यमातून ध्येयनिष्ठाकर्तव्यनिष्ठेचा आदर्श निर्माण केला

--  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आलुरे गुरुजींना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली

 

            मुंबईदि. 2 :- तुळजापूर तालुक्याचे माजी आमदारशिक्षणमहर्षी आदरणीय सिद्रमप्पा आलुरे गुरुजींनी त्यांच्या राजकीयसामाजिकशैक्षणिकआध्यात्मिक कार्यातून समाजासमोर ध्येयनिष्ठेचाकर्तव्यनिष्ठेचा आदर्श ठेवला. सार्वजनिक जीवनात निष्ठापूर्वक काम करण्याचा परीपाठ घालून दिला.  गुरुजींनी अनेकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण केला. कित्येकांच्या चुली पेटत्या ठेवण्याचं काम गुरुजींनी शिक्षणप्रसाराच्या कार्यातून केलं. आलुरे गुरुजींनी घडवलेले विद्यार्थीच त्यांच्या कार्याचाविचारांचा वारसा पुढे घेऊन जातील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिद्रमप्पा आलुरे गुरुजींच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

            शिक्षणमहर्षी आलुरे गुरुजींना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीआलुरे गुरुजी खऱ्या अर्थाने शिक्षणमहर्षी होते. त्यांनी शिक्षणाची गंगा गरीबांच्या घरापर्यंत नेली. गावात शाळा नाही. वर्गखोल्या नाहीत. खोल्यांना भिंत नाही. फळा नाही. खडू नाही. अशी कुठलीही अडचण विद्यार्थ्यांना शिकवण्यापासून त्यांना रोखू शकली नाही. गरज पडली तेव्हा देवळाच्या आवारातझाडाच्या पारावर त्यांनी शाळा भरवली. विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाच्या बरोबरीने नैतिक शिक्षणही दिले. पायाभूत सुविधांपेक्षा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर त्यांचा भर असायचा. त्यामुळेच गुरुजींचे अनेक विद्यार्थी राज्यपातळीवरील परीक्षेत अव्वल ठरले. जीवनाच्या अनेक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मोलाचे काम केले. राष्ट्रनिर्मितीत योगदान दिले. गुरुजींने दिलेले विचार हेच विद्यार्थी पुढे घेऊन जातील.

            उपमुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात पुढे म्हणतात कीआलुरे गुरुजींचे कार्यविचार जितके उत्तुंग होतेतितकीच त्यांची राहणी साधी होती. शिक्षणक्षेत्रात निरपेक्षपणे काम कसं काम करावंयाचं गुरुजी हे मुर्तीमंत उदाहरण होते. गुरुजींनी राज्याच्या विधीमंडळात तालुक्याचं प्रतिनिधीत्वं केलं. परंतु त्यांची पहिली पसंती ही कायम विद्यार्थ्यांना शिकवण्यालाच राहीली. गुरुजींनी त्यांच्या आचारविचारविहारातून अनुयायी जोडले. समाजाकडून निर्व्याज प्रेमआदरविश्वास मिळवलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. त्यांचं निधन ही तालुक्याच्याजिल्ह्याच्याराज्याच्या राजकीयसामाजिकशैक्षणिकआध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी आहे. मी स्वर्गीय गुरुजींना विनम्र आदरांजली अर्पण करतोअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.

0000

Featured post

Lakshvedhi