Monday, 5 January 2026

जिल्हा युवा पुरस्कारासाठी 12 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन8898090907/ 9594369561/9422030383 या क्रमांकावर संपर्क

 जिल्हा युवा पुरस्कारासाठी 12 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. ५ : मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र युवकयुवती व संस्थांनी २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीसाठी जिल्हा युवा पुरस्कारासाठी १२ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन मुंबई शहराचे जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांनी केले आहे.

पुरस्कारासाठीचे अर्ज भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुलदुसरा मजलाजिल्हा क्रीडा अधिकारीमुंबई शहर कार्यालयधारावी येथे सादर करावयाचे असून अर्ज सादर करावयाचे आहेत.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकयुवतींमुळे समाजात युवाशक्तीची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. युवकांना मानव संसाधन विकासाचा प्रमुख स्रोत मानले जात असून विकास प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. या अनुषंगाने राज्याच्या युवा धोरण २०१२ नुसार राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

समाजातील दुर्बल घटकअनुसूचित जाती-जमातीआदिवासी भागतसेच शिक्षणरोजगारआरोग्यपर्यावरणसंस्कृतीकलाक्रीडाविज्ञान-तंत्रज्ञानउद्योगमहिला सक्षमीकरणस्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंधव्यसनमुक्ती आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकयुवती व संस्थांना जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी 8898090907/ 9594369561/9422030383 या क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi