Sunday, 14 December 2025

शनिशिंगणापूर देवस्थानातील ऑनलाईन आर्थिक अपहा प्रकरणी दोन कर्मचारी अटकेत

 शनिशिंगणापूर देवस्थानातील ऑनलाईन आर्थिक अपहा

प्रकरणी दोन कर्मचारी अटकेत


– गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर


नागपूर, दि १४ : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री शनैश्वर (शनिशिंगणापूर) देवस्थानात ऑनलाईन पूजा, चढावा व लाईव्ह दर्शन सेवांमधून मोठ्या आर्थिक अपहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवस्थानातील दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली.


विधानसभा सदस्य विठ्ठल लंगे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात मंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले की, सन २०१८ पासून शेमारू या कंपनीला शनिदेवाचे लाईव्ह दर्शन देण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर 2022 ते 2025 या कालावधीत देवदान विविध कंपन्यांच्या श्री मंदिर, उत्सव, वामा आणि शेमारू ॲपवर ऑनलाईन पूजा, चढावा आणि लाईव्ह दर्शन सेवा देण्याची परवानगी देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi