महाराष्ट्रातील आयटीआय होणार सर्वोत्तम 'स्किल डेव्हलमपेंट हब'
-मंत्री मंगल प्रभात लोढा
· राज्यातील आयटीआयचे आधुनिकीकरण, पीएम – सेतू योजना राबविणार
· पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे यांचा समावेश
· केंद्र आणि राज्य सरकार मिळून २४२ कोटी खर्च करणार
मुंबई, दि. 30 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शाश्वत विकासाच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या ' पीएम सेतू ' या योजनेमुळे महाराष्ट्रातील आयटीआय सर्वोत्तम 'स्किल डेव्हलमपेंट हब' होणार असल्याचे, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) पीएम सेतू योजनेंतर्गत आधुनिकीकरण होणार असून पुढच्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
कुशल मनुष्य़बळाची मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी पीएम सेतू योजनेतून आयटीआयचे आधुनिकीकरण करण्याची योजना आहे. या योजनेच्या पहिल्या टप्पात नागपूर, छत्रपती संभाजी नगर आणि पुणे येथील आयटीआयचे आधुनिकीकरण केले जाणार आहे
No comments:
Post a Comment