Thursday, 1 January 2026

नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

 नूतन वर्ष महाराष्ट्राचेमहाराष्ट्राच्या समृद्धीचेविकासाचे नवपर्व आणणारे

 -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

 

मुंबईदि. ३१ : नूतन वर्ष महाराष्ट्राचेमहाराष्ट्राच्या समृद्धीचेविकासाचे नवपर्व आणणारे ठरेलअसा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्ष प्रारंभाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘सरत्या वर्षातील कटू प्रसंगांना विसरूया आणि सुमधूर आठवणींकडून प्रेरणा घेतपुढे जाऊया. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसरनेतृत्व करणारे राज्य आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच फडकत राहोयासाठी आपण एकजूट करूया. महाराष्ट्राच्या मातीत आव्हाने स्वीकारण्याची धमक आहे. आव्हाने आलीचतर त्यावर मात करण्याचा निर्धार करुया. नवे वर्ष नवचैतन्य घेऊन येणारेआशाआकांक्षांना बळ देणारे ठरेल, अशी आशा व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी नववर्ष सर्वांसाठी आरोग्यदायीसर्वच क्षेत्रात भरभराटसमृद्धी घेऊन येणारे ठरावेअशा शुभेच्छा दिल्या.

0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi