महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
2696 कोटी रुपयांच्या तूर खरेदीला केंद्राची मंजुरी
नवी दिल्ली,25 :महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, राज्यातील 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंजुरी दिली आहे.
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे 'किंमत समर्थन योजने'अंतर्गत (PSS) सुमारे 2,696 कोटी रुपयांच्या निधीतून ही तूर खरेदी केली जाणार असून, याचा थेट लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे. या बैठकीस महाराष्ट्राचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि केंद्रीय कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment