शेतकऱ्याकडे एक गाय असली तरी देखील शेती करता येते हे त्यांना पटवून द्यावे लागेल. महाराष्ट्रात साहिवाल, थारपारकर, कांकरेज, गीर आदी देशी गायींचे संवर्धन केले गेल्यास ते शेतीला वरदान ठरेल व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असेही राज्यपालांनी सांगितले. यावेळी 'आत्मा'चे संचालक सुनील बोरकर यांनी सादरीकरण केले.
आपण महाराष्ट्रात नैसर्गिक शेती विषयावर घेतलेल्या दोन परिसंवादानंतर कृषी विभाग व विद्यापीठांनी हे कार्य सकारात्मक पद्धतीने हाती घेतले याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले.
No comments:
Post a Comment