देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत उपक्रमाची विश्वविक्रमी नोंद
-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची माहिती
· राष्ट्र प्रथम उपक्रमात प्रजासत्ताक दिनी राज्यभर एकाच वेळी दोन कोटींहून अधिक
विद्यार्थ्यांचे सामूहिक कवायत संचलन
मुंबई, दि. 26 - 'राष्ट्र प्रथम' या उपक्रमांतर्गत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यभरात शासकीय ध्वजावंदनानंतर शालेय विद्यार्थ्यांचे एकाच वेळी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन झाले. या उपक्रमात राज्यातील सर्व विभागातील एक लाख शाळांमधील दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच वेळी देशभक्तीपर गीतावर शिस्तबद्ध व समन्वयपूर्ण कवायत सादर केली. सात लाख शिक्षकांनीही यात सहभाग नोंदवला. या उपक्रमाची अधिकृत नोंद वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डस्, लंडन (World Book of Records, London) या आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली असून या माध्यमातून एक विश्वविक्रम प्रस्थापित झाला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
No comments:
Post a Comment