Saturday, 3 January 2026

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने गुन्हे नियंत्रणात

 कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने गुन्हे नियंत्रणात महाराष्ट्राने दिलेले मॉडेल देशभरासाठी दिशा देणारे

मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी आयोजित Microsoft AI Tour कार्यक्रमात सहभाग घेतला. सत्या नडेला यांनी महाराष्ट्र सरकारसोबत विकसित केलेल्या Crime AIOS प्लॅटफॉर्मचे विशेष प्रदर्शन  या कार्यक्रमात केले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने गुन्हे नियंत्रणात महाराष्ट्राने दिलेले मॉडेल देशभरासाठी दिशा देणारे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सत्या नडेला यांच्या सोबत झालेल्या या बैठकीत आरोग्यशिक्षणकृषी आणि सरकारी सेवा वितरणासाठी AI Co-Pilots विकसित करण्यावर चर्चा  झाली. मायक्रोसॉफ्टने भारतातील त्यांच्या $17 अब्जांच्या सर्वात मोठ्या गुंतवणुकीत महाराष्ट्राला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाराष्ट्राने विकसित केलेल्या मार्बल Marble प्लॅटफॉर्ममुळे सायबर आणि आर्थिक गुन्हे 3–4 महिन्यांच्या ऐवजी फक्त 24 तासांत शोधता येतात. ज्यामुळे लोकांचे पैसे वाचत आहेत आणि गुन्हेगारांना शोधणे अधिक जलद झाले आहे.  यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेउद्योग विभागाचे सचिव डॉ.अनबलगनयांच्यासह संबंधित मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi