सांगोला व मंगळवेढा तालुक्यांच्या
चारा छावणी अनुदान प्रश्नावर शासन सकारात्मक
- राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल
नागपूर, दि. 12 : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा तालुक्यात चारा छावण्याच्या प्रलंबित अनुदानासंदर्भात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारी समितीची बैठक तत्काळ बोलावून एक महिन्याच्या आत निर्णय देण्याचा स्पष्ट आदेश देण्यात येतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
विधानसभा सदस्य बाबासाहेब देशमुख, समाधान आवताडे, सुधीर मुनगंटीवार, अभिजित पाटील यांनी सांगोला येथील चाराछावणीधारक अनुदानापासून वंचित असल्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली, त्यास राज्यमंत्री ॲड.जयस्वाल यांनी उत्तर दिले.
राज्यमंत्री ॲड.जयस्वाल म्हणाले, राज्य कार्यकारी समितीची बैठकीत उपायुक्त, आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन अधिकाऱ्यांना संपूर्ण रेकॉर्डसह उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या जातील. यात त्रुटीची पूर्तता तिथल्या तिथेच करण्याचे निर्देशही दिले जातील. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत राज्य कार्यकारी समितीची मंजुरी अनिवार्य असल्याने प्रक्रियेनंतर आता प्रलंबित अनुदानाच्या निर्णयासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीस बोलावण्याचे आदेश देण्यात येत असल्याचे राज्यमंत्री ॲड.जयस्वाल यांनी सांगितले
No comments:
Post a Comment