Saturday, 10 January 2026

भारताने २०२६ या वर्षासाठी ‘इंटरनॅशनल आयडीईए’ या संस्थेच्या सदस्य राष्ट्रांच्या परिषदेचे

 भारताने २०२६ या वर्षासाठी इंटरनॅशनल आयडीईए’ या संस्थेच्या सदस्य राष्ट्रांच्या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मांडलेल्या दृष्टिकोनानुसार ही परिषद आयोजित होत असूनसमावेशकशांततापूर्णसक्षम आणि शाश्वत जगासाठी लोकशाही ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे.

आयआयआयडीईएम चे महासंचालक राकेश वर्मा यांनी या परिषदेसंदर्भातील रूपरेषा मांडताना सांगितले कीही परिषद निवडणूक व्यवस्थापन संस्थांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्याचे व्यासपीठ ठरेल. निवडणूक प्रक्रियेत येणाऱ्या समकालीन आव्हानांवर सामूहिक चर्चासर्वोत्तम पद्धती व नावीन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण आणि संयुक्त उपाययोजनांची निर्मिती या परिषदेत होणार आहे. यावेळी आयआयसीडीईएम २०२६ च्या अधिकृत लोगोचे अनावरणही करण्यात आले.

या परिषदेत सहभागी प्रतिनिधींना भारताची निवडणूक व्यवस्थाप्रक्रिया तसेच तंत्रज्ञानाधारित नवकल्पना यांची माहिती देण्यात येणार असूनभारतीय निवडणुका जगातील लोकशाही व्यवस्थांसाठी आदर्श ठरत असल्याचे अधोरेखित केले जाणार आहे.

परिषदेच्या कार्यक्रमात उद्घाटन सत्रनिवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या प्रमुखांची विशेष बैठककार्यगट बैठकाईसीआयनेट चे उद्घाटन तसेच जागतिक निवडणूक विषयांवरील आणि आंतरराष्ट्रीय मानकांवरील विविध विषयक सत्रांचा समावेश आहे.

तीन दिवसांच्या या परिषदेदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारनिवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली ४० हून अधिक द्विपक्षीय बैठका विविध देशांच्या निवडणूक संस्थांच्या प्रमुखांसोबत पार पडणार आहेत.

या परिषदेत चार आयआयटीसहा आयआयएम१२ राष्ट्रीय विधी विद्यापीठे (एनएलयूआणि आयआयएमसी यांसह नामांकित शैक्षणिक संस्थांचा सहभाग राहणार असूनराज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली ३६ विषयक गट चर्चेत सहभागी होणार आहेतअसे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi