मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागरीकरणाचा वेग वाढता असल्यामुळे शहरांमध्ये निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य आहे. पुणे जिल्ह्यातील हडपसर ते यवत मार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात याव्यात. मात्र हे करताना नागरिकांना कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. या मार्गावर रस्त्याची सुधारणा करण्यात येऊन उन्नत महामार्ग बांधण्यात यावा. भैरोबा नाल्याजवळील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक व तातडीच्या उपाययोजना कराव्यात.
राज्यात सुरू असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच प्रस्तावित प्रकल्पांना गती शक्ती पोर्टलकडून मान्यता घ्यावी. प्रत्येक प्रकल्प गतिशक्ती पोर्टलकडून मान्यता आल्यानंतरच समितीच्या बैठकीसमोर यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
No comments:
Post a Comment