विदर्भाला विकासाचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध
मुंबई फास्ट..महाराष्ट्र सुपर फास्ट
मुंबईकरांसाठी घेतलेल्या निर्णयांचे योजनापुष्प बाळासाहेबांच्या चरणी अर्पण
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
· अंतिम आठवडा उत्तरात घेतला विकास कामांचा आढावा
नागपूर, दि. १४ : 'सर्वांसाठी घरे' या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. मुंबईतील पुनर्विकासातील अडथळे दूर करून मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. येत्या २३ जानेवारी पासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईकरांसाठी या योजना आणून बाळासाहेबांच्या चरणी योजनापुष्प अर्पण करीत असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत व्यक्त केली. मुंबईच्या गतिमान विकासातून महाराष्ट्राचा सुपरफास्ट विकास होत असल्याचे सांगतानाच विदर्भाला विकासाचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
No comments:
Post a Comment