Thursday, 1 January 2026

विकसित, प्रगत महाराष्ट्राचा निर्धार नवीन वर्ष राज्याच्या प्रगतीचा सुवर्णकाळ ठरो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा

 विकसितप्रगत महाराष्ट्राचा निर्धार

नवीन वर्ष राज्याच्या प्रगतीचा सुवर्णकाळ ठरो

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा

 

मुंबईदि. ३१ : नवी स्वप्नंनवी आशानव्या आकांक्षा आणि नवे संकल्प उरात बाळगून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज असून हे नवीन वर्ष राज्याच्या प्रगतीचा सुवर्णकाळ ठरोअशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

२०२५ हे वर्ष राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरले असूनआता २०२६ मध्ये आपल्याला अधिक वेगाने घोडदौड करायची आहे. सरत्या वर्षातील यशाचा वारसा पुढे नेतनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शुभसंदेशात म्हटले आहे.

 

नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवण्यासाठी कटिबद्ध होऊया असे आवाहन देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi