निवासी आयुक्त ( गुंतवणूक) सुशील गायकवाड यांनी प्रदर्शनाच्या नियोजनाची माहिती घेऊन मार्गदर्शन केले. विविध केंद्रीय मंत्रालये, प्रमुख उद्योगसमूह गुंतवणूकदार आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून अधिकाधिक सहभाग मिळवून देण्याबाबत त्यांनी सकारात्मक चर्चा केली. तसेच सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले
मराठवाडा हा औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील प्रचंड क्षमता असलेला प्रदेश आहे. ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2026’ या प्रदर्शनामुळे छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाडा क्षेत्राला नव्या गुंतवणुका, रोजगार संधी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या संधी उपलब्ध होणार असून, मराठवाड्याच्या औद्योगिक क्रांतीला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment