- बोरीवली येथे तीन दिवसीय मिलेट महोत्सवाचे उद्घाटन
मिलेटचे महत्व लक्षात घेऊन महोत्सवाची व्याप्ती राज्यभर वाढविणार
-पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. २० : राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक असण्याबरोबरच आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या मिलेट्सना शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने मिलेट्स महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने मिलेट्स महोत्सव राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगत या महोत्सवास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
बोरीवली पश्चिम येथील कोरा केंद्र मैदानावर आयोजित तिसऱ्या मिलेट्स महोत्सवाचे उद्घाटन पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार मनीषा चौधरी, नगरसेवक शिवानंद शेट्टी, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सर-व्यवस्थापक विनायक कोकरे आदी उपस्थित होते. २२ मार्च २०२६ पर्यंत हा महोत्सव नागरिकांसाठी खुला असणार आहे
No comments:
Post a Comment