नवीन अभ्यासक्रमासह विद्यमान अभ्यासक्रमातही सुधारणा
एका हब आयटीआयमध्ये सरासरी चार नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार असून, दहा विद्यमान अभ्यासक्रमांची श्रेणी सुधारणा केली जाणार आहे. स्पोक आय़टीआयमध्ये दोन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत तर आठ अभ्यासक्रमांची श्रेणी सुधारणा केली जाणार आहे. उद्योगांची संख्या कमी असलेल्या ठिकाणी सेवा क्षेत्र, बहुकौशल्य अभ्यासक्रम आणि उपजिविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
गुरुकुल परंपरा, नालंदासारखी विद्यापीठे आणि आर्यभट्टांसारखे विद्वान यांच्यामुळे भारत ज्ञानार्जनाचे जागतिक केंद्र म्हणून उदयास आले. आज त्या ज्ञानपरंपरेलाच अनुसरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची जोड देत आयटीआयच्या माध्यमातून नवा भारत घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले आहे.
No comments:
Post a Comment