वृत्त क्र. 17
राज्यात ६०४ आपला दवाखाने सुरू;
उर्वरित ९६ दवाखाने जानेवारी अखेर सुरू होणार
- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
नागपूर, दि.९ : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला आरोग्याच्या सर्व सुविधा तत्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही योजना अधिक व्यापकपणे राबविण्यात येईल. राज्यात सध्या या योजनेंतर्गत ६०४ आपला दवाखाने सुरू असून उर्वरित ९६ दवाखाने येत्या जानेवारी अखेर सुरू करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व आरोग्य वर्धिनी केंद्र राज्यात पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजीत वंजारी, सचिन अहिर, प्रसाद लाड, परिणय फुके, निरंजन डावखरे, रणजितसिंह मोहिते, राजहंस सिंह, शशिकांत शिंदे, श्रीमती उमा खापरे, मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.
सर्वसामान्य व गरीब नागरिकांसाठी असल्याने ती अधिक प्रभावी आणि गतिमान करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले
No comments:
Post a Comment