Saturday, 20 December 2025

बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी ‘दिशा’ अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी बंधनकारक

 बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी दिशा’ अभ्यासक्रमाची

प्रभावी अंमलबजावणी बंधनकारक

-         सचिव तुकाराम मुंढे

 

मुंबईदि. १९ : बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या शिक्षणात गुणवत्ताएकसमानता आणि सातत्य आणण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील विशेष शाळांमधील बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या दिशा’ विशेष अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व बौद्धिक अक्षम प्रवर्गाच्या विशेष शाळांमध्ये दिशा पोर्टलअभ्यासक्रम व मूल्यमापन प्रणाली राबविणे बंधनकारक असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

सचिव मुंढे म्हणालेसर्व विशेष शाळांना दिशा’ पोर्टलवर ऑनबोर्ड करणेमुख्याध्यापक व शिक्षकांचे प्रशिक्षणप्रत्येक विद्यार्थ्यासाठी वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम (आयईपीव वैयक्तिक थेरपी कार्यक्रम (आयटीपीतयार करणेबहुसंवेदी अध्यापन पद्धतीचा अवलंब करणे तसेच नियमित मूल्यमापन व पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुंबई शहर,उपनगरचे जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे .

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi