महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी
‘बीग्सी' अभिनव, खर्चमुक्त उपक्रम
- परिवहन आयुक्त विवेक भिमनवार
मुंबई, दि. २३ : महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत गृह विभाग तसेच परिवहन विभागाच्या सहकार्याने बीग्सी हा अभिनव आणि खर्चमुक्त उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले. एका सामाजिक जाणिवेतून सुरू झालेला हा प्रकल्प भविष्यात महिला सुरक्षेचा नवा अध्याय लिहील, असा विश्वासही परिवहन आयुक्त भिमनवार यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र पोलीस, मोटार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि इटीएस ३६० टेक्नोलॉजी सोल्युशन यांच्या सहकाऱ्याने मुंबई तसेच राज्यभरातील काळी पिवळी टॅक्सी आणि ऑटोरिक्षाकरिता बीग्सी (बीवायजीएसवाय) या सेवेचा आरंभ परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या हस्ते झाला. यावेळी सह परिवहन आयुक्त शैलेश कामत, वाहतूकचे उपआयुक्त अजित बोगार्डे, मुख्य प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील तसेच बीग्सीचे संस्थापक प्रोफ.निरंजन भट आदी उपस्थित होते.
परिवहन आयुक्त भिमनवार म्हणाले की, शहरीकरणाच्या प्रक्रियेत महिलांचा कामासाठीचा प्रवास वाढला असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांमध्ये कायम चिंता असते. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर गंभीरपणे घेतला गेला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रवासी वाहनात ‘व्हेईकल लोकेशन अँड ट्रॅकिंग डिव्हाइस’ (व्हीएलटीडी) व पॅनिक बटन बसवणे बंधनकारक करण्यात आले.
No comments:
Post a Comment