राष्ट्रीय ‘वीर गाथा 5.0’ मध्ये महाराष्ट्र अव्वल
- देशातील सुपर 100 मध्ये सर्वाधिक 19 विजेते महाराष्ट्राचे
नवी दिल्ली, 22: भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संरक्षण मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि मायगव्ह (MyGov) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'प्रोजेक्ट वीर गाथा 5.0.' या राष्ट्रीय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन केले असून, देशातील 'सुपर 100' विजेत्यांमध्ये सर्वाधिक 19 विजेते महाराष्ट्राचे आहेत. या विजेत्यांमध्ये 14 मुली आणि 5 मुलांचा समावेश आहे.
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त 'आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत 2021 मध्ये सुरू झालेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या पराक्रमाची जाणीव करून देण्यासाठी राबविला जातो. यंदाच्या वीर गाथा 5.0 आवृत्तीमध्ये देशातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच परदेशातील 18 देशांमधील 91 सीबीएसई (CBSE) शाळांनी यात सहभाग नोंदवला, ज्यामधून परदेशातील 4 मुलांनीही विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. संपूर्ण देशातून एकूण 1.92 कोटी विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली होती.
No comments:
Post a Comment