पर्यावरण मंत्र्यांनी घेतला जालना व छत्रपती संभाजीनगरमधील प्रदुषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा
जालन्यामधील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा
- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. 18 : जालना व छत्रपती संभाजीनगरमधील प्रदूषण कमी करण्यासंदर्भात पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा घेतला. जालनामधील हवा प्रदुषणासंदर्भात चिंता व्यक्त करून प्रदूषण कमी करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत. तसेच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन प्रदूषण करणाऱ्या उद्योगांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्री मुंडे यांनी यावेळी दिल्या.
जालना औद्योगिक वसाहत तसेच छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज, शेंद्रा, ऑरिक सिटी औद्योगिक वसाहतींमधील वायू व जल प्रदूषणासंदर्भात आज पर्यावरण मंत्री मुंडे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंदर सिंग, सहसंचालक (हवा प्रदूषण) सतीश पडवळ यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील प्रादेशिक अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळाचे व जिल्हा प्रशासनातील अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment