Tuesday, 16 December 2025

माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती

 माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती

महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच संबंधित महानगरपालिका आयुक्त आपल्या स्तरावर राज्य निवडणूक आयोगाच्या 9 ऑक्टोबर 2025 रोजीच्या निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, 2025’ नुसार महानगरपालिकास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती’ स्थापन करतील. महानगरपालिका आयुक्त स्वत: या समितीचे अध्यक्षतर महानगरपालिकेचा जनसंपर्क अधिकारी सदस्य सचिव असेल. ही समिती प्रचारविषयक इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातींचे पूर्वप्रमाणनपेड न्यूजसंदर्भातील तक्रारी/ प्रकरणांची चौकशीत्यांचे निराकरणतसेच विविध प्रसारमाध्यमांतील वृत्तांकनाच्या संकेतांच्या पालनाबाबत संनियंत्रण आणि देखरेख करेल. राज्य निवडणूक आयोगाच्या स्तरावर आयोगाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती’ कार्यरत असेल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi