कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करावे :
राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना
· राज्यात ‘नैसर्गिक शेती’ची क्रांती आणण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा
मुंबई, दि. 1 : जागतिक हवामानाचे गंभीर संकट लक्षात घेऊन राज्यातील कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाणांना संस्कारित करून त्यांचे उन्नतीकरण करावे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल अशा प्रकारचे बियाणे निर्माण करावीत असे सांगताना कृषी विद्यापीठांनी राज्यात नैसर्गिक शेतीची क्रांती आणण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी केले.
लोकभवन मुंबई येथून कृषि विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यातील कृषी व पशुविज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंशी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधताना राज्यपाल बोलत होते.
बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, ‘पोकरा’चे प्रकल्प संचालक परिमल सिंह, राज्यातील कृषी तसेच पशुविज्ञान विद्यापीठांचे कुलगुरु, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, 'आत्मा'चे संचालक सुनील बोरकर व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment