महाराष्ट्राच्या व्यापार, आर्थिक, पायाभूत सुविधा आणि
विकास क्षेत्रात सहभागी होण्याची संधी
डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
मुंबई, दिनांक १७:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील यांनी भेट घेतली. 'वर्षा' मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत उद्योग विभाग सचिव पी. अनबलगन, सचिव आणि राजशिष्टाचार विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक व धोरण विषयक सल्लागार कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. उपस्थित होते. डच शिष्टमंडळात राजदूत मोरिसा जेरार्ड्स, वाणिज्य दूतावास जनरल नबिल तौआती उपस्थित होते.
या भेटीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींबद्दल चर्चा केली. तसेच व्यापार, अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास यावरही चर्चा झाली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "सरकार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाच्या वापराला पाठिंबा देत आहे. नेदरलँड्सच्या सहभागातून मत्स्यव्यवसायासारखे अनेक क्षेत्र विकसित केले जाऊ शकतात". परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील यांनी प्रणाली आणि साहित्य, प्रगत यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि साहित्यातील उच्च-तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या संशोधन आणि विकासात डच योगदानाबद्दल माहिती दिली.
0000
No comments:
Post a Comment