सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 4 June 2019
एक सुट्टी घ्या ...
एक सुट्टी घ्या ...
लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...?
एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्रमाणे उडाणटप्पू वाटू शकतो. काही जणांची कार्यालयातील आपल्या अस्तित्वाबद्दल 'विशेष' कल्पना असते.
एकदा माझ्या एका मित्राशी फोनवर बोलत होतो. संवाद ऐका बरं "अरे चार चार ऑफिसर आहेत कंपनी मधे पण माझ्यावरच कामाचा सगळा लोड पडतो."
"का? , बाकीचे काही काम करत नाहीत?"
मी विचारले...
"काही कामं करत नाहीत...
आणि आमचा मॅनेजर पण काही बोलत नाही. "एकूणच माझ्या या मित्राला कंपनीत केवळ नेहमी एकटाच कामाने मरतो आहे असे वाटत होते.
"मी एक उपाय सुचवू का?"
मी विचारले.
"तीन आठवडे सुट्टी घे" मी म्हणालो.
"सुट्टी घेऊन काय करू?
उगाच पर्यटन वगैरे सारखे पैसे घालवायचे सल्ले देऊ नकोस." तो डाफरला.
"तीन आठवडे सुट्टी घे. घरी 'पडे रहो' कर. लायब्ररी मधून फिल्म च्या सीडीज आण, पुस्तके वाच. पण या तीन आठवड्यात एक काम करायचे...
ते म्हणजे एकदाही कंपनी च्या जवळपास ही जायचे नाही. "
"त्याने काय होईल?"
"तीन आठवड्याने तू गेल्यावर तुला कळेल की तू नव्हतास तरी कंपनी चालू राहिली. बंद पडली नाही. तुझ्या एकट्या मुळे कंपनी चालते असा तुझा समज एकदा दूर झाला की तुझे कामाचे प्रेशर पण गायब होईल बघ "
माझ्या या फुकटच्या सल्ल्याचे त्याने काय केले माहित नाही...
पण निदान नंतर मी कधी त्याचे रडगाणे ऐकले नाही.
आपल्यामुळे कंपनी चालते किंवा मी गेलो नाही तर फार कामे बंद पडतील असा एक गोड गैरसमज बरेच जण करून घेतात आणि मग सुट्टी नाकारून स्वतःलाच शिक्षा करत राहतात.
माझे एक परिचित आहेत. कधी त्यांनी सुट्टी घेतलेली असली तर दृश्य बघावे. दर १५-२० मिनिटांनी कुण्या तरी सहका-याला फोन करून "काय रे काय चालले आहे ?"
असे म्हणून पिडत असतात. आपल्या पाठीमागे कंपनी मध्ये काही झाले आणि आपल्याला माहित नाही असे होऊ नये म्हणून ही धडपड. म्हणजे सुट्टी घेऊनही तिचा आनंद काही घेता येत नाही. असुरक्षिततेची भावना हे पण काही जणाच्या सुट्टी न घेण्या मागचे कारण असू शकते.
पाश्चात्य देशातील काही चांगली व्यवस्थापन तत्त्वे आपण उचलली पाहिजेत. तिथे सुट्ट्या कमी असल्या तरी त्या घेतल्याच पाहिजेत असा दंडक असतो. रजा विकणे, साठवून ठेवणे, पेन्शनीत वर्ग करणे असले प्रकार नसतात. माणसाला विश्रांतीची गरज असते आणि त्या साठी रजा ही घेतलीच पाहिजे असा स्पष्ट आग्रह तिथे असतो. आपले म्हणजे असे आहे की व्यवस्थापकांनी त्यांच्या सोयीच्या आणि पगार जास्तीत जास्ती वसूल कसा करता येईल अशाच गोष्टी उचलल्या आहेत बाकीच्या नुसत्या गप्पा. नारायण मूर्तीचे एक भाषण मेल अधून मधून फोरवर्ड होत असते. त्यात त्यांनी लोकांना वेळेवर घरी जा, कुटुंबासाठी वेळ काढा, इत्यादी इत्यादी उपदेश केला आहे. आपण लोक नुसतीच मेल वाचतो, "कसले स्पष्ट बोलतात हो" म्हणून त्यांचे कौतुक करतो. आणि निदान रात्री आठ वाजता तरी निघायला हवे आता असा फुसका निश्चय करतो.
सांगायचा मुद्दा काय की आपण काही तरी लंगड्या सबबी सांगून रजा घेण्याचे टाळतो. कुटुंब आणि स्वतःला जो वेळ द्यायचा तो देत नाही. कशासाठी हा सगळा खेळ मांडला आहे ते कळत नाही त्याला आणि मग आयुष्यावर रागावत राहतो. रागावलेल्या माणसाचे आणि निर्मिती क्षमतेचे वाकडे असते. चिडलेला, थकलेला माणूस गाणे गाऊ शकत नाही.....
आयुष्याचे संगीत शोधा... जगण्याची प्रेरणा शोधा...
ऐका.. एक सुट्टी घ्या ...

अडाणी आईवडील
अडाणी आईवडील
---------------------------------------------------------
मध्यमवर्गीय घरातील एका मुलाला १० वीच्या परिक्षेत ९०% गुण मिळाले वडील खुषीने Marksheet न्याहाळत आपल्या पत्नीला ... अग... छान लापशी बनव, तुझ्या लाडक्याला ९०% मार्क्स मिळालेत... शालांत परिक्षेत..!
आई किचनमधुन पळत पळत येत म्हणाली, ".. बघुया मला दाखवा...!
इतक्यात,.. मुलगा पटकन बोलला ...
"बाबा तिला कुठे Result दाखवताय ?... तिला काय लिहता वाचता येते का.? अशिक्षित आहे ती...!"
भरल्या डोळ्याने पदर पुसत आई लापशी बनवायला निघुन गेली.
ही गोष्ट वडिलांना लगेच लक्षात आली...! मग ते मुलाच्या संवादात भर टाकुन म्हणाले... "हो रे ! ते पण खरच आहे...!
तु पोटात असताना तिला दुध बिल्कुल आवडत नसताना तु सुधृड व्हावास म्हणून नऊ महीने ती रोज दुध पित होती...
अशिक्षित होती ना...
तुला सकाळी सात वाजता शाळेत जाव लागायच म्हणजे स्वतः सकाळी पाच वाजता उठुन तुझ्या आवडीचा नाष्ता आणि डबा बनवायची.....
अशिक्षित होती ना...
तु रात्री अभ्यास करता करता झोपून जायचा तेव्हा येउन ती तुझी वह्या पुस्तक बरोबर भरुन तुझ्या अंगावर पांघरुन नंतरच झोपायची...
अशिक्षित होती ना...
तू लहानपणी बहुतेकवेळा आजारी असायचास... तेव्हा रात्र-रात्र जागुन ती परत सकाळी तिची काम चोख करायची....
अशिक्षित होती ना...
तुला Branded कपडे घेउन द्या म्हणून माझ्या मागे लागायची आणि स्वतः मात्र एकाच साडीवर वर्षे चालवायची.
अशिक्षित होती ना....
बाळा.... चांगली शिकलेली लोक पहिला स्वतःला स्वार्थ आणि मतलब बघतात.. पण तुझ्या आईने आजवर कधीच तो बघितला नाही.
अशिक्षित आहे ना ती...
ती जेवण बनवुन आपल्याला वाढता वाढता कधी कधी स्वतः जेवायच विसरुन जायची... म्हणून मी अभिमानाने सांगतो की 'तुझी आई अशिक्षित आहे...'
हे सगळ ऐकुन मुलगा रङत रडत आईला बिलगुन बोलतो.. "आई मी तर फक्त पेपरवर ९०% मार्क मिळवलेत. पण माझ्या आयुष्याला १००% बनवणारी तु पहिली शिक्षक आहेस. आणि ज्या शिक्षकांची मुल ९०% मार्क मिळवतात.. त्या शिक्षकांकडे किती ज्ञान असेल ह्याचा मी कधी विचार केलाच नाही.
आई आज मला ९०% मार्क्स मिळवुन पण मी अशिक्षित आहे आणि तुझ्याकडे PHD च्या पण वरची Degree आहे. कारण मी आज माझ्या आईच्या रुपात डॉक्टर, शिक्षक, वकिल, माझे कपडे शिवणारी Dress Designer, Best Cook ह्या सगळ्यांच दर्शन घेतल......!
बोध:.... प्रत्येक मुला- मुलीनी जे आईवडिलांचा अपमान करतात, पाणउतारा करतात, शुल्लक कारणावरुन रागवतात. त्यांनी विचार करावा.
त्यांच्यासाठी काय काय सोसलय आईवडिलांनी..

पैशापेक्षा माणसांना किंमत द्या
जन्माला आला तो
वंशाचा दिवा झाला
पहिल्याच दिवशी त्याला
जबाबदारीचा शिक्का लागला
थोडा मोठा झाला तो
भावंडांचा भाऊ झाला
आपल्या खेळण्यातला
अर्धा हिस्सा वाटू लागला
वयात आला तो
बहिणीचा रक्षक झाला
रक्षाबंधनाला तर
स्वतःची मनिबॅंक ही फोडू लागला
कॉलेजला गेला तो
मैत्रिणींचा मित्र झाला
तिच्या सुख दुःखाचा
आपसूक वाटेकरी बनला
लग्नामध्ये त्याच्या तो
नवरदेव झाला
बोहल्यावरच्या रुबाबतही
जबाबदारीचा पुतळा ठरला
लग्नानंतर मात्र तो
दोन भूमिकेत आला
बायकोचा नवरा की आईचा मुलगा यात अडकला
आईबाप्पाच्या उतारवयात
त्यांच्या काठीचा आधार झाला
स्वतः साठी कमी अन
घरासाठी जास्त जगू लागला
बाळाच्या चाहुलीने तो
बाप झाला
छकुलीच्या हास्यासाठी
रात्रंदिवस झटू लागला
छकुलीच्या लग्नामध्ये तो
वरबाप झाला
सगळ्यांच्या आनंदासाठी
आपले अश्रू लपवू लागला
नातवंडांच्या मेळ्यामध्ये तो
आजोबा झाला
दुधापेक्षा साईला
तळहाताच्या फोडासारखा जपू लागला
आत्ता कुठे त्याला
थोडा निवांतपणा मिळाला
जोडीदाराचा हात त्याने
खूप घट्ट पकडला
तो पर्यंत त्याच्या
पिंजऱ्यातील पिल्ले उडून गेली
बायकोची आणि त्याची
हाडेही आत्ता थकून गेली
मनात असतानाही तो
मनाप्रमाणे जगला नाही
ठाम मते असतानाही
मत आपले मांडले नाही
आज देवाकडे तो
साथ फक्त मागतो आहे
बायकोच्या आधी ने मला
देवाला म्हणतो आहे
आजपर्यंत आयुष्यभर तो
घरासाठी झटला आहे
स्मशानात जाताना मात्र
रित्या ओंजळीने जातो आहे
ओंजळ रिकामी असली तरी
मन त्याचे भरले आहे
अंत्यविधीची गर्दी पाहून
माणुसकीचे फळ मिळाले आहे
जाता जाता सगळ्यांना
एकच तो सांगतो आहे
पैशापेक्षा माणसांना किंमत द्या म्हणतो आहे..

माणसाला संवादाची गरज असते....!
माणसाला संवादाची गरज असते....!
का,,,? कशासाठी...?
समजा कुकरमध्ये खूप वाफ कोंडली आहे. तिला बाहेर पडायला वाव मिळाला नाही. तर काय होईल...? कुकरचा स्फोट होईल. समजा एखाद्या डबक्यात पाणी साठलं आहे. आत येणारा झरा नाही. बाहेर जाणारा मार्ग नाही. तर काय होईल. आतलं पाणी आतल्या आत कुजून जाईल. वास येऊ लागेल. दुर्गंधी येऊ लागेल.
मनाचंही असंच असतं. विचारांची देवाणघेवाण झाली नाही. भावनांना वाट मिळाली नाही. की मनात विकृती निर्माण होते. अन यासाठी गरज असते संवादाची! अन्न, वस्त्र आणि निवारा या शरीराच्या मूलभूत गरजा असतील तर संवाद ही मनाची मूलभूत गरज आहे.
संवादाचा अभाव हे माणसांमाणसांत दुरावा निर्माण होण्याचं एक महत्वाचं कारण आहे. एकाच घरात रहाणारे भाऊबहीण, पतीपत्नी, पितापुत्र यांच्यात संवाद नसतो. आपली सुखदु:ख, भावना, विचार यांची देवाणघेवाण करायला वाव नसतो. काय गंमत आहे बघा, संवादाच्या खिडक्या बंद करुन माणसं ‘सहजीवन’ जगत असतात. मग काय होतं, मनाच्या बंद तळघरात गैरसमजाचा राक्षस जन्माला येतो आणि बघता बघता तो अक्राळविक्राळ रुप धारण करतो. संवादच संपला की उरतो तो वाद...
संवाद म्हणजे नुसतं बोलणं नव्हे. संवाद म्हणजे विचारांची देवाणघेवाण. दुसऱ्याकडे विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी गरज असते तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा मनाची गरज असते. या विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्या विचारांना नवा आयाम मिळतो. आपल्या स्रुजनशीलतेला नवे पैलू पडतात. आपल्या ज्ञानात भर पडते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचं, आपल्या उणिवांचं आपल्याला मूल्यांकन करता येतं. आपलं मानसिक आरोग्य सुद्र्ढ रहातं. थॊडक्यात काय तर संपन्न व्यक्तिमत्वासाठी निरोगी मन आवश्यक आहे आणि निरोगी मनासाठी संवादाची गरज आहे.
तेव्हा बोलू लागा... ऐकू लागा... समजू लागा... संवाद साधू लागा...!
Life is Very Beautiful

गुरुमंत्र
उत्तम आयुष्य जगण्याचे १५ गुरुमंत्र
१. हार मानू नका. आजचा दिवस वाईट आहे, उद्याचा कदाचित आणखी वाईट असेल पण परवाचा दिवस उत्तम असेल. कारण सगळेच दिवस सारखे नसतात. - जॅक मा.
२. खेळ म्हटले कि हरणे- जिंकणे आलेच. हरण्याच्या भितीने खेळ खेळणे सोडू नका. - बेब रुथ.
३. अधून मधून चुकणे हा तुमचा अधिकार आहे. सतत बरोबर असण्याचा अट्टाहास करू नका. - डॉ. डेव्हिड बर्न्स.
४. एकाच जागी स्थिर राहू नका. तुमची प्रत्येक कृती नव्या गोष्टीला जन्म देते, त्यामुळे सतत काहीतरी करत राहा. - जॉर्ज बर्नार्ड शॉ.
५. तुमच्याकडे अमाप वेळ असल्यासारखे वागू नका. - ओग मंदिनो.
६. इतरांच्या टीकांकडे लक्ष देऊ नका. लक्षात ठेवा, टीकाकारांच्या सन्मानासाठी पुतळा कधीच उभा करत नाहीत. - जीन सिबेलीअस.
७. देवाने स्वल्पविराम दिलेल्या जागी कधीही पूर्णविराम देऊ नका. म्हणजेच, आयुष्यात काही चुकीचे घडले म्हणजे तो शेवटच असेल असे नाही. - ग्रेसी एलन.
८. लक्षात ठेवा, प्रवाहा बरोबर केवळ मेलेले मासे जातात. आपली वाट आपण शोधा. - मॅलकाॅम मगेरिज.
९. इतरांसारखे होण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही कोण आहोत ते ओळखा आणि स्वतःचे अस्तित्व जपा. - इजराईलमोर आयिवोर.
१०. कोणतीही कल्पना पैसा, ताकत, मनुष्यबळ किंवा वेळेच्या कमतरतेमुळे नाकारू नका. - सैय्यद एथर.
११. अशक्य गोष्ट आहे असे सांगून देखील जे प्रयत्न करत असतील, त्यांच्या कामात व्यत्यय आणू नका. - अमेलिया एरहर्त.
१२. स्वतःचे आयुष्याचे निर्णय स्वतः घ्या. इतरांना आपल्या आयुष्याचे निर्णय घेऊ देऊ नका. - रॉबर्ट फ्रॉस्ट.
१३. अपयशापासून दूर पळू नका. त्यापेक्षा अपयश कशामुळे आले ह्याचा अभ्यास करा आणि आपल्या चुका सुधारा. - मायकल कोरडा.
१४. गरजेपेक्षा जास्त बोलू नका. - रिचर्ड शेरिदान.
१५. वेळेअभावी आपले स्वप्न अर्ध्यातच सोडून देऊ नका. - एर्ल नाईटिंगे
विचारवेध
विचारवेध
मन गुंतायला वेळ लागत नाही, मन तुटायलाही वेळ लागत नाही. वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला.
आयुष्य फार लहान आहे.
जे आपल्याशी चांगले वागतात, त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात,त्यांना हसून माफ करा.
जीवनात अडचणी येणे हे 'Part of life' आहे.आणि त्यातून हसत बाहेर पडणे ही 'Art of life' आहे.
यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं. कारण, यशाची व्याख्या लोकं ठरवितात, समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.
आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात.फरक एवढाच आरश्यात सगळे दिसतात, आणि हृदयात फक्त आपली माणसेच दिसतात म्हणून त्यांची कदर करा.
Subscribe to:
Posts (Atom)
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...