*निवडणूक मतदान लाचार नको, मतदान हा मूलभूत अधिकार आहे!”*
*“आपले मतदान – नवी मुंबईसाठी*
*मतदान करून – नवी मुंबईचे भविष्य ठरवा*
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता निर्भय व निष्पक्षपणे मतदान करावे, असे आवाहन प्रशासन तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. लोकशाही व्यवस्थेत मतदान हा नागरिकाचा मूलभूत अधिकार असून तो प्रामाणिकपणे बजावणे ही प्रत्येक मतदाराची जबाबदारी आहे.
निवडणुकी धामधूमीत पैसे, वस्तू, दारू, चिकन, मटण, पार्टी किंवा आणखी स्वरूपात दिले जाणाऱ्या आमिषांना बळी पडणे हे कायद्याने गुन्हा आहेच मात्र लोकशाहीला मारक असल्याचे दिसून येते. त्यामुळे लोकशाहीची मूल्ये, स्वातंत्र्य कमकुवत होतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने कडक उपाययोजना राबविल्या असल्या तरी नागरिकांनीही दक्ष राहून अशा गैरप्रकारांची माहिती प्रशासनाकडे द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतून शहराच्या विकासात्मक महत्त्वाचे निर्णय घेणारे लोकप्रतिनिधी निवडले पाहिजे. ज्यामध्ये पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधा यांसारख्या योग्य निर्णय घेण्यासाठी निडर,सक्षम व प्रामाणिक प्रतिनिधींची निवड होणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही दबावाखाली न येता, तर कुणाच्या आशीर्वादाने कृपा न ठेवता उमेदवारांची पार्श्वभूमी, कामगिरी व विकासदृष्टी लक्षात घेऊन मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोग व महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरातील विविध भागांत जनजागृती फलक, सोशल मीडियावरील प्रचार, तसेच युवक व प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांसाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सोयीसुविधांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
लोकशाही उत्कृष्ट आणि मजबूत ठेवण्यासाठी मतदारांनी प्रलोभनांना नकार देत निर्भयपणे मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नवी मुंबईतील सर्व मतदारांनी कोणत्याच आमिषाला बळी न पडता मतदान करून स्वच्छ, पारदर्शक आणि विकासासाठी महानगरपालिका घडवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हे प्रत्येक नागरिकाचे महत्त्वाचे कर्तव्य आणि अधिकार आहे.
*"मतदान म्हणजे, स्व-हक्काची ओळख "*
"लाचार नाही, मतदान हक्क आहे" – देशात सर्वांना समान असणारा हक्क म्हणजे यामध्ये श्रीमंत - गरीब, उच्च- निच्च, लहान मोठा, असा समान हक्क हा फक्त मतदानाचा आहे, जो सर्वाना मिळतो.
लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा हक्क म्हणजे मतदान करणे हा आहे. आपला आवाज मतपेटीत मत देऊन बजावावा हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने नागरिकांना मतदान करण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी नवीन जागरूकता मोहीम करीत असतात. "लाचारी नाही, मतदान हक्क आहे!" या घोषवाक्याखाली लोकशाहीतील सर्व मतदारांना मतदान प्रक्रियेत भाग घेण्यास प्रोत्साहन केले आहे.
आधुनिक काळात निवडणूक प्रक्रियेला खूप महत्त्व आहे, कारण आपल्या एकाच मताने देशाच्या भविष्यावर परिणाम होतो. तरीही, अनेक नागरिक मतदान प्रक्रियेपासून वंचित राहतात किंवा त्याला कमी महत्त्व देतात. यामुळे, मतदारांचे हक्क योग्यरित्या वापरले जात नाहीत, ज्यामुळे एका विशिष्ट वर्गाचा आवाज दबला जातो.
*लोकशाहीत मतदानाचे महत्त्व:*
मतदान ही नागरिकाची जबाबदारी असून, त्यातूनच सरकारच्या कारभारावर नियंत्रण ठेवता येते. प्रत्येक नागरिकाचे मतदान म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या मताचा आवाज उठवला आहे. प्रत्येक मतदात्याला या महत्त्वपूर्ण अधिकाराची जाणीव करून देणारी ही मोहीम आहे.
*लोकांमध्ये जागरूकतासाठी उपाय:*
मतदान कसा करावा? – निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर कसे जावे, कोणते कागदपत्रे लागतील, तसेच मतदानाची प्रक्रिया कशी पार पडते याबद्दल माहिती दिली जाईल.
मोबाईल अॅप्स आणि वेबसाइट्स – निवडणुकीची माहिती मिळवण्यासाठी विशेष अॅप्स आणि वेबसाईट्स तयार करण्यात आले आहेत.
सोशल मीडिया मोहीम – फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर नागरिकांना मतदानासाठी प्रेरित करणारी पोस्ट्स, व्हिडीओ आणि माहिती शेअर केली जाते.
*शाळा आणि महाविद्यालयांमध्ये उपक्रम*
विद्यार्थी आणि तरुण वर्गात मतदानाची महत्त्वता समजावून सांगणारे सेमिनार आणि कार्यशाळा आयोजन केले जाते.
जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी व्यवस्थापन मतदारांना मतदानासाठी मदत करण्यासाठी वृद्ध आणि दिव्यांगांसाठी पथके तयार केली जात आहेत.
कमी मतदानाचा प्रभाव: जेव्हा नागरिक मतदान करण्यासाठी बाहेर पडत नाहीत, तेव्हा त्याचा वाईट परिणाम होतो. कमी मतदानाच्या टक्केवारीमुळे निवडणुकीत असमान प्रतिनिधित्व होऊ शकते. त्यातून, सर्वसमावेशक आणि सर्व लोकांचे हित साधणारा निर्णय घेणारी सरकार स्थापन होऊ शकत नाही.
समाजातील सर्व घटकांना संदेश: आजच्या लोकशाहीत प्रत्येक नागरिकाचा आवाज महत्त्वाचा आहे. युवक, महिलांसह विविध समाज घटकांना मतदानाची किमत मोठी आहे. जबाबदारी आपल्यावर आहे. याच कारणामुळे "लाचार नाही, मतदान हक्क आहे!" असे सांगितले जात आहे.
निवडणुकीतील सहभागी होणे हे आपल्या देशाच्या भविष्याशी संबंधित आहे. मतदान हक्क असला तरी, तो हक्क प्रत्येकाने वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे, प्रत्येक नागरिकाने आपले हक्क ओळखून मतदानाच्या प्रक्रियेत भाग घ्यावा.
*नागरिकांना आवाहन*
निवडणूक ही कोणावर उपकार करण्यासाठी नसून, ती आपला हक्क बजावण्याची प्रक्रिया आहे. लाचारपणातून नव्हे, तर अभिमानाने मतदान करा. प्रत्येक नागरिकाने आपले मतदान करून सक्षम, पारदर्शक व विकासाकरिता नवी मुंबई घडवण्यासाठी मतदान कर्तव्य,जबाबदारीने आणि विश्वासाने करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवी मुंबईच्या विकासासाठी मतदानातूनच आपले अधिकाराची जाणीव करून द्या हीच खरी वेळ आहे. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी महत्वाचे आणि आपल्या अधिकाराचे हक्काचे काम आहे ते आपण केलेच पाहिजे, मतदान करा आणि लोकशाहीचा महोत्सव साजरा करा. असे आवाहन करण्यात येत आहे.
* *“निवडणूक मतदान लाचारी नको*
मतदान हा नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे” या संदेशातून जनजागृती करण्यात येत आहे.
मात्र, गैरसमजामुळे अनेक वेळा मतदान टक्केवारी कमी होते. याचा परिणाम शहराच्या विकास कामांवर आणि सुविधांवर होतो. हे टाळण्यासाठी नवी मुंबईतील प्रत्येक मतदाराने निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
मतदान न करणे म्हणजे आपल्या हक्कांपासून स्वतःला वंचित ठेवण्यासारखे आहे.
निवडणूक आयोग व महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून सोशल मीडियाद्वारे प्रचार, सार्वजनिक ठिकाणी बॅनर, तसेच युवक पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक व अपंग मतदारांसाठी आवश्यक सोयीसुविधाही उपलब्ध करून देण्यात येत असतात.
निवडणूक उपकार करण्यासाठी नसून, लोकशाहीतील हक्कसाठी आहे. त्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांनी लाचारी न होता, तर स्व जबाबदारीम्हणून मतदान करून सक्षम, पारदर्शक आणि विकासासाठी महानगरपालिका व्हावी, असे आवाहन करण्यात आले आहे. चंद्रशेखर हेंडवे
9930903664
No comments:
Post a Comment