*26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट मधील मुख्य फरक ...*
1) 15 ऑगस्ट ला पंतप्रधान ध्वजारोहण करतात तर ... 26 जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवतात
कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.
************
2) 15 ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो. त्याला ध्वजारोहण (flag hoisting) म्हणतात तर... 26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला जातो. त्याला (flag unfurling) म्हणतात.
************
3)15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर... 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्या नंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो, म्हणून त्याला *झेंडा फडकवणे* म्हणतात. ***************
4) 15 ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर ध्वजारोहणहोते तर, 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो. *************
_आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.
मूळात आपण स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन यामधील फरकच समजावून घेतला नाही. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात इंग्रजांची राजवट,स्वतंत्र मिळविण्यासाठीचे लढे ही माहिती सांगणे अप्रस्तुत,चुकीचे ठरते.त्या ऐवजी या दिवशी संविधान निर्मितीची पार्श्वभूमी,संविधानामुळे देशाची झालेली प्रगती,संविधान निर्मात्याचे योगदान मांडणे अपेक्षित आहे.स्वातंत्र्यदिनी ज्या प्रमाणे देशाला स्वातंत्र मिळवून देणार्या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा गौरव होतो , त्याच प्रमाणे प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीचा गौरव होणे उचित ठरते.
२६ जानेवारी १९५० पासून राज्यघटनेचा अंमल सुरू झाला आणि देश सर्व प्रजेची सत्ता असणारा प्रजासत्ताक बनला.प्रजासत्तकोत्तोर ७५ वर्षांत सर्वसमावेशी राज्यघटनेच्या बळावर देशाने जी अतुलनीय प्रगती केली आहे,ती कौतुकास्पद आहे.
७५ वर्षांपूर्वी साधी टाचणी बनविण्यास पात्र नसणारा देश आज चांद्र मोहीम,मंगळ मोहीम द्वारे आकाशाला गवसणी घालत आहेत.१९५० चे ईवलेसे लोकशाहीचे रोपटे आज जगात सर्वात मोठे संसदीय लोकशाहीवादी महावृक्ष म्हणून आदरणीय ठरत आहे.
राज्यघटनेमुळे देशात शैक्षणिक,सामाजिक, राजकीय,आर्थिक, सामाजिक,सांस्कृतिक क्रांती घडवून आली आहे.१९५१ साली देशाची साक्षरता १८.३३% होती २०११ साली ७४.४०% तर आज जवळपास ८५% एवढी वाढली आहे.
(वन मॅन वन वोट
वन वोट वन व्हॅल्यू )
"एक व्यक्ति-एक मत" आणि राज्यघटनेतील मूलभूत अधिकारामुळे सर्व भारतीयांना विकासाची समान संधी उपलब्ध झाली आहे .राज्यघटनीय राजकीय अधिकारामुळे वंचित घटकांना ग्राम पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत सत्तेत सर्वांना सहभागी होता आले आहे. स्वतःला एक साधा चहा विकणारे सांगणारे नरेंद्र मोदी आज देशाचे प्रधानमंत्री झालेत.हे सर्व बदल घडले ते राज्यघटनेमुळे.
26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणजेच हा संविधान गौरव दिन आहे, हा संविधान गौरव दिन भारतातील कोणत्याही सण आणि उत्सवापेक्षा मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला पाहिजे,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले घटनेची माहिती असणे आवश्यक आहे आणि त्याचे पालन करणे आपले कर्तव्य आहे.
आजच्या दिवशी कोणीही शहीद झाले नाही म्हणून शहिदांचे गाणे लावू नयेत संविधान गौरव गीते व संविधान उद्देशिका चे वाचन करून संविधानाबाबत व संविधान निर्माते
यांचे कृतज्ञता व्यक्त करून
संविधान गौरव दिवस साजरा करावा
विजय खरात
पनवेल नवी मुंबई

No comments:
Post a Comment