महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना
'सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार' जाहीर
नवी दिल्ली, 23 :आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या सुकन्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना केंद्र सरकारचा 'सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026' जाहीर झाला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून (पराक्रम दिवस) केंद्र सरकारने ही घोषणा केली. देशभरातून 271 नामांकनांतून ले.कर्नल शेळके यांची वैयक्तिक श्रेणीसाठी निवड झाली आहे.
No comments:
Post a Comment