Saturday, 3 January 2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे

 ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले कीमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि परिवर्तनकारी अभियान असून त्याची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. जिल्हा परिषदांनी या अभियानाला सर्वोच्च प्राधान्य देऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. पंचायत समितीग्रामपंचायतविविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वयाने काम केल्यासच अभियानाचा अपेक्षित परिणाम साध्य होईल.

 

अभियानाच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी पारंपरिक तसेच आधुनिक माध्यमांचा प्रभावी वापर करावा. ग्रामसभांमधून जनजागृती करणेमाहिती फलकभित्तीपत्रकेडिजिटल माध्यमे तसेच सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून अभियानाची उद्दिष्टेलाभ आणि अपेक्षित सहभाग नागरिकांपर्यंत पोहोचवावाअशा सूचना त्यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi