संकरीत बियाणे शेतकऱ्यांसाठी संकट असून ते महाग देखील आहे. त्यांचा वापर केल्यास रासायनिक खते देखील जास्त लागतात. उत्पादित अन्नधान्याला चव नसते व त्याचे पोषणमूल्य देखील कमी असते. त्यामुळे कृषी विद्यापीठांनी पारंपरिक बियाण्यांवर संशोधन करुन त्याचे उन्नतीकरण करावे, असे राज्यपालांनी सांगितले.
सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी नैसर्गिक शेतीच्या प्रचार प्रसारासाठी 'मॉडेल फार्म' विकसित करावे व शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करावी असे राज्यपालांनी सांगितले. नैसर्गिक शेती ही लोकचळवळ झाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment