Sunday, 11 January 2026

गुटखा उत्पादन आणि विक्रेत्यांवर'मकोका' लागू होणार

 गुटखा उत्पादन आणि विक्रेत्यांवर'मकोकालागू होणार

•'एफडीएमंत्री नरहरी झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

 

मुंबईदि. १० :- गुटखा उत्पादन आणि विक्रेत्यांची गुन्हेगारी साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मकोका लागू करण्याची घोषणा विधिमंडळ अधिवेशनात केली असून यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) कारवाईसाठी  बळकटी  येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री  नरहरी  झिरवाळ यांनी म्हटले आहे. याबद्दल मंत्री  झिरवाळ यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

         परराज्यातून अवैध मार्गाने राज्यात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधी सुपारी आणली जाते. यावर एफडीए'च्या जप्ती आणि फौजदारी कारवाईनंतरही विक्री होत असल्याने या गुन्हेगारी साखळीला रोखण्यासाठी 'महाराष्ट्र संघटित गुन्हे प्रतिबंधक कायदा' (मकोका) अंतर्गत कारवाईचा निर्णय घेण्याची प्रक्रिया अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पातळीवर सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मकोका कारवाई करण्याची घोषणा करून विभागाच्या प्रस्तावाचे समर्थन केले आहेअसे मंत्री झिरवाळ म्हणाले.

        मकोका कारवाईची घोषणा करताना "गुटखा व अंमली पदार्थांवरील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी कठोर विशेष कायदा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 'महाराष्ट्र संघटित गुन्हे प्रतिबंधक कायदा' (मकोका) अंतर्गत कारवाईचा निर्णय घेतला जाईल,"असे मुख्यमंत्री यांनी विधिमंडळ अधिवेशनात स्पष्ट केले.

        गुटखासुगंधी पान मसाला यावर राज्यात बंदी असूनही शाळा महाविद्यालयांच्या व परिसरातील दुकानांत गुटखा उत्पादन व विक्रेत्यांकडून नियमबाह्य विक्री केली जाते. गुटखा विक्री कारवाई अधीक प्रभावी  व्हावी यासाठी  गुटख्यासह सुगंधी सुपारी विक्रेत्यांनाही मकोकाच्या कक्षेत आणले जाणार आहेतसा प्रस्तावच विधि व न्याय विभागाला पाठवणार असल्याची माहिती या पूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी  दिली आहे.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi